प्रश्न
एक साधासा प्रश्नही कित्येक , अनेक नवनवीन उत्तरे निर्माण करतो आणि त्यातूनंच मग पुन्हा अनेक वेगवेगळे प्रश्नही उभे रहातात.
प्रश्न का पडतात ? कुणाला पडतात ? केव्हा पडतात ? हे प्रश्न जेव्हा मला पडले तेव्हा एक जुनं गाणं आठवलं ,
" ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? " इतकंच नाही तर प्रत्येक प्रश्न का पडतो याचे एक मजेदार उदाहरण ही आठवलं लगेच आणि आठवल्यावर असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे असंही वाटल .
एकदा काय झालं आमच्या बाजूला राहणाऱ्या 2,3 वर्षाच्या छोट्या मुलीचा रडण्याचा आवाज येत होता . आधी वाटलं काहीतरी हट्ट करत असेल पण ती सारखी काहीतरी सांगतेय अस वाटलं म्हणून पाहायला गेलो . ती रडत रडत सांगत होती की दुपारी तिनी बर्फ संपून जाईल . बाबांना मिळणार नाही या विचाराने दाराच्या मागे बाबांना ऑफिस मधून आल्यावर द्यायला वाटीत बर्फ लपवून ठेवला होता . आता तो तिथे नाहीये . झालं असं की त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते . घरात बर्फ सारखा सगळ्यांना हवा असायचा आणि त्यामुळे संपायचा . आता त्या लपवून ठेवलेल्या वाटीतल्या बर्फाच झालं पाणी . तिची आई तिला हे सांगायचा आटोकाट प्रयत्न करत होती की अग बर्फाच पाणी झालं . बर्फ कसा राहील दिवसभर ? आईच्या दृष्टीने ही साधी गोष्ट होती पण मुलीला ते काही पटत नव्हतं . त्यामुळे हे असे प्रश्न पडतात हे मला एकदम पटलं , ये क्या हुआ ? कैसे हुआ ? गंमत अशी की तिच्या बालमनाला हे काही केल्या पटत नसल्याने पुढचे प्रश्न तिला नक्की पडले असावेत , कब हुआ ? क्यू हुआ ? कारण मी तर इथे बर्फ ठेवला होता मग बर्फाच पाणी झालं केव्हा ? आणि का ? एकीकडे मजा वाटत होती तर दुसरीकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला समजेल अशी देताही येत नव्हती .
बर तिला म्हंटल " ओ छोडो , ये ना सोचो " तर नाही , तिला तोच बर्फ हवा होता तिने वाटीत लपवून ठेवलेला . शेवटी मग तिला बोलण्यात गुंतवून त्या वाटीत चुपचाप दुसरा बर्फ परत आणून ठेवला , तर स्वारी एकदम खुश , सगळे प्रश्न गायब आणि मग एकदम " मै चली मै चली" .
हा प्रसंग आठवला की आठवतो तो निरागस भाव . त्या निरागस पणाने विचारलेले प्रश्न की ज्यांची उत्तर सगळ्या मोठ्यांकडे असूनही तिचे प्रश्न अनुत्तरित होते .
असेच कित्ती प्रश्न लहानपणी पडतात . जस sodawater च्या बॉटल मध्ये आधी सोडा घालतात की कंचा ? रेडिओ किंवा TV त गायक किंवा actor आत कसा आणि कुठून जातो ? सगळ्या वस्तुंना रंग असतो मग पाण्याला रंग का नाही ? चंद्र , तारे रात्रीच का दिसतात ? आरशात आपल्या गालाची पापी का घेता येत नाही ? इतके प्रश्न पडतात की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता देता आईबाबांची दमछाक होते . घरात आजी आजोबा असले की ते मात्र अशा सगळ्या प्रश्नांना बरोबर हाताळतात .
आपल्या प्रश्नांची उत्तरे देणारी माणसे अनेक भेटतात पण आपण हा प्रश्न का विचारतोय यामागचं कारण समजणारी माणसे क्वचितच भेटतात .
अस म्हणतात ,
" A child is an island of curiosity surrounded by sea of questions "
खरंच , मूल हे कुतूहलाच एक बेट आहे , ज्या बेटाच्या चारही बाजूला प्रश्नांचा सागर आहे . किती समर्पक दिलेली उपमा आहे .
प्रश्न फक्त लहानपणी च पडतात का ? ते तर मोठे झाल्यावरही पडतात . ज्ञानवर्धन हे तर आयुष्यभर सुरूच असतं . नंतर त्या प्रश्नांना आपण अडचणी , समस्या , संकट वगैरे वगैरे नावांनी ओळखतो .
लहानपणी प्रश्न मनात आल्याबरोबर कुणालातरी विचारून त्याची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला जातो , अगदी लगेच , ताबडतोब . जोपर्यंत प्रश्नाच उत्तर मिळत नाही किंवा शोधत नाही तोपर्यंत मुलांची जिज्ञासा त्यांना शांत बसू देत नाही . मोठं झाल्यावर मात्र तस केलं जातं नाही . शक्यतोवर स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याकडे कल वाढलेला असतो . ते बरेचदा सोडवल्या जातातही . एखादेवेळी दुसऱ्या कुणाची मदत लागते . ती मदत कधी मिळते तर कधी मिळत नाही . कधी कधी ती मिळणारच नाही असं गृहीत धरून मदत मागितल्या जात नाही . कदाचित पूर्वी आलेले अनुभव त्या व्यक्तीला मदत मागण्यापासून परावृत्त करतात . काही प्रसंगी माणसाला फक्त सोबत हवी असते . तुझे प्रश्न तू सोडव म्हणण्यापेक्षा सगळे प्रश्न आपण सोडवू या शब्दांची गरज असते .
आयुष्यातल्या काही प्रश्नांची आवर्जून उत्तर शोधायचा प्रयत्न केला जातो तर काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केल्या जात नाही . कधी कधी उत्तर मिळाली तरी ती सांगितल्या जात नाहीत तर काही प्रश्न अनुत्तरित ठेवण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करते . अस कधी कधी स्वतःच्या फायद्यासाठी केलं जातं तर कधी आपल्या लोकांच्या काळजीने केलं जातं.
प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं ? का नसतं ? कदाचित असतंही आणि नसतंही . काही प्रश्नांच्या उत्तराने चांगला परिणाम साधण्याऐवजी जर वाईट परिणाम साध्य होणार असेल तर ते टाळलेल केव्हाही चांगलं याकडे मोठ्या लोकांचा कल वाढलेला जाणवतो . काही अनुत्तरित प्रश्न हे काही वेळेला प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तर देणाऱ्या दोन्ही व्यक्तीचा मार्ग सुकर करतात म्हणूनही असेल कदाचित .
प्रश्नांना उत्तरे ।
उत्तरांना कारणे ।
कारणांना विश्लेषणे ।
विश्लेषणांना संदर्भ ।
खरं तर प्रवास , प्रश्न ते उत्तर एवढाच असतो
पण पुष्कळदा प्रश्न आणि संदर्भ यांची अशी काही गुरफट होते की पुन्हा उरतो तो प्रश्न च .
मागे एक गोष्ट वाचली होती मी . बालकमंदिरात असतांना एका मुलीने सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी मुखोद्गत केली . आईने म्हंटल , मी तुला प्रश्न विचारते , तू उत्तर सांग. आपण उजळणी करू . मुलगी म्हणाली , आई मला सगळं पाठ झालंय , आता नको न विचारू . मी लिहीन उद्या सगळं बरोब्बर . दुसऱ्या दिवशी पेपर हातात घेतल्यावर तिच्या लक्षात आलं , " अरे मला उत्तर तर सगळी पाठ आहेत पण प्रश्न तर मी वाचलेच नव्हते . त्यामुळे कुठल्या प्रश्नाला काय उत्तर लिहायचं हे माहितीच नाही ". याच काहीसं उलट मोठं झाल्यावरही तर होतं न ? प्रश्न माहिती असतात . प्रश्नाकडे इतकं जास्त लक्ष दिलं जातं की उत्तर शोधायचा प्रयत्नच केल्या जात नाही . ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? यावरच सगळं लक्ष केंद्रित होतं . उत्तरच सुचत नाही . त्या ऐवजी जर " वो छोडो , ये ना सोचो " अस म्हणून उपाय शोधण्याचे प्रयत्न लवकर सुरू केले तर प्रश्न, प्रश्न राहतच नाही .
कधी कधी मनात खळखळून वाहणाऱ्या प्रश्नांचा प्रवाह असह्य पेचात पाडणारा भासतो. जसा शांत दिसणाऱ्या पाण्याचा न दिसणारा तळ त्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबच्या आड लपलेला असतो तशीच प्रश्नांची उत्तरही कुठेतरी त्या गोंधळलेल्या मनाच्या प्रतिबिंबा आडच दडलेली असतात .
कोणत्याही सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर " वेळ" हेच आहे .
❓उभा धरला तर प्रश्न दिसतो आणि तोच जर आडवा धरला तर किल्ली 🔑 . त्याकडे कोण कस बघेल यावर हे अवलंबून असत . प्रश्नातच उत्तर दडलेलं असत अस जे म्हणतात ते या वरूनच कदाचित आलं असेल .
काय वाटतं तुम्हाला ?
#कुतुहल, #जिज्ञासा,

लेखास छान असा कसा प्रतिसाद देवू असा प्रश्न पडला आहे मला..
ReplyDelete😀👌👍
ReplyDeleteWah surekh ....tuzya lihinyatun baryach prashnanchi uttara uttara
ReplyDeleteDhanywad
DeleteKhup apratim lihila, ashich nehami Navin Navin kalpana tuzya lekhanichya rupani sagalyan paryant pohochav hich Manisha
ReplyDelete😊 dhanyawad 🙏
ReplyDeleteछान प्रश्न?👍
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
DeleteKeep it up Manee!!👌
ReplyDeleteWah..nehmipramane chhanach lihilay
ReplyDeleteDhanyavad 😊🙏
DeleteWah..nehmipramane chhanach lihilay
ReplyDeleteDhanyawad 😊🙏
DeleteVery well written, Taaiee. There is an entire movement in educational and the learning sciences called 'inquiry-based learning' that is centred on this exact premise - how children could learn by generating (in their minds) questions, and inculcating a habit of asking questions to probe the world and worldly phenomena.
ReplyDeleteThank you so much 😊 it means a lot when you get such comment from an expert 👍
ReplyDeleteChhan lihilas Mani tas tuz likhan nehmich mast asat ekdam halk,fulk.
ReplyDeleteधन्यवाद 😊👍
ReplyDeleteप्रश्नांची उकल छान 👍👌
ReplyDelete😊👍🙏
DeleteKhup chaan lihile ahe....ya vishyavar pn lihita yeil ase kharech vatle navhte.mast ch
ReplyDeleteधन्यवाद😊🙏
ReplyDeleteखरंच छान... पण प्रश्न पडला की उत्तर काय द्यावं.??? प्रतिक्रिया देण्यासाठी पणं प्रश्न पडलाय..
ReplyDelete😊👍 धन्यवाद 🙏
Delete