फुलपात्र
आज फुलपात्र शब्द वाचण्यात आला . फार दिवसांनी वाचला . हा शब्द आजकाल फारसा बोलण्यातही येत नाही आणि वाचण्यातही . पूजेच्या वेळी मात्र कधी कधी आपण सगळे फुलपात्र शब्द वापरतो . त्याचं कारण कदाचित तीर्थ किंवा जल हे फुलपात्रात आहे म्हणायला छान वाटतं , हो ना ? एरवी आपण सगळे त्याला ग्लास , पेला , प्याला असच म्हणतो . कधी mug , कप असंही म्हणतो , पण फुलपात्र ? ते आपण फक्त पूजेच्या वेळीच वापरतो . असो
फुलपात्र हे सहसा चांदी किंवा तांब्याच असतं . पेला हा मात्र कशाचाही असू शकतो , हो म्हणजे स्टीलचा , पितळेचा , अल्युमिनियम चा , चांदीचा , सोन्याचा. त्याचप्रमाणे आपल्या मनात ग्लास ची प्रतिमा ही काचेचीच असते . त्याचे आकार निरनिराळे असू शकतात पण तो असतो मात्र काचेचाच .
प्याला शब्दात , तो छोटा , कमी उंचीचा असणार , जुन्या वेळचा वापरात असणारा असं प्रतीत होतं . तसच त्या शब्दातुन अजून दुसराही एक अर्थ निघतो आणि त्याच बरोबर आठवतं ते. ' राम गणेश गडकरी ' यांचं ' एकच प्याला ' हे नाटक '. तोही शब्द फारसा कुणी रोजच्या व्यवहारात बोलत नाही . बरोबर ?
चषक म्हटलं की तो कधी काचेचा असेल तर कधी सोन्याचांदीचा तर कधी दुसऱ्या कुठल्या धातूचा . तो नाजूक असणार , उंच असणारं तसंच त्यावर नाजूक नक्षीकाम असणार हेही लगेच मनात येत . संस्कृत बोलतांना किंवा लिहितांना मात्र ' चषके औषधं अथवा जलं अस्ति । ' इतर वेळी चषक म्हंटल की अरेबियन नाईट्स च्या गोष्टी आठवतात . ती उंच लांब कलाकुसर केलेली रत्नजडित सुरई सुद्धा आठवते . त्याचप्रमाणे आठवतो कुठल्यातरी स्पर्धेत जिंकलेला चषक , काय ?
Cup किंवा Mug म्हंटल की तो सिरॅमिक चा असणार हे मनात उमटतं . आजकाल प्लास्टिक आणि कागदाचे ही कप असतात . ' World Cup ' देखील आठवतो काहीवेळेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉफी किंवा चहाची लगेच आठवण येते . एक वाक्य नेहमी ऐकिवात येतं , ' This is my cup of tea ' किंवा This is not my cup of tea ' एखादी आवडणारी , जमणारी अथवा न आवडणारी , न जमणारी कुठलीही गोष्ट दर्शवतांना हा शब्दप्रयोग नेहमी केल्या जातो . हा झाला इंग्रज इथे आल्यानंतरचा इ . स . 1800 नंतरचा वाक्यप्रयोग . इ.स. 1800 च्या आधी चहा , cup , glass , mug हे शब्द नसले तरी पेला होताच की आपल्याकडे . त्यामुळे ' पेल्यातलं वादळ ' हा शब्दप्रयोग खूप आधीपासून साहित्यात दिसतो . पेल्यातलं वादळ पेल्यातच शमणार असलं तरी त्याचा बागुलबुवाही तयार करता येतो , असो .
आशावादी आणि निराशावादी कोण आहेत हे ठरवण्याचा छोटा प्रयोग आपण सर्व जाणतोच . खरचं पेला अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे , इतक्याच उत्तराने हे ठरवता येतं ?
' मंगेश पाडगावकर ' म्हणतात
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!
सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा!
आता पेला म्हंटला की त्यात काहीतरी असणारच . पेला रिकामा कधीच नसतो . त्यात कधी पाणी असेल , तर कधी सरबत तर कधी अजून काही . काही द्रव नसेल तरी हवा तरी असतेच असते .
पेला कशाचा आहे म्हणजे , काचेचा , कुठल्या धातूचा , कागदाचा किंवा अजून कशाचा हे जेवढं महत्त्वाच तेवढंच पेल्यात काय आहे , पेला कुणाच्या हातात आहे हे ही महत्वाच . त्यात चमचा आहे की straw . चमचा नुसताच ठेवलाय की खाली तळाला काही उरलं आहे जे चमचा फिरवून द्रवात मिसळायच आहे , ते एकजीव होणार आहे की नाही हेही महत्त्वाच . यावरून पारशी समाजाची आणि दुधात साखर एकजीव करण्याची गोष्ट आठवली . जसा चमचा का ठेवलाय हे महत्वाचं तसच straw देखील . ती Straw फक्त छान दिसण्यासाठी ठेवलीय की त्याने आतला द्रव प्यायचा आहे ? ती सजवलेली आहे , छत्री , लिंबू , मोसंबी , संत्र , पुदिना किंवा कुठल्या फळांनी की साधी आहे ? पेल्यातल्या द्रवात गोडवा आहे ? आंबटगोड आहे ? खारट आहे ? की तुरट ? गरम आहे की थंड ? फेसळलेलं पेय आहे ? की ज्याचा फेस जास्त आणि पेय कमी अस आहे ? फेस आपोआप कमी होणार आहे ? की फुंकर घालावी लागणार आहे ? बुडबुडे हळूहळू फुंकर घालत ते फोडायची मजा घ्यायची इच्छा आहे ? की तसच पाहायला आवडतंय ? पेल्यातला द्रव हे नारळाचं पाणी , साधं पाणी आहे ? तृष्णा घालवणार आहे ? की पोट भरणार आहे ? की मनाला मदमस्त करणार आहे ? अबब कित्ती हे प्रश्न ?
पेला अर्धा भरायचा की पूर्ण भरायचा ? उतू जाऊ द्यायचा की एकही थेंब सांडू न देता प्यायचा ? की भरलेला पेला दुसऱ्याला देऊन रिकामा करून परत भरायचा ? त्यातला आतला द्रव प्यायचा ? की हातातल्या straw ने फूररर करून वर आलेले बुडबुडे उडवत थोडी मजा अनुभवायची की चमच्याने घोळून सगळं एकजीव करायचं की त्यात छोटंसं वादळ निर्माण करायचं ? तृष्णा भागवायची ? की काय करायचं ?

आवडलं.
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteखुपच छान लेख...... सुंदर.
Deleteधन्यवाद 😊
Deleteफुलपात्र छान👌👍
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteअप्रतिम
ReplyDeleteखूप छान . .फुलपात्र
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteखूप छान . .फुलपात्र
ReplyDeleteखूप छान . .फुलपात्र
ReplyDeleteKhup Chan👏
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteमला तर चहाची आठवण झाली .
ReplyDeleteछान लिहिलंय
😊👍
ReplyDeleteफुलपात्र, पेला, ग्लास सगळे संदर्भ व्यवस्थित व मुद्देसुद पणे मांडल्यामुळे त्यांच्या आस्वाद घेतं ऐका वेगळ्या दुनियेत घेऊन जाता आले... छान मांडणी....चांगला प्रयत्न...
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
DeleteSahi far sunder likan ekadya vastu kade bhavpurk drusti barech kahi sagun jate Chan.
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
ReplyDelete