Followers

Sunday, 19 July 2020

प्रश्न

प्रश्न


आता तुम्हाला वाटेल ,  प्रश्न हा काय विषय आहे ब्लॉग लिहीण्याचा ? खरतर आज प्रश्न पडला होता मला की लिहायला कुठला विषय निवडावा  ?  वाटलं प्रश्न पडणं हे तर ज्ञानवर्धनाच पहिलं पाऊल . पहिलं पाऊल पुढे पडलं की आपोआप दुसरं पडतच आणि मग ज्ञानवर्धनाकडे हळूहळू वाटचाल सुरू होते , बरोबर न . त्यामुळे आज म्हंटल करू या  आपणच आपलं ज्ञानवर्धन .

एक साधासा प्रश्नही कित्येक , अनेक  नवनवीन उत्तरे निर्माण करतो आणि त्यातूनंच मग पुन्हा अनेक वेगवेगळे प्रश्नही उभे रहातात.

प्रश्न का पडतात ? कुणाला पडतात ?  केव्हा पडतात ? हे प्रश्न जेव्हा मला पडले तेव्हा एक जुनं गाणं आठवलं ,

" ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? " इतकंच नाही तर प्रत्येक प्रश्न का पडतो याचे एक मजेदार उदाहरण ही आठवलं लगेच आणि आठवल्यावर असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे असंही वाटल .

एकदा काय झालं आमच्या बाजूला राहणाऱ्या 2,3 वर्षाच्या छोट्या मुलीचा रडण्याचा आवाज येत होता . आधी वाटलं काहीतरी हट्ट करत असेल पण ती सारखी काहीतरी सांगतेय अस वाटलं म्हणून पाहायला गेलो . ती रडत रडत सांगत होती की दुपारी तिनी बर्फ संपून जाईल . बाबांना मिळणार नाही या विचाराने दाराच्या मागे बाबांना ऑफिस मधून आल्यावर द्यायला वाटीत बर्फ लपवून ठेवला होता .  आता तो तिथे नाहीये . झालं असं की त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते . घरात  बर्फ सारखा सगळ्यांना हवा असायचा आणि त्यामुळे संपायचा  . आता त्या लपवून ठेवलेल्या वाटीतल्या  बर्फाच  झालं पाणी . तिची आई तिला हे सांगायचा आटोकाट प्रयत्न करत होती की अग बर्फाच पाणी झालं . बर्फ कसा राहील दिवसभर ?  आईच्या दृष्टीने ही साधी गोष्ट होती पण मुलीला  ते काही पटत नव्हतं . त्यामुळे हे असे प्रश्न  पडतात हे मला एकदम पटलं  ,  ये क्या हुआ ? कैसे हुआ ? गंमत अशी की तिच्या बालमनाला हे काही केल्या पटत नसल्याने  पुढचे प्रश्न तिला नक्की पडले असावेत , कब हुआ ? क्यू हुआ ? कारण मी तर इथे बर्फ ठेवला होता मग बर्फाच पाणी झालं केव्हा  ? आणि का ?  एकीकडे मजा वाटत होती तर दुसरीकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला समजेल अशी देताही येत नव्हती .

बर तिला म्हंटल " ओ छोडो , ये ना सोचो " तर नाही  , तिला तोच बर्फ हवा होता तिने वाटीत लपवून ठेवलेला . शेवटी मग तिला बोलण्यात गुंतवून त्या वाटीत चुपचाप  दुसरा बर्फ परत आणून  ठेवला ,  तर स्वारी एकदम खुश , सगळे प्रश्न गायब आणि मग एकदम " मै चली मै चली" .

हा प्रसंग आठवला की आठवतो तो निरागस भाव . त्या निरागस पणाने विचारलेले प्रश्न की ज्यांची उत्तर सगळ्या मोठ्यांकडे असूनही तिचे प्रश्न अनुत्तरित होते .

असेच कित्ती प्रश्न लहानपणी पडतात . जस sodawater च्या बॉटल मध्ये आधी सोडा घालतात की कंचा ? रेडिओ किंवा TV त गायक किंवा actor आत कसा आणि कुठून जातो ? सगळ्या वस्तुंना रंग असतो मग  पाण्याला रंग का नाही ? चंद्र , तारे रात्रीच का दिसतात ? आरशात आपल्या गालाची पापी का घेता येत नाही ?  इतके प्रश्न पडतात की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता देता आईबाबांची दमछाक होते . घरात आजी आजोबा असले की  ते मात्र अशा सगळ्या प्रश्नांना बरोबर हाताळतात .

आपल्या प्रश्नांची उत्तरे देणारी माणसे अनेक भेटतात पण आपण हा प्रश्न का विचारतोय यामागचं कारण समजणारी माणसे क्वचितच भेटतात .

अस म्हणतात ,

" A child is an island of curiosity surrounded by sea of questions "

खरंच , मूल हे कुतूहलाच एक बेट आहे ,  ज्या बेटाच्या चारही बाजूला प्रश्नांचा सागर आहे . किती समर्पक दिलेली उपमा आहे .

प्रश्न फक्त लहानपणी च पडतात का ?  ते तर मोठे झाल्यावरही  पडतात . ज्ञानवर्धन हे तर आयुष्यभर सुरूच असतं . नंतर   त्या प्रश्नांना आपण अडचणी , समस्या , संकट वगैरे वगैरे नावांनी  ओळखतो .

 लहानपणी प्रश्न मनात आल्याबरोबर  कुणालातरी  विचारून त्याची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला जातो , अगदी लगेच , ताबडतोब . जोपर्यंत प्रश्नाच उत्तर मिळत नाही किंवा शोधत नाही तोपर्यंत मुलांची जिज्ञासा त्यांना शांत बसू देत नाही .  मोठं झाल्यावर मात्र तस केलं जातं नाही . शक्यतोवर स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याकडे कल वाढलेला असतो . ते बरेचदा सोडवल्या जातातही . एखादेवेळी दुसऱ्या कुणाची मदत लागते . ती मदत कधी मिळते तर कधी मिळत नाही . कधी कधी ती मिळणारच नाही असं गृहीत धरून  मदत मागितल्या जात नाही .  कदाचित पूर्वी आलेले अनुभव त्या व्यक्तीला मदत मागण्यापासून परावृत्त करतात . काही प्रसंगी माणसाला फक्त सोबत हवी असते . तुझे प्रश्न तू सोडव म्हणण्यापेक्षा सगळे प्रश्न आपण सोडवू या शब्दांची गरज असते .


आयुष्यातल्या काही प्रश्नांची आवर्जून उत्तर शोधायचा प्रयत्न केला जातो तर काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केल्या जात नाही . कधी कधी उत्तर मिळाली तरी ती सांगितल्या जात नाहीत  तर काही प्रश्न अनुत्तरित ठेवण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करते . अस कधी कधी स्वतःच्या फायद्यासाठी केलं जातं तर कधी आपल्या लोकांच्या काळजीने केलं जातं.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं  ?  का नसतं ? कदाचित असतंही आणि नसतंही . काही प्रश्नांच्या उत्तराने चांगला परिणाम साधण्याऐवजी जर वाईट परिणाम साध्य  होणार असेल तर ते टाळलेल केव्हाही चांगलं याकडे मोठ्या लोकांचा कल वाढलेला जाणवतो  .  काही अनुत्तरित प्रश्न हे काही वेळेला प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तर देणाऱ्या  दोन्ही व्यक्तीचा मार्ग सुकर करतात म्हणूनही असेल कदाचित . 

प्रश्नांना उत्तरे ।
उत्तरांना कारणे ।
कारणांना विश्लेषणे ।
विश्लेषणांना संदर्भ  ।

खरं तर प्रवास , प्रश्न ते उत्तर एवढाच असतो
पण पुष्कळदा प्रश्न आणि संदर्भ यांची अशी काही गुरफट होते की पुन्हा उरतो तो प्रश्न च .


मागे एक गोष्ट वाचली होती मी .   बालकमंदिरात असतांना एका मुलीने सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी मुखोद्गत केली . आईने म्हंटल ,  मी तुला प्रश्न विचारते ,  तू उत्तर सांग. आपण उजळणी करू .  मुलगी म्हणाली , आई मला सगळं पाठ झालंय , आता नको न विचारू . मी लिहीन उद्या सगळं बरोब्बर . दुसऱ्या दिवशी पेपर हातात घेतल्यावर तिच्या लक्षात आलं , " अरे मला उत्तर तर सगळी पाठ  आहेत पण प्रश्न तर मी वाचलेच नव्हते . त्यामुळे कुठल्या प्रश्नाला काय उत्तर लिहायचं हे  माहितीच नाही ". याच काहीसं उलट  मोठं झाल्यावरही तर होतं न ? प्रश्न माहिती असतात . प्रश्नाकडे इतकं जास्त लक्ष दिलं जातं की उत्तर शोधायचा प्रयत्नच केल्या जात नाही . ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? यावरच सगळं लक्ष केंद्रित होतं . उत्तरच सुचत नाही . त्या ऐवजी जर  " वो छोडो , ये ना सोचो " अस म्हणून  उपाय शोधण्याचे प्रयत्न  लवकर सुरू केले  तर  प्रश्न, प्रश्न राहतच नाही .

कधी कधी मनात खळखळून वाहणाऱ्या प्रश्नांचा प्रवाह असह्य पेचात पाडणारा भासतो. जसा शांत दिसणाऱ्या पाण्याचा न दिसणारा तळ त्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबच्या आड लपलेला असतो तशीच प्रश्नांची उत्तरही कुठेतरी त्या गोंधळलेल्या मनाच्या प्रतिबिंबा आडच दडलेली असतात .

कोणत्याही सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर " वेळ" हेच आहे .


❓उभा धरला तर प्रश्न दिसतो आणि तोच जर आडवा धरला तर किल्ली 🔑 .  त्याकडे कोण कस बघेल यावर हे अवलंबून असत .  प्रश्नातच उत्तर दडलेलं असत अस जे म्हणतात ते या वरूनच  कदाचित आलं असेल .
काय वाटतं तुम्हाला  ?




#कुतुहल, #जिज्ञासा, 

23 comments:

  1. लेखास छान असा कसा प्रतिसाद देवू असा प्रश्न पडला आहे मला..

    ReplyDelete
  2. Wah surekh ....tuzya lihinyatun baryach prashnanchi uttara uttara

    ReplyDelete
  3. Khup apratim lihila, ashich nehami Navin Navin kalpana tuzya lekhanichya rupani sagalyan paryant pohochav hich Manisha

    ReplyDelete
  4. छान प्रश्न?👍

    ReplyDelete
  5. Wah..nehmipramane chhanach lihilay

    ReplyDelete
  6. Wah..nehmipramane chhanach lihilay

    ReplyDelete
  7. Very well written, Taaiee. There is an entire movement in educational and the learning sciences called 'inquiry-based learning' that is centred on this exact premise - how children could learn by generating (in their minds) questions, and inculcating a habit of asking questions to probe the world and worldly phenomena.

    ReplyDelete
  8. Thank you so much 😊 it means a lot when you get such comment from an expert 👍

    ReplyDelete
  9. Chhan lihilas Mani tas tuz likhan nehmich mast asat ekdam halk,fulk.

    ReplyDelete
  10. प्रश्नांची उकल छान 👍👌

    ReplyDelete
  11. Khup chaan lihile ahe....ya vishyavar pn lihita yeil ase kharech vatle navhte.mast ch

    ReplyDelete
  12. खरंच छान... पण प्रश्न पडला की उत्तर काय द्यावं.??? प्रतिक्रिया देण्यासाठी पणं प्रश्न पडलाय..

    ReplyDelete