शिक्षण
भारतात आपण सगळे डॉ . राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षकदिवस म्हणून साजरा करतो . जगात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी शिक्षकदिवस साजरा केल्या जातो . काही देश ' युनेस्को ने घोषित केलेल्या 'World Teachers Day' म्हणजेच 5 ऑक्टोबर ला साजरा करतात .
ज्यांनी आपल्याला शाळेत , कॉलेज मध्ये शिकवलं आहे किंवा जे आपल्या ओळखीचे लोक शाळेत कॉलेज किंवा अजून कुठे शिक्षक म्हणून शिकवतात त्यांच आपण त्यादिवशी अभिनंदन करतो . त्यांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देतो , काय बरोबर ना ?
शिक्षक कोण ? तर शिक्षण देणारा शिक्षक . ही झाली साधी सोपी सरळ व्याख्या . कित्ती वेळा जाणवतं आपल्याला , अरे हे शिकायला हवं , ते राहीलच शिकायचं . जगात इतकी ज्ञानसंपदा आहे की एखाद्याने आयुष्यभर ज्ञान संपादन करत राहायचं ठरवलं तरी आयुष्य कमी पडेल .
शिकणे ही एक मानसशास्त्रीय क्रिया आहे तर शिक्षण या संकल्पनेची व्याप्ती खुप मोठी आहे . शिक्षण हे शाळेबरोबर संपत नाही , तर ते शाळेबाहेरही जन्मभर सुरूच असत .
संपूर्ण आयुष्यात मनुष्य खूप निरनिराळ्या प्रकारच शिक्षण घेतो . बरोबर ना ? तस जर पाहिलं तर शिक्षण हे जन्म झाल्यापासूनच सुरू होत . सुरुवात होते ती मोकळ्या हवेत श्वास घेण्यापासून . मग हळूहळू भूक लागल्यावर रडल की कोणीतरी जेवायला देत , जवळ घेत हे कळत . हे शिकण्यासाठी कुठल्या शाळेत जावं लागतं नाही . हळूहळू ते बाळ शिकत जातं . इतकचं कशाला छोटं कुत्र्याचं , मांजरीच पिल्लू सुदधा घरी आणलं की ते ही छोट्या छोट्या गोष्टी शिकतं . कोण जेवायला देतं , कधी देत , कोण लाडवत , कोण खेळत , कोण फिरायला नेत . हो ना ? अर्थात त्या मुलांना किंवा छोट्या पाळीव प्राण्यांना काही सवयी लावण्यासाठी शिकवावं लागतं . ते ही एक प्रकारचं शिक्षणच आहे . हे शिक्षण घरात आई , बाबा , आजी , आजोबा इतकंच काय कधी कधी मोठा भाऊ बहीण सुदधा देतात .
मुलं थोडी मोठी झाली की शाळेत त्यांना शिक्षक तर शिकवतातच पण बऱ्याच गोष्टी ते मित्रांकडून ही शिकतात . हो ना ? . कधी त्या चांगल्या सवयी असतात तर कधी वाईटही . भाषा असो , गणित असो की विज्ञानाचा किचकट न समजलेला पाठ ......हे सुदधा शाळेत एकमेकांना शिकवल्या जातं . हेही शिक्षणच आहे आणि ते शिकवणारा शिक्षक हा कधी मित्र असतो तर कधी आईबाबा , दादा , ताई तर कधी घरचें किंवा शेजारी राहणारे काका काकू तर कधी आजोबा आजी देखील असतात , बरोबर ना ?
शाळा कॉलेज संपल्यावर नौकरी करतांना काही बाबी शिकत जातो आपण आपल्या सहकाऱ्यांकडून , कधी boss कडून तर कधी अगदी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून सुद्धा . ज्या गोष्टी पटतात , मनाला भावतात , आवडतात त्या आपसूक शिकल्या जातात मात्र काही गोष्टी आपल्याला आपलं काम सुकर करायला शिकाव्या लागतात तर कधी त्या आपल्याला नौकरीत , व्यवसायात आवश्यक असणाऱ्या असतात . त्या प्रयत्न करून शिकाव्या लागतात , बरोबर ना ?
विचार करता करता कित्ती लोक आठवतील आपल्या सर्वांना ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलो आहे , मग ती लहानपणी शिकलेली कागदाची नाव असो की ऑफिस मध्ये computer वर लिहितांना उपयोगी असणारी एखादी trick .
आपण फक्त लोकांकडूनच शिकतो का ? प्राण्यांकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असत . त्यांच्या कडून सगळयात महत्वाचं शिकण्यासारखं असत ते म्हणजे गरजेपुरते खाणं . कुठलाही प्राणी हा भूक नसतांना खात नाहीं . काय , बरोबर ना ?
वृक्ष असोत किंवा छोटी झाडं , त्यांच्या आयुष्यभर ती फक्त दानच करत असतात . कुणी सावली देतील तर कुणी दुसऱ्या प्राणांना अन्न तर कुणी सुगंधी फुल तर कुणी काही . जे आहे ते आनंदाने भरभरून देऊ करणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे .
पाणी मार्गात कितीही अडथळे आले तरी मार्ग काढून पुढे जात राहतं , हे पाण्याकडून शिकण्यासारखं आहे . इतका विशाल समुद्र , त्याची सर्वकाही सामावून घेण्याची वृत्ती शिकण्यासारखी आहे . डोंगरांची ऊन, पाऊस , थंडी अश्या आलेल्या सर्व परिस्थितीत निश्चल उभं राहण्याची वृत्ती शिकण्यासारखी आहे . निसर्ग आणि निसर्गातल्या छोट्या मोठ्या प्रत्येकाकडे मग ती जैविक असो अथवा अजैविक , काही न काही शिकण्यासारखं नक्की आहे जे त्याच्याकडून आपण शिकायला हवं . हो ना ?
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण . शिक्षित व्यक्तीला सुसंस्कारांची जोड देऊन सुशिक्षित बनवते ते शिक्षण . शरीराला श्रमाकडे , बुद्धीला सत्याकडे आणि भावनेला माणुसकीकडे वळविणे म्हणजे शिक्षण . शिक्षण हा एक आयुष्यभर सुरू असणारा प्रवास आहे . काय वाटतं तुम्हाला ?
#शिक्षकदिवस , #WorldTeachersDay , #शिक्षकदिन ,

मस्तच!💐
ReplyDeletedhanywad
Deleteनमस्कार! खूपच छान लेख! साध्या सोप्या शब्दात खूप काही सांगितले...! खूप खूप शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
ReplyDeleteछान अतिशय, साधे, सुटसुटीत मस्त लिखाण👍
ReplyDeleteधन्यवाद 😊
ReplyDeleteशिक्षणा बद्दल चे विचार वास्तव..
ReplyDeleteव्यापक विषयास शब्दांच्या कवेत कुशलतेने घेणे तुझ्या कडून शिकावे.
🙏😊
ReplyDeleteशिक्षण आणि शिक्षक यांचे मानवी जीवनात खुप महत्त्व आहे हे कोणी नाकारू शकत नाही... मनुष्याचे आयुष्य शिकण्यातच जाते अगदी शेवट पर्यंत तो शिकतच राहतो आणि हे व्रत जो प्रामाणिकपणे अंगिकारतो त्यांचे आयुष्य सुखी आणि समृध्द होते... असो छान कल्पना आणि त्यानुरूप मांडणी सुद्धा.
ReplyDelete😊🙏
ReplyDeleteMast surekh
ReplyDelete