संगीत
संगीत हा शब्द ऐकला की बहुतेक सगळ्यांना गाण्याची आठवण येते बरोबर न . संगीत आणि गाणं हे एकमेकांचे अभिन्न अंग आहेत . संगीताशिवाय गाणं आपण ऐकतो किंवा गाण्याशिवाय संगीतही. तरीही आपल्या मनात ते इतके खोलवर रुजले आहेत की त्यांचा वेगवेगळा विचारच केल्या जात नाही . संगीताने गाण्याची आणि गाण्यामुळे संगीताची लज्जत अजूनच वाढते हेही तेवढंच खरं .
लहानपणी कुणी तरी माझी फिरकी घेत सांगितलं होतं मला की chinese मुलांच्या बारशाच्या वेळी नाव ठरवतांना एखाद्या उंच ठिकाणावरून काचेची किंवा चिनीमातीची भांडी , कप , प्लेट्स खाली पाडतात आणि जो आवाज येईल ते नाव ठेवतात बाळाचं . तेव्हा गंमत वाटायची , वाटायचं कधी तरी आपणही पाडून बघावा वरून एखादा glass किंवा कप खाली , कसा आवाज येतो पाहायला पण ती हिम्मत कधी झाली नाही .
कप , ग्लास यावर टिचकी मारून आवाज कसा येतो हे पाहायचा प्रयत्न केला . दोन कप किंवा ग्लास , साधे स्टील चे रोजचे वाट्या चमचे , छोट्या ताटल्या आणि चमचे , कप आणि चमचा असे सगळे काही प्रयोग झाले . ठराविक लयीत वाजवल्यावर त्यातून निर्माण होणारा नाद , ती किणकिण आणि ताट वाजवल्यावर त्यातून होणारा झंकार करून पाहिले . ते सगळं इतका आनंद होतो की मग त्यापुढे आईचं , ' आता पुरे करा रे आवाज ' हे रागावणं फारसं काही मनाला लागत नाही . कधी कधी मात्र हे उद्योग जास्त वेळ चालले तर कानाखाली आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर गाणंही . काय ? केले आणि ऐकलेही असतील न असे आवाज तुम्हीही ?
लहानपणी संगीतकार म्हंटल की खरंतर फारसं कळत नव्हतं . जसजस कळायला लागलं तसतस हेही लक्षात आलं की कुठलही वाक्य गाण्यासारख गाता येऊ शकतं आणि संगीत तर अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंमधूनही निर्माण होऊ शकतं .
संगीत इतक्या ठिकाणी ऐकू येत की यादी करू म्हंटल तर कित्ती तरी मोठ्ठी तयार होईल . म्हणजे बघा निरनिराळी वाद्य तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत . संगीत फक्त त्यातूनच निर्माण करता येत का ? थोडं कान देऊन ऐकलं तर प्रत्येक ठिकाणी #संगीत # ऐकू येत . प्रत्येक वस्तू मध्ये संगीत दडलेलं असतं .
पानांची सळसळ , सोसाट्याने सुटलेल्या वाऱ्याचा सु सु आवाज , भांडी पडल्यावर होणार आवाज , कोल्हापुरी चपलांचा कुरकुर आवाज , पावसाचा आवाज , रिपरीप पडतांना वेगळा , मुसळधार पावसाचा आवाज अजून निराळा आणि गारा पडत असतील पावसाबरोबर तर अजून वेगळा . त्याचवेळी जर कडकन् वीज चमकली तर त्यानंतर ऐकू येणारा गडगडाट , जोरात आवाज झाल्याने खळकन फुटलेल्या खिडकीचा आवाज , पैंजण किंवा छल्ला यांचा #आवाज # , टाळ्या , चुटकी किंवा पायाने धरलेला ठेका , शाळेत किंवा कॉलेज मध्ये मित्रांच्या पार्टीत टेबल वर tap करून दिलेली तबल्याची साथ , ओठांनी केलेला चक चक आवाज , दातात तार पकडून त्यावर बोटाने काढलेले # झंकार # स्वर # , गाण्याला शिट्टीने दिलेलं संगीत किंवा शिट्टी वाजवतच गायलेलं गाणं ,
काढलेले विविध प्राण्यांचे आवाज , शाळेची घंटा , बसने दाबलेला कर्कश्य ब्रेक , नळाच टप टप कशावर तरी पडणार पाणी , पाणी बादलीत अथवा मग्यात पडतांना होणारा आवाज , लयीत वाजवलेल्या ताटवाट्या यांचा आवाज , ग्लास मध्ये किंवा बादलीत उंचावरून पाणी घालतांना होणारा आवाज , बांगड्यांची किणकिण , दुधात किंवा सरबतात साखर घोळतांना होणारी टीणटीण , शाळेची बस , घरच्या गाडीचा रोज लयीत वाजणारा हॉर्न , gate चा आवाज , हिंजीस गंजल्यामुळे होणारा करकर आवाज , पंख्याचा चा फिरतांना होणारा गर्रर्रर्र गर्रर्रर्र असा आवाज , शंख कानावर ठेऊन त्यातून ऐकू येणारा समुद्राचा आवाज . कित्ती कित्ती ठिकाणी निरनिराळे आवाज ऐकू येतात . बापरे , मीच थकले आता विचार करून करून .
काढलेले विविध प्राण्यांचे आवाज , शाळेची घंटा , बसने दाबलेला कर्कश्य ब्रेक , नळाच टप टप कशावर तरी पडणार पाणी , पाणी बादलीत अथवा मग्यात पडतांना होणारा आवाज , लयीत वाजवलेल्या ताटवाट्या यांचा आवाज , ग्लास मध्ये किंवा बादलीत उंचावरून पाणी घालतांना होणारा आवाज , बांगड्यांची किणकिण , दुधात किंवा सरबतात साखर घोळतांना होणारी टीणटीण , शाळेची बस , घरच्या गाडीचा रोज लयीत वाजणारा हॉर्न , gate चा आवाज , हिंजीस गंजल्यामुळे होणारा करकर आवाज , पंख्याचा चा फिरतांना होणारा गर्रर्रर्र गर्रर्रर्र असा आवाज , शंख कानावर ठेऊन त्यातून ऐकू येणारा समुद्राचा आवाज . कित्ती कित्ती ठिकाणी निरनिराळे आवाज ऐकू येतात . बापरे , मीच थकले आता विचार करून करून .
एखादा आवाज लयीत ऐकू येत असला किंवा केला तरी त्यातून संगीत निर्माण होतं . हे आणि असेच अनेक आवाज जेव्हा कुठल्या शब्दांबरोबर चपखल बसतात तेव्हा तयार होत अर्थपूर्ण संगीत आणि गाणं .
आपण सगळ्यांनी '#पडोसन# ' सिनेमातल ' #मेरी सामनेवाली खिडकी में# ' हे गाणं ऐकलंय . त्यात #R D Burman# यांनी कंगवा घासल्यावर येणाऱ्या आवाजाच संगीत दिलंय . पंचमदांनी दिलेलं संगीत खरंच अफलातून आहे . ही # सृजनशीलता # गाणं पाहतांना , ऐकतांना अचंबित तर करतेच त्याबरोबर नतमस्तक होतो आपण या सृजनशील संगीतकारासमोर . उदाहरण द्यायचं झालं तर '#होगा तुमसे प्यारा कौन #' या गाण्यात sand paper एकमेकांवर घासून आणि बांबू एकमेकांवर आपटून होणाऱ्या आवाजाचा संगीत म्हणून उपयोग केला आहे . '#चुरालिया है तुमने जो दिलको# ' या गाण्यात , काचेचे ग्लास आणि चमचे यांनी निर्माण होणारा आवाज संगीत म्हणून वापरला आहे . कुठल्या गाण्यात Mike समोर गुळण्या करून तो आवाज तर कुठल्या गाण्यात डब्बे तर कुठे अजून काही . अजून कितीतरी वेगवेगळ्या वस्तू वाद्य म्हणून वापरून त्यांचा आवाज संगीत म्हणून दिलाय त्या अवलीयाने . त्या बद्दल बोलावं , लिहावं तेवढं कमी आहे . कधी कधी वाटत जर त्याकाळात synthesizer असता तर त्यांनी आपल्यावर केलेली ही संगीताची जादू अजून कुठल्या उंच स्तरावर नेऊन ठेवली असती . हे विचार करण्याच्या पलीकडे आहे .
जसा शब्दांना अर्थ , भाव असतोच तसाच संगीतातही तो भाव निर्माण करण्याची ताकद असते . कुठल्या संगीताने मनात भीती निर्माण होते तर कुठल्या संगीताने शहारे येतात . कुठल्या संगीतात प्रसन्नता असते तर कशाने आनंद मिळतो . कशाने करुणा , दया निर्माण होते तर कुठल्या संगीताने अजून कुठला भाव . नेमका भाव तयार व्हावा यासाठी निरनिराळ्या साधनांचा लयबध्द आवाज करण्यासाठी उपयोग केला जातो . असो .
आवाज हा कानांवर पडतो मात्र संगीत ही ऐकण्याची चीज आहे . संगीत हे ऐकलं तरच ऐकू येत . ते सगळ्या ठिकाणी आहे . झाडाच्या पानांची सळसळ असो की बासरीवर वाजवलेले #सूर# . आवाज सगळीकडे होतच असतात पण याच आवाजांना जेव्हा सूर गवसतो तेव्हा संगीत निर्माण होत .
जसे आवाजातले सूर गवसले की संगीत निर्माण होतं तसच जीवनात सूर गवसले की आयुष्यही #सुरेल # संगीत होतं . खरंच असे जीवनातले सूर सर्वांना गवसले तर ? तर प्रत्येकाचे #जीवनगाणे # हे सुरेल संगीत होईल . होईल न ? असेच होवो हीच मनिषा .
#meresamnewalikhidkime, #RDBurman, #जीवनगाणे, #पडोसन,
#meresamnewalikhidkime, #RDBurman, #जीवनगाणे, #पडोसन,

👌👌💐
ReplyDeleteWow... खुप सुंदर.... कोल्हापुरी चापलचे उदाहरण तर फारच चपलख पणे वापरले छान.... असेचं लिखाण सुरू ठेवा ... वाचनाची सवय तरी चालू राहील...
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
DeleteVery well written. Personally I feel silence too has music in it...!! We need only deeper perception
ReplyDelete"Maya" described in Advita philosophy and "7 swaras in silence " are they one? As neither you can hear , neither not hear , nor both...
OM
Dr Prashant Kamlapurkar.
well said Dr.Prashant 👌😊🙏
DeleteVery wel analysed and expressed. It's human power to convert any sound into music and very few could actually do it. Similarly, how one can create meaningful musical experiences out of so called bad or bitter experiences in life is really difficult and challenging but not impossible task. Everyone should strive to achieve that experience.
ReplyDeleteUmesh
So true n perfect 👌😊
ReplyDeleteKhup chhan lihilas
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
ReplyDeleteKharach khup sunder ritya vyakta kelat . aaplya aaushyat sangeeta la khup mahatvacha aahe .
ReplyDeleteKavita Kamalapurkar
Dhanywad 😊🙏
ReplyDeleteApratim....sangitachi vyakkhya ekdum sahi
ReplyDelete🙏😊
Deleteएखादा आवाज लयीत ऐकू येत असला किंवा केला तरी त्यातून संगीत निर्माण होतं . हे आणि असेच अनेक आवाज जेव्हा कुठल्या शब्दांबरोबर चपखल बसतात तेव्हा तयार होत अर्थपूर्ण संगीत आणि गाणं .
ReplyDeleteWah. Sundar vyakkya ....chan lihilay
dhanywad 🙏😊
Deleteखुप छान .....
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deletekhoop chaan sankalan
ReplyDeletesarv goshti chaplakh basavilya manisha.
Dhanyawad ,😊🙏
Delete👍😊
ReplyDeleteसंगीतात खरच जादुई ताकद असते. असं सांगतात की वाजीद अली शाह ह्या नावबाने काच फुटल्याचा मधुर आवाज येतो म्हणून घरातल्या कितीतरी काचेच्या वस्तु माणसांना फोडायला सांगितल्या
ReplyDelete. आमच्या लहानपणी आइसक्रीम वाला हा आवाज सुमधुर संगीत वाटायचा.
असो पण छान लिहिलं आहे आणि बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
👌🙏😊
ReplyDeleteछानच.....
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Delete