वाद संवाद
The real in us is silent , acquired is talkative ...Said khalil Gibran
हे वाक्य एका ठिकाणी लिहिलेल वाचलं , आवडलं . खूप छान वाटतं न वाचायला पण बोलल्याशिवाय राहवत नाही आपल्या सगळ्यांना . बर जे बोलायचं असतं ते पटकन बोलतो का आपण ? तर नाही , जो मुद्दा मांडायचा आहे त्यावर पोहोचायला पण खूप मोठी प्रस्तावना केल्याशिवाय सांगण्यात काय गम्मत असही वाटतं , हो न .
बोलता येणं हे मनुष्याला मिळालेलं वरदान आहे . स्वतःला काय वाटत , काय म्हणायचं आहे हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हाही एक मनाला विसावा देणारा व्यायाम आहे . व्यायाम म्हंटलं न मी ? हो व्यायामच . जसं शारीरिक व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते तशीच मदत बोलल्याने , आपल्याला काय म्हणायचं आहे हे दुसऱ्यांना सांगितल्याने होते , खरं न ? कुणी बोलायला नसेल , किंवा कुणी आपलं ऐकणारा नसेल , कुणाला आपण सांगितलेलं काही पटतच नाही , कुणी आपलं ऐकतच नाही अस त्या व्यक्तीला वाटत असेल तर त्याच मन तेवढ सुदृढ राहत नाही , बरोबर .
कुणाबरोबर तरी संवाद साधावा अस वाटणं ही सर्वांची गरज आहे आणि संवादात वाद समाविष्ट आहे हे तर आपण सगळ्यांनी गृहीतच धरलंय त्यामुळे वाद जास्त वेळा होतात , संवाद कमी वेळा . होत न अस . चारजण जमले असतांना सगळे बोलू लागतात आणि मग सुरू होते आधी माझं ऐक ची race . मी बोलतो तू फक्त हु म्हण . असो तर ही race जशी सुरू होते तस मग सुरू होतं तुझं बरोबर की माझं बरोबर ही race .
वादे वादे जायते तत्वाबोध: ।
वाद केल्याने चांगले तत्वविवेचन होऊन ज्ञानवर्धन होते
यातला वाद आणि आपण सगळे एकमेकांबरोबर घालतो तो वाद फार निराळे आहेत हो न ?
कधी छोट्या मुलांनी त्यांना न पटलेली गोष्ट का करायची अस विचारलं की मोठे म्हणतात जास्त प्रश्न विचारू नको , जे सांगितलं ते कर , वाद घालू नको . त्यामुळे त्यांची जिज्ञासा तर मारली जाते आणि त्याबरोबर लुप्त होतं ज्ञान . प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही कारण असतं . ते ज्ञान जर पुढे गेलंच नाही तर लोप पावणारच . असो .
कुठलीही व्यक्ती वाद घालतांना तिला काय वाटतंय ते दुसऱ्यांना सांगत असते कान बंद करून . मात्र संवाद करतांना कान , डोळे आणि मेंदू या सगळ्यांचा उपयोग त्या व्यक्ती करत असतात . संवाद करतांना Eye contact ही तेवढाच महत्वाचा असतो . बरोबर न .
संवाद करता करता गाडी कधी वादाच्या दिशेकडे जाते हे लक्षात येत नाही .
संवाद म्हणजे विविध प्रकारचे विचार, माहिती, कल्पना, भावना आणि जाणिवांचे आदान- प्रदान . तसेच संवाद म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा अनेकांकडे आपले म्हणणे अनुरूप माध्यमांव्दारा पोचवणे.
संवाद म्हणजे अशा आदान- प्रदानाची, अनुरूप माध्यमांव्दारे आपले म्हणणे पोहचविण्याचे कलाशास्त्र आणि कौशल्य .
वाद घालण्याचे कौशल्य लवकर आत्मसात होत मात्र संवाद करण्याचं कौशल्य हे शिकावं लागतं . ते आत्मसात करण्यासाठी मेहनत करावी लागते . संगीतातही वादी संवादी स्वर असतात . तिथे मात्र वाद जास्त महत्वाचा असतो , राजाच म्हणा न आणि संवादी हे त्याचे मंत्री . एखाद्या रागाची चाल स्पष्ट करण्यासाठी संवादी स्वर वादी स्वरांना मदत करतात याउलट बोलतांना वादापेक्षा संवाद जास्त महत्वाचा असतो . जसे संगीतात राग शिकतांना वादी संवादी स्वर लिहून , लक्षात ठेवून , पाठ करून , संगीत शिकायला सुरुवात केली जाते तशीच सुरुवात बोलण शिकतांना वाद आणि संवाद यांचेही स्वर लिहून मिळाले , पाठ करता आले आणि शिकता आले तर ?
तर वाद , संवाद कसा छान होईल याची दिशा स्पष्ट करतील . हो न ? मंत्र्यांच काम राजाला मदत करणं हेच तर आहे , काय वाटतं तुम्हाला ?
##वादसंवाद, #वादेवादेजायतेतत्वाबोध:,

वाह... छान 💐
ReplyDelete😊🙏
Deleteवाद संवाद छान लिहिले आहेस हे मात्र निर्विवाद....
ReplyDelete👌😊👍
DeleteChaan lihila ahes....keep it up 👍
ReplyDeleteधन्यवाद 😊
DeleteChaan lihila ahes....keep it up 👍
ReplyDelete👍😊
Deleteखरंच आहे. आपल्या बोलण्यात फाफट पसारा खुप असतो. Management मध्ये खुप आधी one minute manager ही concept ऐकली होती पण भारतात कधीच लागु पडली नाही.
ReplyDeleteबाकी घरी आपण संवाद करायला जा आणि आपली जोडीदारीण कोणत्या बिंदु पासुन त्याला वादाच स्वरूप देईल हे ब्रह्मदेवाला पण सांगणं कठीण आहे.
पण एकंदरीत मस्त लिहिलं आहे.
😊👍
Deleteवाद घालण्यात वेळ घालवण्यापेक्षा संवाद वाढवण्यास जासतीतजास्त वेळ कसा देता येईल याचा विचार होणे जास्त गरजेचं आहे... असे वाटते....त्यातूनच नवीन वाटा निघु शकतात....
ReplyDeleteखरंय ,👌👍
Delete😊👌👍
ReplyDeleteखुप छान...... सुंदर..।।।।
ReplyDeleteखुप छान ......सुंदर.
ReplyDeleteधन्यवाद 😊
Delete