रंग
रंग ......
यावर खरंच काय लिहिणार ......रंग म्हणजे रंग ........अजून काय ........रंगेबिरंगी .....म्हणजे हिरवा , लाल , निळा , पिवळा, गुलाबी ........आणि अजून कितीतरी रंग ..... .. अजुन काय बर .......पानी तेरा रंग कैसा ......जिसमे मिलाये वैसा ........रंग माझा वेगळा ......
........असेही म्हणतात ......यातला रंग चा अर्थ काय आहे ... ...रंग वेगळा म्हणजे मी लाल, निळा किंवा हिरवा आहे असा तर नक्कीच नाही ...... मग काय .....
खरतर रंग म्हंटल की आठवतात फुलांचे ....पक्ष्यांचे....फळांचे भाज्यांचे , झाडांचे ....मासोळ्याचे , फुलपाखरांचे...आकाशाचे ......ताऱ्यांचे , ग्रहांचे , रत्नांचे , दगडांचे ......म्हंटल तर विविध रंगांनी नटलेल्या निसर्गातील सर्व जीव जिवाणूंचे .....किती म्हणून किती नाव लिहावी .....ही list वाढतच जातेय .......तर थोडक्यात रंग हा निसर्गातल्या प्रत्येकाला आहे ......बरोबर .......अजून थोडा विचार केला तर जाणवतं की ....रंग प्रत्येक मानवनिर्मित गोष्टींना आहे ...... त्यात प्रकर्षांने सर्वाना आवडणारे म्हणजे घरांचे, गाड्यांचे , कपड्यांचे , लहान मुलांच्या खेळण्यांचे आणि कितीतरी वस्तूंचे निरनिराळे रंग .......
रंग कुठलाही खरं तर छानच असतो ....रंगसंगती जर नीट झाली नसेल तर मात्र तो रंग मनाला भावत नाही ..... मला आवडला नाही हा रंग असं म्हणतो आपण ..........प्रत्येक ठिकाणी काही ठराविक रंग खुलून दिसतात हे जरी असलं तरी काही रंग हे चांगले , काही रंग वाईट असं लोक ठरवून मोकळं होतात .............कुठला रंग चांगला यावर कधी संवाद किंवा क्वचित वाद सुद्धा होतात ....... जसं अगदी नेहमीच उदाहरण म्हणजे...... गोरा रंग चांगला .... काळा वाईट ......त्यावरून जगात आजपर्यंत अनेक लोकांवर अन्याय झाले...........racism ही जगातली फार मोठी मानवतेला लागलेली कीड आहे ......कितीही वरकरणी आव आणला तरी काही लोक स्वतःला superior समजतात ....मात्र गंम्मत या गोष्टीची वाटते की काही लोक स्वतःमध्ये काही कमी आहे असं मानतात ......समजतात ..........खरंतर आपण कितीतरी गोरे नसलेले लोक यशस्वी झालेले पाहिले आहेत पण तरीही खूपदा समाजात रंगावरून टिंगल करणारे लोक दिसतात ....... रंगावरून हिणवल्या जात .....कुणाला तरी कधी कोळसा असही चिडवलं जातं ......त्यावेळी ह्याच कोळश्याची सावरकरांनी अंदमानात केलेली लेखणी आपण विसरतो ......केवढं त्याच मोल.....हाच कोळसा जेव्हा चुलीत किंवा power plant मध्ये वापरल्या जातो तेव्हा अन्न तर तयार होतच तसच लाखो घर प्रकाशात उजळून निघतात ... ...बरोबर न ......... ......दूर कशाला जा ...... आपल्याकडे म्हण प्रचलित आहे....... गोरी सब गुण चोरी .....खरतर भारतातल्या समाजात पुष्कळ मुलींची रंग ही खूप मोठी समस्या आहे .....आहे असं म्हणण्यापेक्षा तशी त्यांची मानसिकता तयार केली जाते .......लहानपणा पासून तस सांगितल्या जात ...............मुलांना याचा त्रास थोडा कमी होतो .....पण होतोच ........रंगापेक्षा गुण महत्वाचे हे शिकवणारी घर आजही आपल्या समाजात कमी आहेत हे आपण बघतो ......असो .... जरा विषयांतर झालं ......
कधी कोणी विचारल तुझा आवडता रंग कुठला .....तर एक , दोन कधी तिसरा रंग सांगू आपण ...... खरंच असे थोडेच रंग आवडतात का सगळ्यांना......रंग हे सुदधा परिस्थिती प्रमाणे आवडते होतात कधी नावडते होतात ......खरं नाही वाटत .......बघा ......आपले कुठलेही रंग आवडते असले तरी flag चे रंग म्हंटल की आपल्याला तिरंग्याचे रंगच आकर्षित करतात .....हो न ......एकदा अटारी बॉर्डर वर जाऊन हातात तिरंगा धरून पहा ......त्या
रंगाकडे पाहून किती अभिमान वाटतो ......त्यावेळी त्या पेक्षा कुठलाच दुसरा रंग सुंदर दिसत नाही .......
ज्या काळ्या रंगाला कुठल्याही पवित्र कार्यांत पूर्वी नाकारल्या जात होतं .....त्यावेळी सुद्धा शाळेतल्या पाट्या आणि फळे काळ्या रंगाचेच होते ......त्या फळ्यांना नाही कुणी वाईट म्हंटल ना त्याचा रंग कधी कुणी बदलला ......बरोबर न ......त्याच कारण कदाचित हे सुद्धा असू शकेल की काळ्या रंगावर जर पांढऱ्या रंगाने लिहिलं तर ते सगळ्यात मागे बसणाऱ्या विद्यार्थ्याला पण नीट दिसत.....
काळे कपडे सणावाराला घालायचे नाहीत असा दंडक करणारे घरच्या लहान मुलांना तीट ही काळीच लावत ......डोळ्यात काळ काजळ घालणं हे त्यावेळच प्रसाधन ......
पांढरा रंग हा पावित्र्याचा रंग मानला जातो पण पूर्वी या रंगाचे कपडे घालणं याला सुतकी कपडे घातले अस म्हंटल जायचं ......किती परस्पर विरोधी विचार होते .....एवढंच कशाला जर त्यावेळी कुणी व्यक्ती चांगली नाही हे सांगायचं असेल तर ती व्यक्ती पांढऱ्या पायाची आहे असं म्हटलं जातं होत ......मग पांढरा रंग हा पवित्र की नाही .....हे कदाचित त्यावेळी लोकांना नीटसं ठरवता आलं नसावं .....असो आज या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर आला आहे समाज ......
रंग म्हंटल की अजून किती वाक्य आठवतात बघा .....आज पावसाचा रंग दिसतोय .....रंगेल माणूस आहे ......रंगीत तालीम सुरू आहे ...........रंग बदलेले दिसतायत .......कधी रंग पालटले कळणार पण नाही ........आज गप्पा मस्त रंगल्या .......रंगरंग करतो बाबा तू .......या वाक्यात रंग म्हणजे नेमकं काय ......
आज निराळाच रंग दिसतोय याचा......यातला रंग म्हणजे .....
रागरंग काही नीट नाही दिसत याचे ......यातला रंग म्हणजे ........मुझे रंग दे या गाण्यातला रंग म्हणजे ......रंग दे बसंती चोला यातला ........रंग भरे बादल से रंग चुरा के यातला ....अशी खूप गाणी आहेत .... .....मजा वाटते न .....आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कितीतरी दुसरे....... कधी लक्षात न आलेले पण आपण नेहमीच वापरत असलेले वाक्य प्रयोग मिळत जातात आणि त्यातले विविध अर्थ सुध्दा ... ....हो न ...... ...........wow ......मज्जा वाटते न असा विचार करायला.....गाल रंगतात बरं कधी कधी आणि कधी कधी गुलाबी होतात गुलाबी स्वप्न पाहतांना .......थंडी सुद्धा गुलाबी असते सुरुवातीला हिवाळ्यात ................खरंच रंग या शब्दात किती रंग आहेत .....किती भाव आहेत ......प्रत्येक वाक्यागणिक रंगाचा रंग बदलत जातो..... म्हणजे ...अर्थ बदलत जातो ......कधी त्याचा अर्थ परिस्थिती असतो तर कधी मूड .....कधी वाईट सवयी तर कधी अजून काही ......
तरीही रंग म्हंटल की पहिले आठवतात ते सुंदर रंगच .....जे पाहून मन आकर्षित होत मग ते फुलांचे रंग असो की जलचर प्राण्यांचे....... वन्य पशूंचे किंवा पक्ष्यांचे......इंद्रधनुष्याचे.............सूर्योदय सुर्यास्ताच्या वेळी दिसणाऱ्या सुंदर आकाशाचे ........ रंग या शब्दापासून आज कितीतरी अर्थ मनुष्याने निर्माण केले असले तरी रंग हे रंगवण्यासाठी च असतात ..........काही जग , जगातल्या वस्तू रंगवतील तर काही मन ......काचेची पारदर्शक वस्तू सुंदर दिसते ......तसच रंगीत असे कॅलीडोस्कोप मधले बांगड्याचे तुकडे सुद्धा मनाला फार आकर्षित करतात ........लिलीच्या फुलांचा पांढरा शुभ्र रंग जसा मनाला प्रफुल्लित करतो तेवढाच मोराचा पिसारा मन उल्हसित करतो ........रंगेबिरंगी भरजरी नक्षीकाम केलेली शेरवानी जेवढी मनाला आकर्षित करते तेवढाच आर्मीचा गडद हिरवा रंग या बद्दल एक वेगळं आकर्षण असतं .........त्या रंगाकडे बघतांना त्यात असलेलं शौर्य सुदधा जाणवत ..... ..ते नकळत कुतूहल आणि मनात आदर निर्माण करत ........प्रत्येक रंगाची स्वतःची अशी एक गोष्ट असते ......त्यामागे काही संदर्भ असतात .... ..ते फक्त रंग नसतात तर त्या मागे एक भावना असते ......कुठे सौन्दर्याची तर कुठे पराक्रमाची , कुठे शालीनतेची , कुठे गौरवाची , कुठे प्रेमाची , कुठे मातृत्वाची .....ते मातृत्व काळ्या मातीचंही असू शकतं ........अशा रंगीत रंगामध्ये राहायला सर्वांनाच आवडत ....... साधी पतंग किंवा बॉल , खेळणं जरी घ्यायच असेल तरी छोटे मुलं देखील त्यात रंगेबिरंगी असलेली वस्तू निवडतात ......बरोबर न .......तसच ......आपण सर्वांनी सुद्धा विविध रंगांनी स्वतःच आयुष्य नटवून ते मनसोक्त जगण्याचा , आनंद घेण्याचा प्रयत्न करायला हवा..........हाती प्रयत्नांचा कुंचला धरून विविध रंग आयुष्यात भरण्यात प्रत्येक जण यशस्वी होवो हीच मनीषा .
#मुझेरंगदे , #कॅलीडोस्कोप , #रंगमाझावेगळा , #सावरकर,