खरं
संध्याकाळी छान वारा होता म्हणून बाहेर बसले होते . आकाशात चंद्रकोर दिसत होती . खरं तर खूप शांत वाटत होतं , सहज एक लहानपणीची गोष्ट आठवली ...... चांदोबाचा अंगरखा . चांदोबाची आई त्याच्यासाठी एक अंगरखा शिवते , चांदोबा रोज थोडा थोडा मोठा होतो आणि अंगरखा लहान . तसच काही दिवसांनी याउलट होतं .
आकाशात कधी चंद्र मोठा दिसतो , कधी लहान हे पाहिल्यामुळे लहानपणी ती गोष्ट खरी वाटते . हळूहळू जेव्हा अमावस्या , पौर्णिमा , दिवस , रात्र कसे होतात हे कळल्यावर तो लहानपणीचा बलिशपणा आठवून हसू येतं . खर तेही असतं आणि हेही.
लहान मुलं सुद्धा जेव्हा एखादा प्रसंग किंवा काही माहिती मोठ्यांना देतात तेव्हा सांगितल्या नंतर म्हणतात .....खरंच .
किंवा कुणी त्यांना काही सांगितलं तर विचारतात ......खरंच ?
या सांगण्यात , विचारण्यात निरागसपणा असतो ......कधी त्यांना ते नक्की तसंच आहे नं असं विचारायचं असतं कारण हीच माहिती मग ते लक्षात ठेवतात किंवा कधी त्यांना ते मित्रांमध्ये सांगायचं असतं आणि मिरवायचं असतं .......पहा , मला माहिती आहे , तुम्हाला नाही असं चिडवायचं असतं मित्रांना...
हो नं .
खरं सांगायचं तर .......अशी सुरुवात बोलतांना खूपदा केली जाते ..... त्या प्रसंगाच वजन वाढावं म्हणून असेल कदाचित .
खरं तर , खरं आणि सत्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत .
सत्य हे कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही .......पण खरं मात्र परिस्थिती नुसार , कधी वेळेनुसार , कधी व्यक्ती नुसार हे बदलू शकतं .
जसं मुलं सांगतात , मी बाहेर खेळायला गेलो खूप मज्जा येत होती आम्हा सगळ्या मित्रांना , पण ते काका रागावले . आवाज करू नका म्हणाले . ते म्हणाले तुम्ही मुद्दाम आम्हाला त्रास व्हावा म्हणून इथें खेळता , पण खरंतर त्यांच्या घरासमोर ग्राउंड आहे मोठ्ठ खेळायला म्हणून खेळतो आम्ही तिथे . यात मुलांना आणि काकांना वाटणार त्यांचं त्यांचं , त्यांना वाटणारं खरं असतं .
एक joke वाचला होता काही दिवसांपूर्वी , संध्याकाळी lights गेल्यावर होणाऱ्या प्रसंगांचे नवरा बायकोने केलेले वर्णनं ......नवरा सांगतो , lights नसल्यामुळे TV , news काही पाहता आला नाही , मेणबत्तीत जेवण करावं लागलं , कंटाळा आला तर बायको म्हणते काय मस्त वातावरण होतं , छान candle light dinner घेतलं , कित्तीतरी दिवसांनी आम्ही नवरा बायकोने इतक्या गप्पा मारल्या. खरं तर दोन्ही वर्णनं खरीच आहेत , ते त्यांच त्यांचं त्यांना जाणवणार खरं आहे . खरं न .
खूपदा आपल्याला जाणवतं , एकाला वाटणार खरं , दुसऱ्याला तसंच वाटेल असं नसतं .
खरं हे कितपत खरं असतं , हे त्या सांगणाऱ्या वर , कुणाला सांगतोय या वर पण अवलंबून असतं .
जसं खरं आणि सत्य निराळे आहेत तसंच खरं आणि बरोबर हे पण निराळे आहेत . जे खरं आहे ते बरोबर असेलच असं नाही आणि जे बरोबर आहे , तेच खरं असेल असही नाही .
प्रत्येकाचं खरं हे त्याचं त्याचं खरं असतं . काय खरं आहे हे प्रत्येक व्यक्ती स्वतः च्या अनुभवानुसार , त्या त्या व्यक्तीच्या विचारानुसार , कुवतीनुसार ठरवते .
एकाच प्रसंगाच्या वेळी उपस्थित असणारे लोकं जेव्हा तो प्रसंग दुसऱ्याला सांगतात त्यावेळी त्यात थोडा थोडा बदल होत जातो , कारण त्या प्रसंगा बरोबर जोडले जातात , त्या प्रसंगात असणारे लोकं , पाहणाऱ्यांचे पूर्वीचे अनुभव किंवा कधी कधी ......त्या व्यक्तीं बरोबर असलेले किंवा नसलेले संबंध , कधी राग , कधी द्वेष , कधी ईर्षा , कधी प्रेम , कधी मैत्री , कधी नातं , कधी अजून काही . त्यामुळे त्या प्रसंगाकडे पाहण्याचा आणि त्या प्रसंगाचा अर्थ काढण्याचा दृष्टिकोन ही वेगळा होतो आणि मग तयार होतं प्रत्येकाचं खरं , खरं नं .
खरं हे नेहमी खरं असतं का ? की आपल्याला जे बरोबर वाटतं , जे मनाला पटत , कधी जे आपल्या फायद्याच असतं , कधी आपले पूर्वग्रह असल्याने जे आपण मनाने ठरवतो त्याला आपण खरं म्हणतो ? कि जे समोर दिसतं , अनुभवता येतं ते खरं असतं ?
आता मी लिहितेय ते खरं असेलही कदाचित , पण ते मला जाणवणार खरं आहे ......तुमंच खरं हे अजून निराळं असू शकतं ......खरं नं ?
#चांदोबाचाअंगरखा

वाह!👍👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
DeleteKhupach chan .....
ReplyDeleteKharach kharyachi vyakhya hi pratekachya drushtini kiti vegali aste hyache khup chan varnan kelat
धन्यवाद वहिनी 😊🙏
DeleteKavita Kamalapurkar
ReplyDeleteGood and balance view and presentation. Keep writing and sharing.
ReplyDelete- Milind Tanksale
Thank you 🙏😊
ReplyDeleteएकदम खरं आहे.... खर हे सापेक्ष असते... प्रत्येकाने अनुभवायला शिवाय नाही कळत...
ReplyDeleteधन्यवाद राजुदादा 🙏😊
ReplyDeleteEkdum khara ahe... Wah chan
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
ReplyDeleteखुप छान ......बालपणीचे प्रसंग आठवले गंमत वाटली.....वा.
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
ReplyDeleteखरंच तू खरयावर किती खरोखर लिहले आहेस. शब्दांच्या दुनियेत आपण की आपल्या दुनियेत शब्द?
ReplyDelete👌👌😊🙏
ReplyDelete