Followers

Saturday, 19 September 2020

कॅलिडोस्कोप

 कॅलिडोस्कोप


कॅलिडोस्कोप म्हंटला की लहानपण आठवतं  , छोटे छोटे ,  रंगीत  रंगीत काचांचे तुकडे असलेली एक बासरीसारखी लांब नळी  .  या बासरीमध्ये जेव्हा आपण एका बाजूने बघतो तेव्हा आत दुसऱ्या बाजूला खूप सुंदर आकार दिसतात  आणि ती  हळूहळू फिरवली की आकर्षक सुंदर सुंदर बदलत्या रंगीत आकृत्या दिसत जातात .  सुरुवातीला भावतात त्यातले रंग , आकर्षक रंगसंगती ,  त्यातलं सौन्दर्य , प्रमाणबद्धता  symmetry .  कुणी हातही न लावता हे असे कसे आपोआप सुंदर आकार , रांगोळ्या तयार होतात ? याचं अप्रुपही वाटतं आणि कुतुहलही निर्माण होतं , त्यात आरसे असतात हे जरा नंतरच कळतं .  मग ते स्वतःला तयार करून पहायची इच्छा होते . आरसे हे विशिष्ट कोनात ठेवायचे असतात हेही कुणी सांगितल्याने किंवा वाचल्याने  कळतं . काचेचे रंगीत तुकडे शोधणं , किंवा घरी असलेल्या रंगीत बांगडया , " आता तू या वापरत नाही न अस विचारून " किंवा कधी कधी स्वतःच ठरवून त्यांना या प्रयोगाचा भाग केलं जातं . या सगळ्या प्रक्रियेत खूप मजा येते . आरसा म्हणून वापरण्यासाठी शोधून आणलेले काचांचे तुकडे जरा जपुनच वापरावे लागतात नाहीतर त्यामुळे जर दुखापत झाली तर प्रयोग बंद करण्याची वेळ येते आणि मेहनतीने जमवलेल्या या संपत्तीचा त्यागही करावा लागतो . यावरही उपाय असतोच म्हणा , आहे तो कॅलिडोस्कोप उघडून परत तसाच करून पाहण्याचे उपद्व्याप . ही मात्र एक  फार मोठी जोखीम असते . " हातचं सोडून पळत्याच्या मागे " अशी गत होण्याचीही भीती असते , असो . 


कॅलिडोस्कोप या शब्दासाठी मराठी पुष्कळ समानार्थी शब्द वापरले जाऊ शकतात जस , शोभादर्शक , चीत्ररूपदर्शक , बहुरूपदर्शक , बहुमूर्तीदर्शक . या शब्दांमध्येही अर्थ फार छान प्रतीत होतो . ते खेळणं म्हणजे नक्की  काय हे लगेच कळतं . कालौघात कुठेतरी हे शब्द हरवले म्हणा किंवा विस्मृतित गेले म्हणा , आपण सर्व याला कॅलिडोस्कोप म्हणूनच जास्त पटकन ओळखतो , म्हणूनच की काय या शब्दाचा उपयोग इंग्रजीत जास्त दिसतो . 


कॅलिडोस्कोप शब्द अलंकार , उपमा म्हणून जेव्हा कधी ,  कुठे वापरल्या जातो त्या त्या वेळी तो विभिन्न प्रकारच्या अनेक गोष्टींचा बांधेसूद समूह आणि त्यांचं निरंतर बदलणार स्वरूप याचं प्रतीक असा प्रतीत होतो .  त्या गोष्टी कुठल्याही असू शकतात . बरोबर  ?


कधी विचार करतांना किंवा जुने फोटो पाहतांना अथवा कुणाबरोबर बोलतांना जुन्या आठवणींचे प्रसंग अगदी झरझर एकामागून एक डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे  दिसतात , ते पाहतांना ,त्यावर बोलतांना होणारी  भावनांची  चेहऱ्यावर उमटलेली , मनाला जाणवणारी सरमिसळ आपण सर्वांनी कितीतरी वेळा अनुभवली आहे , हो ना ? अशावेळी  ' kaleidoscope of   emotions ' हा शब्द फार समर्पक वाटतो  . 


जगात कुठेही तुम्ही रहात असाल तरी आजूबाजूला समाजात दिसणारी वैविध्यपूर्ण राहणी , भाषा , कुठलाही सण साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती पाहतांना  ' kaleidoscope of cultures , language असे शब्द आपण नेहमीच ऐकतो किंवा बोलतोही . 


अशी अजून कित्ती उदाहरण देता येतील ,  kaleidoscope of  colours , kaleidoscopic origami , wonderful kaleidoscope of orchestral sound , kaleidoscope of  pattern , kaleidoscopic effect  हे आणि असे कितीतरी. 


तस पाहिलं तर कॅलिडोस्कोप म्हणजे प्रकाश , रंगीत काचांचे तुकडे ,  ठराविक कोनात ठेवलेले आरसे आणि त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश यांचा खेळ . त्यामुळे तयार होणार आणि थोडं हलवल्यावर बदलत जाणारं रंगीत काचेच्या तुकड्यांच प्रतिबिंब . बरोबर ?  प्रतिबिंब हे प्रत्येक  गोष्टीच पडत . म्हणजे पहा हं , पाण्यात आपलं प्रतिबिंब पडतं , आजूबाजूच्या झाडांचं पडतं , आकाशच पडतं ,वरून उडणाऱ्या पक्षांचं पडतं तसच आपण असंही म्हणतो की  त्या त्या भाषांमध्ये , त्या त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या  पुस्तकात   ' त्यावेळच्या समाजाच प्रतिबिंब ' जाणवतं   फक्त त्यासाठी प्रकाश , आरसा , कोन हे निराळे असतात .  


जसं समाजाचं प्रतिबिंब पुस्तक , लोकगीतं , सिनेमा , गाणी अजून इतर गोष्टींमध्ये दिसतं तसच प्रत्येक व्यक्तीच प्रतिबिंब हे त्या व्यक्तीला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या मनातही पडतं . बरोबर ना ?  व्यक्ती एकच ,  ती कधी बाबा/ आई असते तर कधी ती व्यक्ती कुणाचा तरी मुलगा/मुलगीही असते . कुणाची  मित्र / मैत्रीण असते तर कधी कुणाची गुरुही असते .  प्रत्येक व्यक्ती समाजात निरनिराळ्या व्यक्तींबरोबर निरनिराळ्या स्वरूपात संपर्कात येत असते .  मुलगा/ मुलगी म्हणून ती आईबाबांना वेगळी दिसते तर मित्रांसाठी ती अजून निराळी असते . ऑफिस मध्ये सहकाऱ्यांना निराळी दिसते तर त्याच्या employer ला ती वेगळीच भासते . मुलांना निराळी दिसते तर नवरा/ बायको ला निराळी . व्यक्ती असते तर तीच मात्र तिचं प्रत्येकाच्या मनातलं प्रतिबिंब मात्र निराळं असतं . त्या प्रतिबिंबात काही रंग , आकार सारखे असतातही मात्र काही  त्या त्या व्यक्तींनाच दिसतात . 



 कॅलिडोस्कोप मध्ये आरशावर ठराविक  कोनातून  परावर्तित झालेल्या प्रकाशाने पडलेली प्रतिबिंब जशी थोडं थोडं फिरवत गेल्यावर  बदलत जातात तसच एकाच व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीच्या मनात असणार प्रतिबिंब हे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या (दृष्टी) कोनाप्रमाणे , त्यांच्या नातेसंबंधांचा प्रकाश परावर्तित होऊन बदलत जात . प्रत्येक व्यक्ती  एक कॅलिडोस्कोपच  , हो ना ?









#कॅलिडोस्कोप  , #प्रतिबिंब  , #Kaleidoscope  , #Reflection  , #MirrorImage

28 comments:

  1. मनातील बदलत्या प्रतिबिंबांच्या रंगीत आभासी छटा !
    वाह ! 👌👍

    ReplyDelete
  2. 👌🏻👍मला शाळेत गेल्यासारखे वाटले, दरवर्षी मुलांना हा उपक्रम देत असते, मुलंही आनंदाने बनवून कॅलिडोस्कोप चा आनंद घेतात .

    ReplyDelete
  3. वाह! शेवट चा परिच्छेद खूप च समर्पक वाटला.माणसाला दिलेली केलिडोस्कोप ची उपमा योग्य वाटली. आणि शेवटी टाकलेलं छायाचित्र ही भावलं मनाला.अभिनंदन.

    ReplyDelete
  4. Kavita Kamalapurkar
    Tumhi lihilya pramane agadi khara aahe . khupach chan lekha

    ReplyDelete
  5. Vrey impressive blog on topic of kaleidoscope and drawing parallel with human personalities. It's true than each one of us is having different personalities with respect to mainly three attributes, namely role, situation and responsibilities. With different degrees of above three attributes kaleidoscope of human personality changes with respect to the observer. Nothing remains absolute and permanent in personality but alway changes with dynamic nature of observer

    ReplyDelete
  6. So true , your insight is good as always 😊🙏👍

    ReplyDelete
  7. छान खूपच सुंदर भावना आहेत

    ReplyDelete
  8. मानवी भावना, नाती ,वेशभूषा, सण साजरे करण्याच्या पद्धती यांचे आणि कॅलिडोस्कोप चे ..खूपच सुंदर आणि समर्पक सहसंबंध आपण वर्णन केला .आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना कॅलिडोस्कोप हाताळायला देतो ,तयार करायला शिकवतो.पण असा कधी विचार आला नाही. खूप छान.. लेख

    ReplyDelete
  9. बालपणीच्या जत्रेच्या रम्य आठवणीत हरवून गेलो, धन्यवाद

    ReplyDelete
  10. धन्यवाद प्रदीपदादा 😊🙏

    ReplyDelete
  11. खरंच छान... बालपणीच्या आठवणीत न्हाऊन निघालो ... रम्म्य त्या आठवणी... आणि या कॅलिडोस्कोप व त्याची जीवनातील घडामोडी यांची सुरेख मांडणी झाली आहे... असेच नेहमी नविन नविन विषय घेऊन या रटाळ/थांबलेल्या (करोनामुळे) जीवनात नवचैन्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांना एक सलाम...

    ReplyDelete
  12. अप्रतिम वर्णन ! अगदी लहानपणीचा फेरफटका मारून आली मी!!!

    ReplyDelete
  13. वा, कॅलिडोस्कोप शब्द एकच पण तो कितीतरी शब्दांच्या आधी जोडला की त्यातल्या रंगीबेरंगी काचांसारख्याच नानाविध छटा निर्माण होतात. हे खूप सुंदर रीतीने मांडलं आहे.

    ReplyDelete
  14. अप्रतिम माहिती आणि विश्लेषण! मनाशी जोडलेली व्याख्या नवीनच दृष्टिकोण देऊन जाते! अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा

    ReplyDelete