कॅलिडोस्कोप
कॅलिडोस्कोप या शब्दासाठी मराठी पुष्कळ समानार्थी शब्द वापरले जाऊ शकतात जस , शोभादर्शक , चीत्ररूपदर्शक , बहुरूपदर्शक , बहुमूर्तीदर्शक . या शब्दांमध्येही अर्थ फार छान प्रतीत होतो . ते खेळणं म्हणजे नक्की काय हे लगेच कळतं . कालौघात कुठेतरी हे शब्द हरवले म्हणा किंवा विस्मृतित गेले म्हणा , आपण सर्व याला कॅलिडोस्कोप म्हणूनच जास्त पटकन ओळखतो , म्हणूनच की काय या शब्दाचा उपयोग इंग्रजीत जास्त दिसतो .
कॅलिडोस्कोप शब्द अलंकार , उपमा म्हणून जेव्हा कधी , कुठे वापरल्या जातो त्या त्या वेळी तो विभिन्न प्रकारच्या अनेक गोष्टींचा बांधेसूद समूह आणि त्यांचं निरंतर बदलणार स्वरूप याचं प्रतीक असा प्रतीत होतो . त्या गोष्टी कुठल्याही असू शकतात . बरोबर ?
कधी विचार करतांना किंवा जुने फोटो पाहतांना अथवा कुणाबरोबर बोलतांना जुन्या आठवणींचे प्रसंग अगदी झरझर एकामागून एक डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे दिसतात , ते पाहतांना ,त्यावर बोलतांना होणारी भावनांची चेहऱ्यावर उमटलेली , मनाला जाणवणारी सरमिसळ आपण सर्वांनी कितीतरी वेळा अनुभवली आहे , हो ना ? अशावेळी ' kaleidoscope of emotions ' हा शब्द फार समर्पक वाटतो .
जगात कुठेही तुम्ही रहात असाल तरी आजूबाजूला समाजात दिसणारी वैविध्यपूर्ण राहणी , भाषा , कुठलाही सण साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती पाहतांना ' kaleidoscope of cultures , language असे शब्द आपण नेहमीच ऐकतो किंवा बोलतोही .
अशी अजून कित्ती उदाहरण देता येतील , kaleidoscope of colours , kaleidoscopic origami , wonderful kaleidoscope of orchestral sound , kaleidoscope of pattern , kaleidoscopic effect हे आणि असे कितीतरी.
तस पाहिलं तर कॅलिडोस्कोप म्हणजे प्रकाश , रंगीत काचांचे तुकडे , ठराविक कोनात ठेवलेले आरसे आणि त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश यांचा खेळ . त्यामुळे तयार होणार आणि थोडं हलवल्यावर बदलत जाणारं रंगीत काचेच्या तुकड्यांच प्रतिबिंब . बरोबर ? प्रतिबिंब हे प्रत्येक गोष्टीच पडत . म्हणजे पहा हं , पाण्यात आपलं प्रतिबिंब पडतं , आजूबाजूच्या झाडांचं पडतं , आकाशच पडतं ,वरून उडणाऱ्या पक्षांचं पडतं तसच आपण असंही म्हणतो की त्या त्या भाषांमध्ये , त्या त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या पुस्तकात ' त्यावेळच्या समाजाच प्रतिबिंब ' जाणवतं फक्त त्यासाठी प्रकाश , आरसा , कोन हे निराळे असतात .
जसं समाजाचं प्रतिबिंब पुस्तक , लोकगीतं , सिनेमा , गाणी अजून इतर गोष्टींमध्ये दिसतं तसच प्रत्येक व्यक्तीच प्रतिबिंब हे त्या व्यक्तीला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या मनातही पडतं . बरोबर ना ? व्यक्ती एकच , ती कधी बाबा/ आई असते तर कधी ती व्यक्ती कुणाचा तरी मुलगा/मुलगीही असते . कुणाची मित्र / मैत्रीण असते तर कधी कुणाची गुरुही असते . प्रत्येक व्यक्ती समाजात निरनिराळ्या व्यक्तींबरोबर निरनिराळ्या स्वरूपात संपर्कात येत असते . मुलगा/ मुलगी म्हणून ती आईबाबांना वेगळी दिसते तर मित्रांसाठी ती अजून निराळी असते . ऑफिस मध्ये सहकाऱ्यांना निराळी दिसते तर त्याच्या employer ला ती वेगळीच भासते . मुलांना निराळी दिसते तर नवरा/ बायको ला निराळी . व्यक्ती असते तर तीच मात्र तिचं प्रत्येकाच्या मनातलं प्रतिबिंब मात्र निराळं असतं . त्या प्रतिबिंबात काही रंग , आकार सारखे असतातही मात्र काही त्या त्या व्यक्तींनाच दिसतात .
मनातील बदलत्या प्रतिबिंबांच्या रंगीत आभासी छटा !
ReplyDeleteवाह ! 👌👍
धन्यवाद 😊
Deleteहो. खरं आहे.
ReplyDelete👌🏻👍मला शाळेत गेल्यासारखे वाटले, दरवर्षी मुलांना हा उपक्रम देत असते, मुलंही आनंदाने बनवून कॅलिडोस्कोप चा आनंद घेतात .
ReplyDeleteखुप छान उपक्रम 👍😊
Deleteवाह! शेवट चा परिच्छेद खूप च समर्पक वाटला.माणसाला दिलेली केलिडोस्कोप ची उपमा योग्य वाटली. आणि शेवटी टाकलेलं छायाचित्र ही भावलं मनाला.अभिनंदन.
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteछान लेख!!
ReplyDeleteधन्यवाद 😊
DeleteKavita Kamalapurkar
ReplyDeleteTumhi lihilya pramane agadi khara aahe . khupach chan lekha
😊🙏
DeleteVrey impressive blog on topic of kaleidoscope and drawing parallel with human personalities. It's true than each one of us is having different personalities with respect to mainly three attributes, namely role, situation and responsibilities. With different degrees of above three attributes kaleidoscope of human personality changes with respect to the observer. Nothing remains absolute and permanent in personality but alway changes with dynamic nature of observer
ReplyDeleteSo true , your insight is good as always 😊🙏👍
ReplyDeleteछान खूपच सुंदर भावना आहेत
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteमानवी भावना, नाती ,वेशभूषा, सण साजरे करण्याच्या पद्धती यांचे आणि कॅलिडोस्कोप चे ..खूपच सुंदर आणि समर्पक सहसंबंध आपण वर्णन केला .आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना कॅलिडोस्कोप हाताळायला देतो ,तयार करायला शिकवतो.पण असा कधी विचार आला नाही. खूप छान.. लेख
ReplyDeleteधन्यवाद 👍🙏😊
ReplyDeleteबालपणीच्या जत्रेच्या रम्य आठवणीत हरवून गेलो, धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद प्रदीपदादा 😊🙏
ReplyDeleteखरंच छान... बालपणीच्या आठवणीत न्हाऊन निघालो ... रम्म्य त्या आठवणी... आणि या कॅलिडोस्कोप व त्याची जीवनातील घडामोडी यांची सुरेख मांडणी झाली आहे... असेच नेहमी नविन नविन विषय घेऊन या रटाळ/थांबलेल्या (करोनामुळे) जीवनात नवचैन्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांना एक सलाम...
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
ReplyDeleteअप्रतिम वर्णन ! अगदी लहानपणीचा फेरफटका मारून आली मी!!!
ReplyDeleteMi Anita
Deleteधन्यवाद 😊
Delete👍
Deleteवा, कॅलिडोस्कोप शब्द एकच पण तो कितीतरी शब्दांच्या आधी जोडला की त्यातल्या रंगीबेरंगी काचांसारख्याच नानाविध छटा निर्माण होतात. हे खूप सुंदर रीतीने मांडलं आहे.
ReplyDelete😊👍🙏
Deleteअप्रतिम माहिती आणि विश्लेषण! मनाशी जोडलेली व्याख्या नवीनच दृष्टिकोण देऊन जाते! अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा
ReplyDelete