Followers

Saturday, 25 July 2020

बंधन


बंधन

बंधन म्हंटल की बांधल्यासारखं वाटत न ....बंधन मग ते कुठलं का असेना .....बंधन खरंच चांगलं का वाईट ...... बंधनं खूप प्रकारची असतात ..... घरातल्या प्रत्येकावर कुठली न कुठली बंधन असतात ......मग ती कधी स्वतःहून ठरवून घेतलेली असतात तर कधी कुणी दुसऱ्याने सांगितलेली तर कधी कुणी लादलेली . साधंच पहा न ,  मुलांनी सात च्या आत घरात यायचं  बंधन . ते मुलांच्या चांगल्या साठी जरी असलं तरी त्यांना त्याचा जाच वाटतो कारण मित्रांबरोबर खेळणं किंवा गप्पा मारणं पूर्ण झालेलं नसत .  अर्थात लहानपणी खेळताना पूर्ण खेळणं झालं असं कधी वाटतच नाही आणि गप्पा तर कधी संपतच नाहीत . त्यामुळे मग आईबरोबर वाद होतो . ती पण तेवढीच खमकी असते आणि ते बंधन  ती पाळायलाच लावते .

समोर एखाद्या भांड्यात काही ठेवलेलं दिसत असेल तर त्यावर एखादी  नजर जाते पण त्याबद्दल फारसा विचार केल्या जात नाही .   तीच वस्तू जर झाकून ठेवली असेल तर मात्र त्यात काय आहे हे पाहण्याची इच्छा होते . एखाद्या घराची  कंपाऊंड wall उंच असेल तर आत कोण रहात ? इतकी उंच भिंत का बांधली असेल ? याबद्दल मनात कुतूहल निर्माण होतं . त्याचप्रमाणे एखादी गोष्ट का करायची नाही किंवा का करायची हे जर नीट समजावून सांगितलं तर ते बंधन न वाटता दुसऱ्यांनी आपली घेतलेली काळजी आहे असं त्या व्यक्तीला वाटत . हो न ? यासाठी  त्यांच्या प्रश्नांची समाधान कारक उत्तर मात्र द्यावी लागतात . अर्थात मोठे झाल्यावर मुलांना त्याच महत्व पटत ही गोष्ट अलाहिदा .

बंधन ही फक्त लहान मुलांसाठीच असतात का ? ती तर मोठ्यांनाही असतात . समाजात वावरतांना कसं वागावं ?  कसं वागू नये ? कुठे काय बोलावं , कस बोलावं ,  कुठल्या समारंभाला  काय कपडे घालावेत ? इतकंच कशाला ,  कुठे कसं खावं ? हाताने जेवाव की काटे चमचे वापरून ? एक ना अनेक ........हे सुद्धा एक प्रकारचं बंधनच आहे न ?  अर्थात ते खूपदा स्वतःहून पाळलेले असल्यामुळे ते बंधन न वाटता आपण त्याला जीवनशैली म्हणतो इतकंच . हेच जर दुसऱ्या कुणी करायला सांगत असेल तर  मात्र ते  झुगारून द्यायची इच्छा होते .  बरोबर न ?

बंधनं फक्त जाचकच असत का ? उदाहरणार्थ  , रक्षाबंधन , मैत्रबंध  या शब्दात किती आपुलकी जाणवते .....प्रेमबंधन , रेशीमबंध म्हंटल की प्रेम , सामाजिक बंधन म्हंटल की जबाबदारीची जाणीव , काळाचे बंधन म्हंटले की यातून वेगवेगळ्या परिस्थिती प्रमाणे वेगवेगळे अर्थ निर्माण होतात ,  बरोबर न ? बंधनकारक या शब्दात मात्र जबरदस्तीची भावना जाणवते ..... बंधनात अडकण हे कधी चांगलं तर कधी नाही ......त्यात अडकून कधी त्रास होतो तर कधी आनंद मिळतो ....... ते बंधन नेमकं कशाचं आहे ......दुसऱ्या कुणी घातलं आहे की त्या व्यक्तीची  ते पाळायला संमती आहे यावरही हे अवलंबून असत .

बंधन  लोकांमध्ये असलेली ग्राह्य मर्यादा , सहशीलता ठरवते आणि मग कुठे आणि काय बंधन घालता येतील याचा अंदाज बांधते . बंधन घालणार कोणीही असो , आप्त , स्वकीय असोत नाहीतर कोणी परके किंवा अगदी सरकार सुद्धा . आपल्या कृतीवर घातलेली बंधन ही पुष्कळदा पाळावी लागतात . कधी ती अपरिहार्य असतात तर कधी आपल्याच भल्यासाठी असतात .

लोकं एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर जस बंधन घालू शकतात तसच एखादया व्यक्तीबरोबर बोलतांना त्या व्यक्तीच्या मनात स्वतः च्याच क्षमतेबद्दल , योग्यतेविषयी संदेह निर्माण करू शकतात . खरं तर हे त्यांच दुसऱ्या व्यक्तीबद्दल असणार वैयक्तिक मत असल तरीही कधी कधी ती व्यक्ती जे सांगतेय त्यावर ऐकणारी व्यक्ती विश्वास ठेवून त्या चौकटीत स्वतःला ठेऊनच स्वतःकडे पाहू लागते .  कुणी आपल्या कृतीवर घातलेले बंधन काही कारणास्तव मान्य करावे लागले तरी आपले विचार मात्र नेहमी स्वतंत्र असावेत . आपले असावेत .

थोडा अजून विचार केला तर लक्षात येत ,  बंधन म्हणजेच बंध , बंदी , निर्बंध ,  बांधिलकी , म्हणजेच मर्यादा , म्हणजेच restrictions म्हणजेच limits , curb , restraint , control , constraint , rein इत्यादी इत्यादी .  या सर्व शब्दांचा अर्थ थोडयाफार फरकाने सारखाच आहे , आहे न ?


अस म्हणतात  'self discipline is a form of restriction ' तसच हेही म्हणतात की  " All limits are self imposed " बरोबर न ?  मर्यादा  प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात . त्या स्वतःच स्वतःवर घातलेल्या असतात .  कुठल्या मर्यादांच पालन करावं ? कुठल्या नाही ? हादेखील एक वादातीत विषय आहे . ज्या भीतीला आपण सामोरे जात नाही त्या आपल्याच मर्यादा बनून जातात . होतं न अस ?  कुठलीही व्यक्ती आयुष्यात काय काय करू शकते , कुठपर्यंत जाऊ शकते , तिच्या शारीरिक , मानसिक , वैचारिक , आर्थिक मर्यादा काय आहेत हे त्या व्यक्तीने स्वतः  अभ्यासल्याशिवाय  कळत नाही .  कदाचित म्हणूनच , 

" Don't limit your challenges , challenge your limits " हे वाक्य मनाला  भावतं आणि आपलंसं करावस  वाटतं ?  तुमचं काय मत आहे ?






#challengelimits, 


13 comments:

  1. कुणावर काट्या चमच्याने जेवणाचं बंधन असेल, माझ्यावर मुकाट्याने जेवणाचं बंधन आहे.😊 असो.
    छान लिहिलं आहे. आपणच आपल्यावर बंधन घालुन घ्यावं म्हणजे दडपण वाटत नाही व आपण ही एका निश्चित मर्यादेत राहतो.

    ReplyDelete
  2. Kavita Kamalapurkar

    Khupach sunder kharach bandhana kiti prakarchi astat ani tyancha atirek zala ki matra te khup trassdayak vaatat aani kahi bandhana matra khup havi havishi vaatat aani kharach ti bandhana aahet asa vaatatch nahi .aani kahi bandhana matra aaplya jivanat asailach pahijet tyamule eak prakarchi shista aaplyala lagte .

    ReplyDelete
  3. Good ��������
    "*Bandhan*", aka limits, constraints, restrictions etc etc.. It got positive or negative meaning with respect to the context of use. Many times it's difficult to define it EXPLICITLY, so difficult to explain and justify too. So following Bandhan becomes very difficult sometimes, though there could be good intentions in it. Our parents, teachers and other elders put many restriction on us in our childhood and we rebelled at that point of time but now we understand the intention more clearly. Its important to have bandhan on everyone in personal and social life or else conflicts will arise in every aspect of life. Similarly on other hand, bandhan should not become the tool of exploitation for some selfish people, for example the bandhan put on women by so called religious extremists.

    ReplyDelete
  4. खुप सुंदर..... बंधन .....अप्रतिम लेखन.बंधन या एका शब्दांतच किती विविध प्रकार दडलेले आहेत.असेच लिखाण चालू ठेव.....शुभेच्छा व अनेक आशिर्वाद.

    ReplyDelete
  5. Wow.... छान.. बंधन असलेलं कधीही चांगलेच ना.. नाहीतर बेधुंद होऊन जगण्यात काय अर्थ आहे... तशी थोडी मज्या पण त्यात आहे... पण त्याला सुद्धा बंधनं हवेच.... Nice one... Keep it up.

    ReplyDelete
  6. खरंय , धन्यवाद 😊🙏

    ReplyDelete
  7. Wah mastach
    Maitra bandha hya shabdat dadlela garbhit artha changla lakshat ala

    He hi janavla samjat wawartana bandhana kiti awashyak ahet

    Kadhe bedhun da tar kadhi dhudi theun bandhana ghatli ki ayushya majet jail asa lakshat alay

    ReplyDelete