उपमा
आज " श्रावणात घन निळा बरसला " हे गाणं रेडिओवर सुरू होतं , बाहेर पाऊसही पडत होता . ते ऐकतांना कदाचित मी शांत एकटी बसले होते म्हणून की काय , एकूणएक शब्द अगदी लक्षपूर्वक ऐकत होते . लहानपणापासून हे गाणं ऐकतेय . आज त्यातले शब्द न शब्द परत ऐकतांना जाणवलं , या गाण्यातून , आपण सर्व , श्रावण कित्ती वर्ष जगतोय , अनुभवतोय . मंगेश पाडगावकरांचे शब्द , श्रीनिवास खळे यांच्या संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाने गुंफलेलं हे सुंदर गाणं ऐकल्यावर असच वाटतं , हो न ? किती सुंदर शब्द , कित्ती सुरेख आणि आकर्षक उपमा . व्वा ! रिमझिम रेशीमधारा , पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे , स्वप्नांचे पक्षी , रंगांच्या रानात , थेंबाचे फुलपाखरू , अप्रतिम । अप्रतिम ! अगदी डोळ्यांसमोर ते चित्र उभं राहतं . साध्या सोप्या सहज भाषेतूनही मनापर्यंत पोहोचणारी , आजही पाठ असणारी शाळेतली कविता . ' श्रावण मासी हर्ष मानसी ' ही तर आजही श्रावणाचा सुंदर अनुभव मनाला देते . हो न ?
उपमा हा भाषेचा एक अलंकार . अलंकार घातल्यावर मूर्ती असो वा मनुष्य , त्यांचं सौन्दर्य वाढतं . त्याचप्रमाणे वेगवेगळे अलंकार घातल्यावर भाषाही जास्त आकर्षक वाटते . जस , पुस्तकात वाक्य असेल " मुख खूप सुंदर आहे ' तर सुंदर म्हणजे नक्की कसं याची कल्पना येत नाही . तेच जर वाक्य असेल , ' मुख म्हणजे जणू कमळच ' हे वाक्य वाचल्यावर ती व्यक्ती जरी काल्पनिक असली तरीही ती किती सुंदर असेल याची कल्पना उपमा वाचून , करून आपण पुढे वाचू लागतो . बरोबर न ?
जसा जसा अजून यावर विचार करू लागतो तस तस कित्ती लेखक , कवी , त्यांनी लिहिलेली पुस्तकं , त्यातली अलंकारिक भाषा , तर कधी मनाला भावणारी साधी , सोपी , सहज , तरीही सुंदर अशी वर्णन आठवतात . ' जे न देखे रवी ते देखे कवि' याची वारंवार प्रचिती येते .
उपमा फक्त गद्य किंवा पद्म यातच दिल्या जातात अस नाही . आपल्या दैनंदिन जीवनातही आपण त्या ऐकत असतो . उपमा कधी मजेदार असतात , कधी उपरोधक असतात तर कधी लाडाने , प्रेमाने दिलेल्या असतात . उपमा ऐकल्यावर ती व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यासमोर उभी रहाते .
लहान मुलांचे पुऱ्यांसारखे गाल म्हंटले की तळताना टम्म फुगलेली पुरी आठवते . गाल अगदी रसगुल्ला आहे म्हंटलं की नक्कीच ते मूल खूप गोड असेल असं वाटतं , वाटतं न .
भोपळा , माठ , मिरची त्यातही लवंगी मिरची , कमची , काकडी , चवळीची शेंग , सुतासारखा सरळ , हरिश्चंद्र , भोळासांब , लक्ष्मी नारायणाचा जोडा हे आणि असे बरेच शब्द ऐकले की ती व्यक्ती कशी असेल याचा त्या व्यक्तीला न पाहताही अंदाज बांधता येतो . येतो न , आणि आठवले ही असतील आपल्याच आजूबाजूचे लोक , आठवले न ?
निरनिराळ्या उपमा निरनिराळ्या ठिकाणी अनपेक्षित , अचानक जेव्हा सुचतात किंवा ऐकू येतात त्यावेळी हसू येतं . समोरून कुणी खूप हळू चालत येत असेल तर , ' ' काच नाहीये खाली , ये पटकन धांवत ' अस चिडवल्या जात तर 'अगदी हळू ये , जपून ये हं , हे सांगायला ' खाली काच आहे असं समजून चाल ' अस सांगितल्या जात. उपमा एकच मात्र एका वाक्यात मिश्किल भाव आहेत तर एकात काळजी . आहे न मजा ?
एक उपमा आणि त्यावरचा विनोद नेहमी वाचल्या आणि ऐकल्या जातो , ' प्रेमाला उपमा नाही ' का ? तर म्हणे ' घरात रवा नाही ' . हा विनोद म्हणजे ' प्रेम ' आणि ' उपमा ' यातला बादरायण संबंध जरी असला तरी , जरा विचार करा , की या रव्याच्या पदार्थाचं नाव उपमा कुणी ठेवलं असेल ? आणि का ?
बघा हं , रवा हे काही पीठ नाही , बरोबर ? रव्याचा प्रत्येक कण वेगळा असतो . रवा जेव्हा भाजला जातो , तप्त होतो त्याचा रंग सुंदर तांबूस होतो . जास्त भाजला गेला तर जळतो , कमी भाजला तर उपमा खमंग होत नाही . त्यात कढीपत्ता , कांदा , मिरची , शेंगदाणे आणि आवडीप्रमाणे बरच काही यांची फोडणी घालुन आवश्यक तेवढं पाणी घातलं की झाला खमंग उपमा तयार . पाणी कमी झालं तर तो घट्ट होणार , जास्त झालं तर पातळ , बरोबर न ? वरून सजवायला कोथिंबीर आणि जोडीला खोबऱ्याची चटणी असेल तर मग , अहाहा ! तसच तर आहे न आयुष्यही. रव्याचा एकेक कण म्हणजे जसा आयुष्यातला एक एक दिवस . रवा ज्याप्रमाणे भाजला जातो , खरपूस होतो त्याचप्रमाणे आयुष्याच्या उन्हात एक एक दिवस जगतांना , त्यात तावून सुलाखून निघतांना व्यक्तीवर परिपक्वतेचा रंग चढायला लागतो . परिपक्व व्यक्तीच्या जीवनाला सुख , दुःख यांची फोडणी असतेच . त्यात शिक्षण , ध्येय , काम , सहनशीलता , जबाबदारी आणि बरंच काही घातल्या जातं . त्यात घालायचं मेहनतीचं पाणी , ते मात्र आवश्यक तेवढं हवंच की झाला खमंग आणि मऊसूत उपमा तयार . त्याला समाधानाची जोड असेल तर क्या बात है ।
#प्रेमालाउपमानाही, #श्रावणमासीहर्षमानसी, #श्रावणातघननिळाबरसला,

रविवारचा नाषटा गरमागरम उपमा तुझ्या लॆखातून मिळाला.
ReplyDelete😊👍
DeleteUpma ani upama ह्याची सांगड खूपच छान ...keep it up !!
ReplyDeleteधन्यवाद 🙏 😊
DeleteWaw!मस्त sunday breakfast उपमा👌👍
ReplyDeleteधन्यवाद 😊👍
Deleteखमंग लेख 👍
ReplyDelete,🙏😊
Deleteखमंग लेख ��
ReplyDeleteधन्यवाद 😊
DeleteEnjoyed reading ��������Reading heading Upma, I thought that blogs is on famous southern dish :)..
ReplyDeleteIn fact Upma as is an ornament which enhances the near to exact meaning to word or sentence. It also throws light on reference to the context of situation.
Your gradual narration and transition from upma (ornament) to upama of life is incredible.
खुपच छान .....👌👌..सुंदर.
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
Deleteउपमा तयार झाल्यावर समाधानाची जोड
ReplyDeletePerfect madla ahes ....khup chan
धन्यवाद 😊
ReplyDeleteKavita Kamalapurkar
ReplyDeleteKhupach sunder lekh
Dhanyawad 😊
ReplyDelete