फुलपाखरू
पावसाळा सुरू झाला तशी सगळी झाडं कशी आनंदून गेली . प्रत्येक पानांवरून ओघळणारे थेंब जणू त्यांचे आनंदाश्रूच . तप्त उन्हाळ्यात तापल्यावरही सर्वांना सावली देणाऱ्या झाडांनी पावसाने भागलेल्या तृष्णेनंतर व्यक्त केलेला आनंदच तो . ती टवटवीत झालेली झाडं आणि त्यावर आता नव्याने फुललेली फुल . बागेत अगदी आनंदोत्सव साजरा होतोय असंच वातावरण निर्माण झालय .
कुठलाही आनंदोत्सव साजरा होतांना त्यात आजूबाजूचे सगळे सामील होणारचं , हो न . यात प्रामुख्याने दिसायला लागली आहेत फुलपाखर . काही पिवळ्या रंगांची , काही पोपटी , काही काळी त्यावर रंगीत ठिपके असलेली , काही राखाडी रंगांची , काही निळी आणि त्यावर पिवळे ठिपके असणारी , अशीच आणि अजून कितीतरी . काही लहान काही मोठी . कित्ती कित्ती प्रकार आणि रंग . सगळेच सुंदर . जेव्हा ते पानांवर किंवा फुलांवर बसतात तेव्हा फुलपाखरू तर सुंदर दिसतच तसच ते त्या पानांचही सौन्दर्य वाढवत .
या फुलपाखरांच या फुलांवरून त्या फुलांवर उडत जाण पाहतांना कस सगळं विसरल्या जातं , वेळ , काळ आणि आपलं वयही . त्यांचं सौन्दर्य , त्यांचे नाजूक पंख , त्यांची ती भिरभिर उडणारी आकृती , छोटी पतंगच जणू. त्यांना मांजा बांधलेला नसतो इतकंच . त्यांना दोरी बांधून स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे उद्योग लहानपणी करायचा प्रयत्न केल्याचं आठवतंय सगळ्यांना , हो न . फुलपाखराला हातात घेण्यासाठी किमान त्याच्या मखमली पंखांना जवळून पाहायला मिळाव म्हणून अगदी दगड , काटे बोचण्याची पर्वा न करता त्याच्यामागे जाणं हे त्यावेळचे छंद . त्यावेळी अस वाटत की हे फुलपाखरू माझा मित्र असावं . त्याने माझ्या खांद्यावर बसून राहावं . त्याने मला सोडून कुठेही जाऊ नाही , हो न . केलेत
आपण सगळ्यांनीच असे उपद्व्याप . असो .
फुलपाखरू पाहतांना मला नेहमी शाळेतली श्री ग . हा . पाटील यांची फुलपाखरू ही #कविता# आठवते
फुलपाखरू । छान किती दिसते ।फुलपाखरू।।
या वेलींवर । फुलांबरोबर गोड
किती हसते । #फुलपाखरू #।
पंख चिमुकले । नीळेजांभळे ।
हलवूनी झुलते । फुलपाखरू ।
डोळे बारीक । करिती लुकलूक ।
गोल मणी जणू ते । फुलपाखरू ।
मी धरू जाता । येई न हाता ।
दूरच ते उडते । फुलपाखरू ।
अगदी असच वाटत न फुलपाखरु पाहिले की . या कवींनी कित्ती साध्या , सोप्या शब्दात लहानपणी मुलांना जे वाटतं त्याच वर्णन केलंय , व्वा .
फुलांवर असतांना फुलपाखराने पंख उघडझाप करत तिथे बसून राहणं आणि आपण जवळून पाह्यला गेल्यावर पटकन उडून दुसऱ्या फुलावर जाऊन बसणं , सगळंच कस मोहक . हा मोहकपणा तर मनाला भावतोच त्याच बरोबर भावतं त्याच स्वछंदी बागडणं . काय होत न असं . त्याच बागेत बागडणं पाहून मनाला खरंच खुप निखळ आनंद मिळतो .
आत्ता आपल्याला दिसतात आहेत ती फुलपाखर . त्या आधी काही दिवसांपूर्वी आपल्याला अळी किंवा #सुरवंट# म्हणू आपण , जेव्हा आपल्या बागेत एखाद्या झाडावर दिसला / ली तेव्हा ? तेव्हा आपली प्रतिक्रिया काय होती ?
" अरे बापरे आता ही अळी झाडांची पान खाऊन टाकेल सगळी " अस म्हणून मग आपण त्या अळीला काडीवर किंवा पानावर उचलून बाहेरच्या कुठल्याश्या साध्या झाडावर ठेऊन देतो , ज्या झाडापासून आपल्याला काही नकोय . करतो न अस आपण सगळे ? यात काही चूक आहे असं म्हणत नाही मी . अळी आवडत नाही आपल्याला हे मात्र खरं . पानं खाते म्हणूनही आणि तीच त्यावेळेच रूपही आपल्या मनाला फारसं भावतं नाही .
फुलपाखराच्या आयष्यात चार अवस्था असतात . सुरुवातीला अंडी मग अळी त्यानंतर #कोष# आणि शेवटी फुलपाखरू . बरोबर ? पानांमागे कधी अंडी दिसली तरी ते पान आपण झाडावरून काढून दुसरीकडे नेऊन ठेवतो . अळी दिसली कधी पानांवर तरी तेच करतो . कोष दिसला तर मात्र आपण त्याला काही करत नाही . का ? तर आपल्याला माहिती असतं की याचा आपल्या झाडांना आता काही त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून आज न उद्या फुलपाखरू बाहेर येणार . जे पाहायला आपल्याला नक्कीच आवडत . बरोबर न . मग तर आपण अगदी वाट पाहू लागतो . रोज तो कोष कसा आहे , फुटला का ? त्यातून कुठल्या रंगाचं फुलपाखरु बाहेर येतंय याकडेही आपलं लक्ष असतं , हो न .
succcess आवडतो सगळ्यांना मात्र त्यामागची मेहनत , धडपड नजरेआड करतो आपण . कुणीतरी म्हटलंय न " there is no shortcut to success "
फुलपाखरांच्या अंड ते फुलपाखरू हा प्रवास खरंतर फार खडतर असतो . त्याच्या सगळ्या अवस्था पाहायला आपल्याला आवडत नाही , आवडतं ते फक्त फुलपाखरू. त्याच्या जवळ गेलं की ते उडून दुसरीकडे जाऊन बसत . हातात येत नाही . हात लावू देत नाही . जवळ येऊ देत नाही . त्याला आठवत तर नसेल त्याच्या आधीच्या अवस्थेत त्याला आपण दूर केलेलं ?
हेच आणि कदाचित असच आपण दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी वागतांना तर करत नाही ना ? आपलं लक्ष असतं फक्त यशस्वी लोकांकडे . फुलपाखरांच्या बाकी अवस्था जशा आपण दूर ठेवायचा प्रयत्न करतो तसच आपण दैनंदिन जीवनात करतोय का ?
काय वाटतं तुम्हाला ?
#butterfly, #फुलपाखरूकविता,
#butterfly, #फुलपाखरूकविता,

खरय मैथिली । फुलपाखरू किती छान लिहिले आहेस...
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
DeleteThat's simple and sweet ...nice observations
ReplyDeleteThank you so much 😊
DeleteKhupach sunder lihilat vahini
Deleteधन्यवाद
Deleteसुंदर... शेवटच्या ओळी मनाला स्पर्शून गेल्या 🙂
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteसुंदर... शेवटच्या ओळी मनाला स्पर्शून गेल्या ����
ReplyDeleteवा खूपच छान लिहिल आहेस वहिनी 👌👍
ReplyDeleteखूपच छान लिहिल आहेस वहिनी 🙂👌👍
ReplyDelete🙏😊
DeleteKeen observation on lifestyle of the butterfly and it's parallel to the journey of most of us from struggle to success. Many People will come to you when you are successful but very few will be supporting us during struggle to achieve that success. In fact many will try to pull you back and discourage during struggle and very few will support and encourage you
ReplyDeleteso true 👌👌🙏😊
Deletechhan lihile v nirikshan pan chhan.
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteखुप छान लेख फुलपाखरू ......मैथिली, सुंदर लिखाण बेटा.....
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
ReplyDeleteVicharanchi khup sunder mandani..Fulpakhrachya vagnyachi manavi svabhavashi keleli tulna ullekhaneeya ahe..
ReplyDeleteDhanywad 🙏😊
Deleteधन्यवाद 😊
ReplyDelete