भाषा
भाषेची साधी व्याख्या म्हणजे आपल्या अंतरंगातील मनोगत , भावना , विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन . थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे . हो न ? या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली.
अक्षर अक्षर जोडलं की शब्द तयार होतात . शब्द शब्द जोडले की वाक्य तयार होतं . वाक्य वाक्य जोडत गेलं की तयार होते भाषा .
अक्षर आणि शब्द जोडणं जेवढं महत्वाचं तेवढच तो बरोब्बर म्हणणंही . बरोबर न ? प्रत्येक अक्षराचा , शब्दांचा उच्चार कसा करावा याचं एक सुंदर प्रात्यक्षिक मी इतक्यातच पाहिलं , ऐकलं आणि लक्षात आलं की या आधी इतक्या महत्वाच्या गोष्टीकडे कधी मी लक्षच दिलं नव्हतं . कधी कुणी लक्षात आणूनही दिलं नव्हतं . त्यामुळे माझे उच्चार स्पष्ट आहेत असा (गैर) समज होता माझा .
संत तुकाराम म्हणतात ,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शास्त्रे यत्न करू ।।1।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोका ।।2।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देची गौरव पूजा करू ।।3।।
संत तुकाराम म्हणतात ,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शास्त्रे यत्न करू ।।1।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोका ।।2।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देची गौरव पूजा करू ।।3।।
हे सगळं जाणवलं जेव्हा अनघा मोडक यांच्या संवादशाळेत मी गेले . शाळेच्या पहिल्याच दिवशी माझं स्वतःच्या स्पष्ट उच्चारांबद्दल असलेलं मत स्पष्ट बदललं . कोणताही शब्द बोलतांना प्रत्येक अक्षर कस उच्चारावं , आद्याक्षरांपासून ते ओष्ठव्य , कंठव्य , तालव्य अशी सगळी वेगवेगळी अक्षरं कशी उच्चारावीत याच प्रात्यक्षिक पाहिल्यावर जाणवलं , कित्ती शिकायचं आहे अजून आपल्याला .
भाषा म्हणजे फक्त अक्षर , शब्द , वाक्य , विरामचिन्हे इतकंच आहे का ? अक्षरांचे तयार केलेले शब्दरुपी मणी एकसारखे माळेत गुंफले गेले की ती मोहक वाटते . ते मणी जर चकाकते मोती असतील तर क्या बात है . या माळेत असूनही न दिसणारा आणि त्या सर्व मोत्यांना बांधून ठेवणारा भावरुपी धागा हा त्या मौक्तिक माळेच सौन्दर्य अजूनच वाढवतो . तो धागा साध्या दोऱ्याचा असो , रेशमी असो ,चांदीचा अथवा सोन्याचा . तो फक्त नाजूक , सुबक असून चालत नाही . सर्व मोत्यांना एकत्र धरून ठेवण्यासाठी , हवं तिथे वळवण्यासाठी तो मजबूतही असावा लागतो आणि लवचिकही . शब्द अर्थ जरी सांगत असले तरी ते बोलतांना त्यात उमटणारा भावही तेवढाच महत्वाचा असतो . वाक्य बोलतांना एखाद्या अक्षरावर , शब्दावर उच्चारतांना दिलेला जोर त्या त्या शब्दाचं वजन वाढवतात , त्यातला भाव प्रकट करतात तर कधी एखाद्या अक्षरावर किंवा शब्दावर दिलेल्या चुकीच्या जोरामुळे त्या शब्दाचं वजन कमी करतात तर कधी त्यात चुकीचा भाव उतरवतात , जो काही वेळा बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातही नसतो .
जगात कुठल्या भाषा बोलल्या जातात अस कुणी कधी विचारलं की लगेच मराठी , हिंदी , संस्कृत , उर्दू , तेलगू , कानडी , इंग्रजी , जर्मन , फ्रेंच , रशियन अशी उत्तरच पटकन मनात येतात . वेगवेगळ्या जाती , धर्मांच्या , देशांच्या , प्रदेशांच्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरी कुणी जसं म्हंटलय तस प्रत्येक 10 मैलांवर भाषा बदलत जाते . बरोबर न ? प्रत्येक भाषेला स्वतःचा एक बाज असतो , एक नाद असतो , एक लय असते . ती भाषा ऐकतांना लगेच लक्षात येते . अगदी एकाच मोठया शहरात राहणारे लोक सुद्धा निरीक्षण केलं तर नक्की शहरातल्या कुठल्या भागात राहत असतील हेही ओळखता येत . अर्थात बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचही आपल्याला दिसून येत.
हे सगळं असलं तरी थोडा अजून विचार केला तर वाटतं , खरंच जगात इतक्याच भाषा आहेत का ? अजून कितीतरी भाषा आपण सगळे लहानपणापासून ऐकतो , पाहतो आणि बोलतो . टारझन आणि मोगली यांची भेट TV आणि पुस्तकांमधून झाल्यावर तर त्यांच्या त्या जंगलात राहण्याचं , पशुपक्ष्यांशी बोलण्याचं आकर्षण इतकं जास्त असतं की वेगवेगळे आवाज काढून भरपूर प्रयोगही केल्या जातात . बरोबर न ?
स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी कित्ती भाषांचा प्रयोग आणि उपयोग सर्व प्राणिमात्र करतात . करपल्लवी , नेत्रपल्लवी , स्पर्शाची भाषा , नजरेची भाषा , प्रेमाची भाषा , देहबोली , शाळेत असतांना आपण सर्वांनी बोललेली पम ची भाषा , सांकेतिक भाषा , पशुपक्ष्यांची भाषा , सध्या प्रचलित असणारी संगणकाची भाषा या आणि अशा अजून खूप भाषा . काही भाषा या आपोआप येतात , काही निरीक्षण करून येतात तर काही शिकाव्या लागतात . काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी विशिष्ट शब्द , विशिष्ट खुणा अथवा संकेत किंवा टाळ्या , शिट्ट्यांचे आवाज , प्राण्यांचे आवाज हेही वापरल्या जातात .
छोटं बाळही भूक लागली की त्याच्या भाषेत बरोब्बर दूध हवं हे सांगत . इतकंच कशाला जर आपल्याघरी पाळीव प्राणी असेल तर तो आपले शब्द , भाषा थोड्याच दिवसात समजू लागतो . तसच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव , त्याला काय सांगायचं आहे मग ते म्याव म्याव असो , भु भु असो , हंबा असो किंवा अजून काही आपल्यालाही त्याची भाषा हळूहळू समजू लागते . प्रकाश आमटे किंवा अजून तत्सम लोक वाघाच्या , सिंहाच्या डरकाळ्या , माकडाचे चित्कार तसच अजूनही निरनिराळ्या प्राण्यांना काय म्हणायचंय हे त्यांच्या आवाजावरून , देहबोलीवरून , हालचालींवरून समजू शकतात . ते प्राणीही या लोकांची भाषा समजतात . एकमेकांशी बोलण्यासाठी दोघांची भाषा एकच असावी असा काही नियम नाही . हो न ?
हा विचार मनात आल्यावर हेही लक्षात येत की भाषा ही फक्त आवाजाने , खाणाखुणा करून किंवा स्पर्शानेच बोलली जाते असंही तर नाही . ती ओळखलीही जाते . आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे कळण्यासाठी भाषेची गरज भासत नाही . मनाने मनाशी बोलण्याची भाषा ही न शिकवताच येते . आपल्या लोकांबरोबर ती बोलता यायला हवी , त्यांची समजायला हवी , आणि त्यांच्या पर्यंत ती पोहोचवताही यायला हवी . काय ? वाटतं न असं ?
मनापासून व्यक्त केलेली आपल्या मनाची भाषा लोकांच्या मनापर्यंत पोहीचवण्यात आणि त्यांनी बोललेली भाषा ओळखण्यात आपण सर्व यशस्वी होऊ हीच मनीषा .
#computerlanguage, #संवादशाळा,
#computerlanguage, #संवादशाळा,

👌👌👍💐
ReplyDelete👍🙏😊
Deleteअतिशय सुंदर ब्लॉग! भाषेविषयी परिपूर्ण छान विश्लेषण!
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
Delete👌भाषा ज्ञान
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteवाचनीय , मननीय ,सुंदर विश्लेषण
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
Deleteखुप छान !!
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
Deleteशब्दातीत चौफेर विचार...
ReplyDelete🙏😊
DeleteKavita Kamalapurkar
ReplyDeleteBhashecha varnan tumhi tumchya likhanat khupach sunder ritya varnan kelat .
Dhanyawad 🙏😊
ReplyDeleteखुपच छान,खरच भाषेत शब्दांच्या उच्चाराला किती महत्त्व आहे. अत्यंत माहिती पूर्ण लेख .....
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteवा मस्तच
ReplyDeleteमनापासून व्यक्त केलेली आपल्या मनाची भाषा.....अगदी बरोबर ही कळली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात
डोकं शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत
भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत
छान लिहिलंय
👌👌 धन्यवाद 🙏😊
DeleteWow.... छान.. भाषा या विषयी एवढे लिहीता येते हेच कल्पनेच्या बाहेर आहे... छानच लिहिलंय...
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
DeleteGood insight on "language". Every language as a tool has undercurrent of emotions and belongingness which immediately gets into action when two people speak same language. It can also be tool of generating hate in the hands of, specially politicians too. IMHO, another perspective is that languages being a twin edged tool, must be used only as tool to integrate people pan India than forcing one language. Adopting words from different languages can only enrich it as different words in languages have different shades of emotions and belongingness.
ReplyDeleteso true 👌🙏😊
Delete