Followers

Sunday, 8 November 2020

Horn Please

 Horn  




आज संध्याकाळी बागेत  बसले असतांना  विचार मनात सुरू होते . समोरून जाणाऱ्या गाडीने जोरात हॉर्न वाजवला आणि माझी समाधी भंग पावली . विचारांची शृंखला तुटली पण हेही वाटलं ,  बरं झालं हॉर्न वाजला आणि मनातले विचार थांबले कारण मनात सुरू असणारे विचार हे काही फारसा आनंद देणारे नव्हते . असो . 

खूपदा नकळत असे विचार मनात कधी सुरू होतात कळतच नाही आणि ते थांबवायला कधी कधी मनाची तयारी नसते तर कधी त्यामुळे निर्माण  होणारा राग , चीड , दुःख , हतबलता यांना क्षणिक वाट मिळून मोकळं वाटलं अस मनाला वाटत असतं , हो ना ? 


रोज सकाळी घरची काम आटोपून रस्त्याने ऑफिस ला जातांना जशी रस्त्यावर लोकांची असते तशीच  मनात विचारांची गर्दी असते ,  हो ना ? घरी काय करायचं राहिलय ?   ऑफिस मध्ये गेल्यावर पाहिलं काम कुठलं करायचं आहे ?  कुणाला काल काय करायला सांगितलं  होतं ? आज जमलं तर घरी जातांना भाजी न्यायची आहे  एक ना अनेक .  डोक्यात विचार सुरू असतात आणि सवयीने ठरलेल्या रस्त्यावरून आपण जात राहतो . त्यावेळी बाजूने जाणाऱ्या व्यक्तीकडे देखील कधी कधी लक्ष नसतं . ती व्यक्ती नंतर कधी भेटली तर सांगते , मी तुमच्या समोरून गेलो पण लक्षच नव्हतं तुमचं , होतं ना अस ?  दिसत असतं सगळं पण मेंदूपर्यंत कदाचित ते पोहोचत नसतं .  एखादी गाडी बाजूने जोरात हॉर्न वाजवत जाते तर कधी red signal येतो , थांबायला लागतं आणि त्या तंद्रीतून आपण वर्तमानात येतो . होतं ना असं ?😊


असे हॉर्न हे फक्त विचारांसाठी आवश्यक आहेत का ?


कधी  मित्रांच्या whatsapp ग्रुप मध्ये चॅटिंग करतांना किंवा कुठे एकत्र जेवायला बाहेर गेलो असतांना तर कधी कुठे एकत्र गप्पा मारत असताना संभाषण  निराळं वळण घेत आणि नकळत वातावरण तंग होतं . त्यावेळी  कुणाला आलेला खोकला  , लागलेला ठसका किंवा अगदी साधी शिंक किंवा waiter ने आणलेलं पाणी हे सुद्धा तो वाद थांबवण्याचा हॉर्न असू शकतो .  अर्थात हॉर्न चा आवाज येईलच अस मात्र नाही , ती साधी एखादी छोटी हालचालही असू शकते मग ते खुर्ची सरकवत मागे जाणं असो वा अजून काही .  नंतर  वाटतं , अस म्हंटल नसतं तर पुढचा वाद टळला असता किंवा त्यावेळी हसायला नको होतं किंवा अजून काही  . पण तो हॉर्न मात्र नेमक्या वेळेला वाजायला हवा . अशा वेळी असा हॉर्न वाजण्याची सोय असती तर किती बर झालं असतं .  


आपलं शरीर सुद्धा आपल्याला वेळोवेळी हॉर्न देतंच असतं .  डोळे दुखणं ,  डोकं दुखणं . पोट दुखणं हे तर अगदी नॉर्मल आहे . कधी कधी सारखं थकल्यासारखं वाटतं . कधी पाय दुखतात , कधी दात अथवा हिरड्या दुखतात , कधी जिना चढतांना धाप लागते तर कधी अजून काही . आपल्या सर्वांना हे कशामुळे होतं असावं हा अंदाज बहुतेकवेळा येतो . त्यावेळी त्याकडे जर वेळेवर लक्ष दिल्या गेलं तर संभाव्य धोका टाळता येतो . बरोबर ना ? 


समुद्रात जहाज रात्री अंधारात पाण्यात प्रवास करत असतात त्यावेळी दिपस्तंभांवरचा प्रकाश त्यांना जमीन जवळ आहे हे दर्शवत किंवा कुठे खडकाळ भाग आहे , धोका आहे अशी धोक्याची घंटा वाजवून सांगत त्यामुळे अपघात  टाळायला मदत होते  . अशी धोक्याची घंटा कधी कधी आपल्या मनातही वाजते , वाजते ना ? काही करत असताना , कुठला निर्णय घेत असतांना कधी कधी उगीचच मनात एखादी शंकेची घंटा वाजते . ती कधी आपण ऐकतो आणि ते काम करत नाही , कधी ती ऐकू येत नाही तर कधी ऐकू आली तरी ते करणं किंवा तो निर्णय घेणं त्यावेळी जास्त महत्वाच वाटल्याने त्या वाजणाऱ्या घंटेकडे दुर्लक्ष केल्या जात . 


अस म्हणतात  " From fear of the unknown, both horns and wings have grown " 


हे वाक्य खरंच किती अर्थपूर्ण आहे .  


आपण घरात असतांना किंवा आपल्या शहरात  ओळखीच्या रस्त्यांवर वावरतांना खूपदा फारसा विचार न करता फिरत असतो तेच ज्यावेळी अनोळखी गावात , दुसऱ्या देशात किंवा अगदी आपल्याच गावात पण अनोळखी area त गेलो तर आपलं लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे , दुकानांकडे असतं . जास्त सतर्क असतो त्यावेळी आपण . त्यामुळे  हॉर्नस पटकन ऐकू येत असतात आपल्याला . कान टवकारले असतात , डोळे नुसतेच उघडे नसतात तर ते सगळं नीट अवलोकन करत असतात . होतं ना अस ? 


कुठल्याही नवीन क्षेत्रात व्यक्ती ज्यावेळी पहिल्यांदा जाते मग ते कुठलंही असो , भ्रमंती , व्यवसाय , खेळ , अभ्यास त्यावेळी मनात , मला हे जमेल का ? रस्ता सापडेल का ? मी यशस्वी होईन का ? अजून कितीतरी प्रश्न त्या त्या क्षेत्राप्रमाणे मनात येतात . थोडी भीतीही वाटत असते . हीच भीती मनातले हॉर्नस अधिक सतर्क करते तसेच त्या भीतीवर मात करण्यासाठी , उंच भरारी घेण्यासाठी  पंखांमध्ये बळही देते . हो ना ?  


Horn कुठेतरी कुठलेतरी सतत  वाजत असतात .  कधी ते ऐकू येतात ,  कधी नाही .  कधी लक्ष असत ,   कधी नाही . काहीवेळा  लक्ष नसेल तर अपघातही होतात .  कधी लहान तर कधी मोठे .  कधी हॉर्न छोटे असतात तर कधी मोठे कर्कश .  कधी निसटते आवाज तर कधी मंजुळ .  निरनिराळे स्वरही असतात ,  कधी खर्जातले तर कधी एखादी शिट्टी अगदी कुकर ची का असेना . असे हॉर्न जेव्हा वेळोवेळी वाजतात त्यावेळी ते प्रत्येकवेळी आपल्याला ऐकू आले तर ?  तर कितीतरी नकळत अथवा भावनेच्या , आवेशाच्या भरात बोलल्या जाणाऱ्या , केल्या जाणाऱ्या  , सांगितल्या जाणाऱ्या ठरवल्या जाणाऱ्या गोष्टींना , वादांना  थांबवता येईल . चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत .  पटकन ब्रेक मारता येईल आणि संभाव्य धोका टाळता येईल . " सूनने की क्षमता तो है सबमे "  काय ? काय वाटतं तुम्हाला ? 


 




11 comments:

  1. Wel return.. I believe there is a horn in everyone of us, in our subconscious mind too..and most of us ignor it till it comes to the neck on many situations. So called sixth sense is also a supernatural horn, I believe and very few of us even realize it at some point of time at many times.. So your write up has given us a sort of Enlightenment on importance of not ignoring horns, the manifestation of warnings in various forms and ways.
    Umesh

    ReplyDelete
  2. Yogya vicharana chalna denara ani aaveg niyantrit karnyavar kholvar vichar aslela sunder lekh..

    Sanhita Pathak

    ReplyDelete
  3. Really good one....nice keep writing...like it

    ReplyDelete
  4. Wa mastach 👌🏻👌🏻. All of us have this sixth sense and we often do get these warning bells 🔔. Somehow it gets lost in the noise that surrounds us.... or to say the crowded mind.
    Although we have grown up looking at these signages its time again to say Horn please 😃
    Wishing you all A Very Happy Diwali 🪔 🎉🙋🏻‍♂️
    Cheers
    Ashok

    ReplyDelete
  5. so true , thank you n wish you the same 😊💐

    ReplyDelete