Followers

Sunday, 5 April 2020

कूट

कूट


कुटने मे मजाही कुछ और है । हे वाक्य त्यादिवशी बोलता बोलता कुणी बोलून गेलं  ते लक्षात राहिलं . सहज वाटलं खरंच
कूट म्हंटलं की प्रश्न येतो,  कुणाला ? कुणाला तरी कुटल हे ऐकलं की मजा वाटते न .  कूट कूट के भरता बना दुंगा , हे वाक्य ऐकून ते imagine करायलाही गंमत वाटते .

कूट शब्द पिटण्यासाठी म्हणूनच नाही तर अजून वेगळ्या  प्रकारेही वापरल्या जातो , म्हणजे पहा घरात वापरला जाणारा कूट
 तिळाचा , शेंगदाण्याचा , सुपारीचा ,जवसाचा आणि अजून कितीतरी . हे सगळे कूट आपण आजकाल विकत तरी आणतो किंवा मिक्सर मध्ये करतो , काय बरोबर न . कुटून कूट करायला जोर , शक्ती असावी लागते . मिक्सर वर कूट तर काय यूss तयार होतो , हो ना . जेव्हाही कुटून कूट केल्या जातो ती चव  फार सुंदर असते . खलबत्त्यात कुटून केलेली तिळाची , शेंगदाण्याची , मिरची , लसणाची किंवा अगदी हिरव्या चिंचेची चटणी , भाकरी बरोबर काय मस्त लागते न .

पूर्वी लहानपणी  आमच्या घरी एक आजी यायच्या . दरवर्षी त्या आणि आई मग  वर्षभराच तिखट , हळद , काळा मसाला , शिकेकाई खलबत्त्यात कुटून तयार करून बरणीत भरून ठेवायच्या . घरभर सुवास पसरायचा . आठवडाभर सुरू असायचं त्यांचं काम . तो ताजा ताजा झालेला काळा मसाला , तिखट  , मीठ ,  तेल लावलेली लोडपोळी , त्यात कधी लोणच्याचा खार  व्वा...., कधी त्यात घट्ट वरण , अहाहा , आजही ती चव , तो सुवास कसा मनात ताजा आहे .

अजून एक आठवतं कुणी काकू यायच्या , घरी कुटलेल बोरकूट घेऊन . 2,3 प्रकारचे बोरकूट असायचे त्यांच्याकडे..... 1 बियांसकट कुटलेल , एक बिना बियांच , 1 सगळं मीठ ,तिखट घालून तयार केलेलं. सगळे घ्यायची आई थोडे थोडे .  ते मात्र rationing करून  मिळायचे खायला . पेपर चा cone तयार करून त्यात ते घेऊन घरभर फिरत मिटक्या मारत खायला मजा यायची . आम्हाला तसे ते डबे कुठे ठेवले हे माहिती असायचं आणि  त्यामुळे बोरकूट फस्त व्हायला फारसा काही वेळही लागायचा नाही .  अस वाटायचं अजून  घ्यायला हवं होतं आईनी , असो .

कूट हा शब्द फक्त खाणं , म्हणजे मार किंवा खरं खरं खाण्या बरोबरच संबंधित आहे का ? जस आरती करतांना टाळ वाजवतात पण भजन करतांना टाळ कुटतात .  आपण सुट्ट्या असल्या ,  किंवा खूप जण एकत्र बसलो तर पत्ते कुटतो , बरोबर ना .  लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुणा एकाच्या घरी बसून पत्ते कुटणं हा ठरलेला प्रोग्राम असायचा कारण उन्हात बाहेर न फिरण्याची सक्त ताकीद घराघरात दिली जात असे .

पत्ते खेळता खेळता मग सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर काथ्याकूट करायचीही पद्धत आहे , मग तो विषय किचन , क्रिकेट पासून ते राजकारणा पर्यंत काहीही असू शकतो . ते त्या त्या पत्ते कुटणाऱ्या group वर अवलंबून असत , बरोबर . त्यात कधी कधी कुणी जर जास्तच एका विषयावर बोलत असेल तर "ए जास्त किस काढू  नको रे नाहीतर कुटून काढीन तुला"  अस म्हणून दटावल्याही जातं , हो न . किस हा कुटाचाच भाऊ , तो करायला जरा सोपा आहे एवढंच .

असच खेळता खेळता कूटप्रश्न ही विचारल्या जातात एकमेकांना , नाही लक्षात आलं , अहो म्हणजे puzzle हो . खरतर हा कूट शब्द हिंदीतला तरीही हे दोन्ही कूट शब्द आपण इतके सर्रास वापरतो की तो शब्द हिंदी भाषिक आहे हे लक्षातही रहात नाही .

कुटशब्द म्हणजे codeword आणि कुटभाषा म्हणजे code language तर कुटानुवाद म्हणजे decode ,यालाच कुटवचन हाही शब्द वापरतात . कुटानुवादक म्हणजे decoder , encrypter तसच कुटलेखन म्हणजे cryptography , जो encode करतो , हा एक खूप मोठा व्यवसाय आहे या सध्याच्या digital world मध्ये . बरोबर .

एक कुटद्वार हाही शब्द आहे.  याचा अर्थ होतो trapdoor . आहे न गंमत . कित्ती निरनिराळे शब्द तयार होतात कूट शब्दापासून जे खरतर आपल्याला माहिती आहेत पण आजकाल ते सर्व शब्द इंग्लिश मध्ये जास्त लक्षात राहतात किंवा कदाचित आपल्या मुलांनाही पटकन कळतात म्हणुन आपण वापरतो . असो

अजून सांगायचे तर कुटरचना म्हणजे forgery , तर कुटरचित म्हणजे forged . कुटकरण म्हणजे counterfeit आणि हे सगळं जो करतो त्याला ते केल्यावर त्यातून सुटण्यासाठी मदत लागते ती कुटसाक्षी म्हणजेच खोटी साक्ष देणारा आणि कधी कधी कुटचिकित्सक . हाही त्यात मदत करू शकतो जो खोटा doctor असतो याचा अर्थ आहे medicaster , someone who pretends to have medical knowledge .

असे सर्व घोटाळे करण्यासाठी काही तरी कुटनीती ही करावीच लागते , म्हणजेच काही strategy , कधी politics तर कधी diplomacy काय ? मग ते राजनीती असो किंवा व्यावसायिक चढाओढ किंवा दुसऱ्या देशांशी केल्या जाणारे व्यवहार . यासाठी कुटनीतिज्ञ म्हणा किंवा कुटनीतीक हे असणं फार जरुरी आहे , हो म्हणजे strategist , diplomat. 

कूट शब्द कुठे वापरला जातोय यावर त्याचा अर्थ ठरतो . तो हिंदी की मराठी हा भेद फारसा उरला नाही तरीही ज्यावेळी एखाद्या शब्दाचा आपण अर्थ नक्की काय आहे हे पाहतो त्यावेळी जाणवतं की प्रत्येक शब्दात निरनिराळे अर्थ " कुटकूटके भरे है ।

आज कदाचित या कूट शब्दाचा मी इतका कुट केलाय की आता हे वाचून तुम्हाला , मला कुटण्याची इच्छा न होवो हीच मनीषा .



#codelanguage