मैत्री
Friendship is a sweet responsibility , never an opportunity .........
असं Khalil Gibran नी म्हटलंय
पूर्वी आपल्याला सगळ्यांना मित्र तर होते पण असा freindship डे साजरा करतात हे मात्र माहिती नव्हतं .....आजकाल सगळे अगदी शाळेतल्या मुलांपासून ते आजोबा आज्जी पर्यंत सगळे फ़्रेंडशिप डे celebrate करायला लागले .......हो न
मैत्री म्हंटली की सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती शाळेतली मैत्री ......घराच्या आजूबाजूला राहणारे आपले मित्र मैत्रिणी .........त्यावेळी सगळ्यांनी मिळून केलेली मजा आणि कधी कधी त्यासाठी एकत्र भोगलेली किंवा कुणासाठी तरी आपल्याला मिळालेली सजा पण .
मजा असते नं त्या मैत्रीत .....त्यावेळी मैत्री फार पटकन होते .....अगदी काका मामा कुणाहीकडे गेल्यावर तिथे आजूबाजूला राहणाऱ्या मुलांबरोबर सुदधा मैत्री अशी
यूsss होऊन जाते .......जसे जसे मोठे होतो आपण .....कॉलेज मध्ये जातो ...... college मध्ये गेल्यावर मैत्री होते तरी तिथे भेटलेले मित्र मैत्रिणी यात थोडं अंतर असतं ......काही आपले शाळेतलेच मित्र असतात तर काही फक्त hi bye पुरते असतात तर काही हळूहळू जिवलग होतात.......काही नेहमी घरी येणारे तर काही फक्त college पुरते भेटणारे.......
त्यावेळी जर hostel मध्ये राहायची गरज पडली असेल तर तिथे झालेले मित्र , त्यांच्या बरोबर केलेली मस्ती , तिथल्या आठवणी हा आयुष्यभरासाठी मिळालेला एक सुंदर ठेवा असतो ......मित्र देखील वेगवेगळे असतात ........काहींनी आपल्याला अभ्यास करायला शिकवलं असतं तर काहींना आपण शिकवलं असत .... काहीं मित्रांनकडे पाहून कस वागायला नको हे आपण शिकलो असतो ......काही मित्रांबरोबर मस्ती मजा केल्या जाते तर काहींची मजाही घेतल्या जाते
त्यानंतर येतो तो नवीन नोकरीचा काळ .......कधी त्यात जुने मित्र भेटतात तर कधी पूर्ण नवीन वातावरणात अजून नवीन मित्र तयार होतात ........
वयाच्या या टप्प्यावर मात्र मैत्री पटकन होत नाही ......कुठेतरी जुन्या मैत्रीचा पगडा असतो आपल्यावर आणि खूपदा काही वेगळे अनुभव पण यायला सुरुवात झाली असते त्यामुळे पटकन कुणावर विश्वास ठेवल्या जात नाही .
एक नाव दिलं जातं या नात्याला .........सहकारी .....मित्र म्हणायला थोडं अवघड जातं .......सहकारी म्हंटल की कसं........ थोडं अंतर ठेवल्या जातं आणि आपल्या मित्रांकडून ज्या अपेक्षा असतात निर्भेळ मैत्रीच्या ......त्याही ठेवल्या जात नाही आणि मग अपेक्षाभंगही होत नाही .....ही मैत्री पुष्कळदा घट्ट होते .....मग सहकारी हे नाव मागे पडतं ......आजच्या या compitition च्या युगात हे थोडं कमी होतं ...... काही अपवाद असतात .......असो
मैत्री ही फक्त मित्रांबरोबर च असते का .......कि मैत्री या नात्याचा अर्थ अजून काही निराळा आहे .......म्हणजे बघा नं .......अगदी लहान असतांना मुलांचे मित्र हे त्यांचे आई बाबा असतात . भाऊ , बहिणी , आज्जी आजोबांशी ,आत्या , मावशी , काका , मामा बरोबर गट्टी असते .......जसे मुलं घराच्या बाहेर पडतात तसे मग मित्र या शब्दाची व्याख्या बदलत जाते .......किंबहुना खूपदा घरातले ते आप्त आणि बाहेरचे मित्र असं काहीसं सांगितल्या जातं , शिकवल्या जातं किंवा कधी कधी ते आपोआप शिकल्या जातं ...... नंतर मात्र ते मित्रच जास्त जवळचे होतात आणि त्यांच्याबरोबर जास्त वेळा सगळ्या गोष्टी share केल्या जातात अगदी शाळेतल्या खाऊ च्या डब्ब्यापासून ते मनात छोट्या नवीन तयार झालेल्या गोड कोपऱ्या पर्यंत ...काय ? .....बरोबर नं .........
जसे जसे मोठे होतो आपण ..... नोकरी करायला लागतो , पुढच्या शिक्षणासाठी एकटे राहायला लागतो ...... शाळेतले मित्र हे फक्त फोनवर भेटणं सुरु होतं..... त्यावेळी परत आपण आपल्या लहानपणी च्या मित्रांना भेटणं कसं जमेल याच planning करू लागतो .........ज्या लग्न कार्यांना जातांना पूर्वी आई बाबा म्हणतात म्हणून जात असतो तिथे परत आपले आज्जी , आजोबा , मावशी , काका , मामा , बहीण , भाऊ भेटतील म्हणून जाऊ लागतो .......अर्थात कधी जाणं होतं .......कधी नाही ......पण मध्यंतरी शैक्षणिक काळात थोडे दूर गेलेले हे लहानपणीचे मित्र परत जवळ येतात .......जितकं महत्व शाळेतल्या , कॉलेज मधल्या get together ला दिल्या जात तेवढंच family get together ही दिल्या जातं ........शाळेतल्या कॉलेज मधल्या आठवणी आठवून एकमेकांना चिडवत परत कॉलेज life परत अनुभवल्या जातं तसच लहानपणीचे एक एक केलेले कारनामे , मस्ती सगळं आठवून लहानपण सुध्दा अनुभवल्या जातं .
आयुष्यात खरंच इतकेच मित्र असतात का आपले ........... कित्येक वर्षे रोज नेमाने newspaper देणारा , दूध आणून देणारा , घरी पोळ्या करणारा किंवा करणारी, मुलांना शाळेत नित्यनेमाने पोहोचवणारा रिक्षावाला , माळी , घरकाम करणारी बाई इतकंच कशाला ज्या भाजीवाल्यांकडून आपण नेहमी भाजी घेतो ते , नेहमीच किराणा दुकान , आपले family doctor.......असे कितीतरी लोक ज्यांच्या शिवाय आपली रोजची काम होत नाहीत .......त्यांना काय नाव द्यायचं ......
तेही तर आपल्या आयुष्यात आनंद पेरत असतात ......आपल्याला आपलं घर नीट ठेवायला मदत करत असतात .......कधी बरं नसतांना , दुसरं कुणी जवळ नसतांना आपल्या जवळ थांबून सोबत करत असतात ..........या सगळ्या मध्ये पैश्यांची देवाणघेवाण जरी होत असली तरी देखील .....विचार करा .......आपण खूपदा हक्काने सांगतो नं त्यांना काम .......कधी पैसे नसले आपल्याकडे तरी ती वस्तू तो दुकानदार विश्वासाने आपल्याला देतो न .......कधी आपल्या घरी घडलेली आनंदाची गोष्ट देखील सांगतो आपण त्यांना .......पेढे देतो ......त्यांच्या बरोबर आपला आनंद वाटतो .......हो नं .......कधी त्यांच्या घरी काही problems असले तर ते पण आपल्याला सांगतात........आपल्यापरीने आपण त्यांना जमेल ती मदत करतो .......त्यांच्या घरच्या कार्यप्रसंगांना आवर्जून जातो ........त्यांनाही बोलावतो . इतकं सगळं करतो पण आपण त्यांना मित्र म्हणत नाही .......कुठेतरी थांबतो ......का ?.........
कदाचित जुन्या विचारांचा पगडा तर आपल्याला अडवत नाही ?
#friendshipday, #मैत्री,