सुगंध
सुगंध म्हंटल की आठवतो निरनिराळ्या फुलांचा सुगधं , अत्तर , सुवासिक तेल, निरनिराळ्या साबणाचा सुगंध अजून जर विचार केला तर चंदन , कस्तुरी , केशर असे कितीतरी सुगंध आठवतात .
चंदनाचा जसा सुगंध असतो तसाच तो हळदीलाही असतो .....ओल्या हळदीचा सुगंध फार सुंदर येतो ......जसा कस्तुरी , केशराचा सुगंध सुंदर येतो तसाच जायफळ वेलचीचाही आवडतो ......विचार करायला सुरुवात केल्यावर लक्षात येतंय .....कित्ती प्रकारचे निरनिराळे सुगंध आहेत .
सुगधं म्हणजे आपल्याला आवडणारे जे गंध आहेत ते ......आणि जे आपल्याला आवडत नाहीत ते दुर्गंध ......पटत नाही ? पहा साधं उदाहरण घ्यायचं तर ऑइलपेंट चा गंध काहींना आवडतो तर काहींना आवडत नाही , तसच पेट्रोल , रॉकेल किंवा सफेदी करतांना येणारा चुन्याचा गंध कुणाला आवडतो कुणाला नाही . एखाद्याला लसणाच्या फोडणीचा गंध आवडतो , कुणाला शेपू च्या भाजीचा गंध आवडतो ,कुणाला नाही आवडत. प्रत्येकाची आवड निराळी ......व्यक्ती तितक्या प्रकृती , बरोबर न ....कुठल्या गंधाला सुगंध म्हणायच हे त्या त्या व्यक्तीनुसार ठरतं .
मराठी किती मजेदार भाषा आहे न ......फुलांचा सुगंध , चहा कॉफीचा किंवा कुठला मंद सुगंध हा दरवळतो , एखाद्या खाद्य पदार्थाचा घमघमाट सुटतो , दुर्गंधी पसरते , दर्प येतो . आपण ठरवून टाकलंय दरवळला म्हंटल म्हणजे मंद आवडणारा गंध असणार , घमघमाट सुटला म्हणजे खाद्यपदार्थशी निगडित काही असणार मग तो पूर्वी घरात मसाला कुटल्यानंतर घरभर पसरलेला सुगंध ही असू शकतो . दर्प म्हणजे कुठला तरी उग्र गंध असणार आणि न आवडणारा गंध हा आपली परवानगी न घेता पसरणार . काय ?
यावरून आठवलं ....एकदा मी एका माझ्या UP च्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते .....तिच्या घरात जाताच तिने भाजीला घातलेल्या फोडणीचा सुंदर वास आला .....ती समोर दिसल्याबरोबर मी तिला आपल्या मराठी हिंदीत म्हंटल ....." क्या बास आ रहा है ....वा " .......ती म्हणाली "कैसा बास " म्हंटलं " सब्जी के बगारका " ती म्हणाली " आवडला नाही का " म्हंटल , "अग खूप छान आहे , आवडला म्हणून तर म्हंटल " ती म्हणाली " अग मग बास काय म्हणते , खुशबू म्हण , सुगंध म्हण . खूप हसू येत आजही हे आठवलं की .
सुगंध फक्त फुलांचे , अत्तर किंवा सुवासिकच असतात का ? कधी बाहेर गेलो असतांना कुठेतरी कुणी वरणाला घातलेल्या फोडणीचा , तर कधी कढी चा , तर कुठे पुरणाच्या पोळीचा , कुठे मस्त पावभाजीचा , कुठे पहिल्या वाफेच्या भाताचा ......असे कितीतरी सुगंध येतात आणि त्या वरणाच्या सुगंधवरून आठवण येते एखाद्या आजीची , काकुंची ज्या अस वरण खूप छान करतात , कढीवरून , पुरणाच्या पोळीवरून कुणाला आठवते आई , भातावरून कुणाला आठवत लहाणपणी शेजारच्या काकुकडच जेवण , पावभाजीवरून आठवते एका पार्टीत केलेली धमाल ......अजून कितीतरी ........
प्रत्येक गंधाची आपली अशी एक आठवण असते .... शिशिर ऋतु संपताना जो एक खाली पडलेल्या वाळलेल्या पानाफुलांचा गंध असतो , शुष्कता असली वातावरणात तरीही ती झाडांना नवीन येणाऱ्या पालवीची नांदी असते . मार्च एप्रिल मध्ये टप्पू लागणाऱ्या झाडाच्या त्या पिवळ्या , गुलाबी फुलांचा सुगंध आला की मला नेहमी परीक्षेचा सुगंध येतो . मोगऱ्याचा पहाटे येणारा सुगंध आता शाळेला सुट्टी आहे याची आठवण आणतात ......मग त्या लहानपणी आपल्या शाळा असोत की आत्ता मुलांच्या शाळा . जून जुलै मध्ये मृदगंध जसा पावसाची ,आणि पावसाबरोबर जोडलेल्या निरनिराळ्या गोष्टींची , अगदी गरम कांदा भजीचीही , कितीतरी चिंब चिंब भिजलेल्या आठवणीना उजाळा देतो , तसच त्यावेळी घरी आणलेल्या नवीन पुस्तकांचा सुगंध शाळा सुरू होण्याच्या वेळी झालेल्या कितीतरी मजेदार आठवणींची आठवण देतो . संध्याकाळी येणाऱ्या जाई, जुई, पारिजातक यांचे सुगंध गणपती महालक्ष्मी जवळ आल्याची आठवण देतात. नवीन कपड्यांचा , घराघरातून येणारे चिवडा ,चकली , शंकरपाळे यांचे सुगंध दसरा दिवाळीची आठवण देतात . बारूदीचा गंध काहींना आवडतो काहींना नाही .....तो गंध दिवाळीची आठवण तर देतोच पण त्याबरोबर जोडल्या असतात कितीतरी दिवाळीतल्या मजेदार आठवणी . त्यावेळी ती बारूद गोळा करून मग ती पेटवल्यावर होणारा तो जाळ , तो जळका वास , तो भुस्स होणारा आवाज आणि ती करतांना आलेली मजा . काय ....आठवलं न ते बारूद गोळा करण्यासाठी पहाटे उठल्यावर आधीच्या रात्री अर्धवट जळलेले फटाके शोधणं ......
हिवाळ्यात येणारा तो जळक्या रबर tube चा वास कोणीतरी शेकोटी पेटवल्याची जाण देतो .....कुठे कधी त्यावर हलकेच तरंगत येणारा चहाचा सुगंध कुठल्यातरी ट्रिपवर गेलो असतांना पावसात , थंडीत कुडकुडत टपरीवर घेतलेल्या त्या स्वादिष्ट चहाची आठवण आणि त्याबरोबर अजून काही त्या ट्रिपच्या आठवणी ताज्या करतो .
नुसत्या गंधाने आठवणी ताज्या होतात , जाग्या होतात म्हणू हवं तर ........मग तो आवडणारा गंध असो अथवा नसो , आठवणी जाग्या होतात हे मात्र नक्की .
अत्तर जस नेहमी छोट्या कुपीत ठेवलं असतं घट्ट बंद करून तशाच या आठवणी सुद्धा . जसं त्या कुपिच झाकण उघडल्या जातं तसा सुवास पसरायला सुरुवात होते , झाकण बंद केलं तरी थोडा वेळ तो सुवास जाणवत राहतो , जर तो आपल्या कपड्यांवर लावला तर कितीतरी दिवस जाणवत राहतो . तसच तर आहे आपल्या आठवणींच्या कुपीचंही . प्रत्येक गंधाशी आपली एक आठवण जोडलेली असते . ती आठवण सुगंधी आहे की नाही हेही माहिती असत . गंध येवो अथवा न येवो आपल्याला आपली ती कुपी कधीही उघडून अनुभवता येते .
खरचं कित्ती अश्या गंधाच्या कुप्या जमल्या आहेत आपल्या सगळ्यांकडे . कुठली केव्हा उघडावी हेही आपल्या हातात आहे . कुठली उघडली तर मन सुखावणारी संवेदना मिळणार , कुठली मनाला त्रास देणार हेही माहिती आहे , कुठली कुपी मनाला प्रफुल्लित करेल , कुठली स्वर्गीय दुनियेत नेईल , कुठली धुंद करेल, कुठली उदास . कुठली कुपी उघडावी , कुठली सर्वत्र शिंपडावी , कुठली कुणाबरोबर वाटून घ्यावी , कुठली आपल्या एकांतात उघडावी , कुठली केव्हा उघडावी ........ सर्व सर्व काही आपल्याच हातात आहे ......हो न . ठरवा तर मग तुम्ही तुमच्या कुपीचा क्रम .
जाणतेपणी असो अथवा अजाणतेने.......आपण सर्व जी कुठली कुपी उघडू ती सुगंधाचीच असो हीच मनीषा .
#अत्तर #सुगंध