मेंदी
घरी मेंदीचा cone खूप दिवसांचा ठेवलेला होता म्हंटलं चला आज मेंदी काढू हातावर . मेंदी काढणं किती सोप्प झालंय न आता .
लहानपणी मेंदी हातावर काढायची ठरवली की कित्ती आधीपासून तयारी सुरू व्हायची . कुणाकडे मेंदीच कुंपण आहे त्यांना विचारून मेंदीची पान खुडून आणायची . कधी कुण्या मैत्रिणींनी सांगितलं की कुठल्यातरी एका घराजवळच्या मेंदीचा रंग जास्त रंगतो की मग तिथे जाऊन आणायची पान . त्यांना विचारल्यावर त्यांनी दिली तर छानच नाहीतर मग .......पण आणायची ती . असो .
मेंदीची पान आणली की पुढचे सोपस्कार सुरू . आधी त्यावरची धूळ स्वच्छ करायला ती धुवायची .त्यानंतर कापडावर ठेवून त्यातलं पाणी सुकवायचं . पुढच्या कामासाठी मात्र आई लागायची . पाटा वरवंट्यावर वाटावी लागायची न मेंदी . आईच्या मागे लकडा सुरू व्हायचा , अग आई झालं का तुझं काम , लवकर कर न ग , संपतच नाही बा तुझं काम . तू आता काही करू नको बर दुसरं काम , ठेऊन दे सगळं , हो हेच मेंदी वाटणं सगळ्यात महत्वाचं काम आहे , चल न ग . असे सगळे संवाद सगळ्या घरी व्हायचे . मेंदी वाटताना हात रंगणार हे आईला माहिती असल्यामुळे कितीही मागे लागल तरी सगळी काम आटोपली की मगच ती आपलं ऐकायची . मग सुरू व्हायचं मेंदी वाटणं . आईनी वाटायला सुरुवात केली की मजा यायची ते वाटणं बघायला . पाट्यावर ठेवलेली पान त्या वरवंट्याखालून पुढे जातांना बघणं , वा . मी पण करते चा धोशा लावला की आई ते वाटायला द्यायची पण ती पान अडून बसायची , समोर जायचीच नाहीत . एकतर तो वरवंटा जड त्यात तो आई करायची तसा हलायचाही नाही . बर थोडा प्रयत्न करून हलवला तर ती दुष्ट पान बारीक न होता तशीच पुढे जायची . आता हसू येत पण तेव्हा वाटायचं हे आपल्याला कस जमत नाही , आई जे करतेय तेच तर केलं न आपण . काय , केलाय न हा प्रयोग बहुतेक सर्वांनी कुणी मेंदी वाटताना तर कुणी चटणी , मसाला वाटताना , बरोबर न .
तो प्रयत्न सोडून नंतर फक्त मेंदीची पान आईनी सांगितल्यावर पाट्यावर ठेवणं हे करण्यातही मजा यायची . कशी ती ठेवलेली पान वरवंट्याखालून बारीक होत होत पुढे जातात आणि बघता बघता संपतात याकडेच लक्ष असायचं . मग मात्र पाट्यावर जागा कमी पडायला लागायची . ती वाटलेली मेंदी एका दुसऱ्या भांड्यात गोळा करून ठेवली की परत पान ठेवण सुरू . हे करता करता आईचे हात कसे मेंदीनी रंगून जायचे . आता मी कधी मेंदी लावणार याचे वेध लागायचे . त्यावेळी मेंदी लावणं म्हणजे वाटलेली मेंदी हातावर थापायची आणि देवबाप्पासारख दोन्ही हातावर मोदक घेतल्यासारखं बसून राहायचं . त्यातला तो रंगीत रस कधी कधी खाली गळायचा . ते व्हायला नको म्हणून एकावर एक हात करत तो रस सांडू न देण्याची कसरत करायची . अस वाटायचं तो रस खाली पडला तर तेवढी मेंदी कमी रंगेल न . ती मेंदी कोरडी होईपर्यंत बसून राहायचं . अस बसलेलं असताना चिडवत नाही , टपली मारून जात नाही तो भाऊ कसला . तो मेंदीचा सुगंध काही औरच होता.
नंतर मात्र बारीक मेंदीची पूड बाजारात आली . ती भिजवून लावणं सोपं झालं . त्याची अजून एक निराळीच मजा . मेंदी आणल्यावर ती भिजवणे ही एक मोठ्ठी process असायची . साधी भिजवून लगेच लावली तर फार काही रंगायची नाही . आपल्याकडच्या मेंदीच्या शास्त्रज्ञांनी आपापले डोके लावून त्यावर उपाय शोधले . एक तर ती एक दिवस आधी भिजवायची , तीही लोखंडाच्या भांड्यात . कोणी सांगायचं त्यात थोडी भेंडी घातली की छान तार येते आणि बारीक design काढायला सोपं होतं . रंग dark लाल हवा असेल तर काथ घालायची . तो तर त्यावेळी घरी असणाऱ्या पानदानात मिळून जायचा . मेंदीचा रंग काळसर यायला हवा असेल तर त्यात थोडा आवळा किंवा जर शिकेकाई करायला आईने आवळकंठी आणली असेल तर ती घालायची . आवळा मिळणं सोपं असायचं पण आवळकंठी जरा आईला लाडीगोडी लाऊन मिळवावी लागायची . मेंदी लावायला बारीक काडी हवी मग ती कधी माचीस ची , कधी उदबत्ती तर कधी खराट्याची घ्यायची . जेवढी बारीक काडी तेवढी मेंदी नाजूक काढता यायची . पानांच्या मेंदीपेक्षा ही वाळायचीही लवकर . मात्र गंमत अशी की मेंदी लवकर वाळली तर रंगणार नाही अशी भीती आधीच आपल्या मैत्रिणींनी घातलेली असल्यामुळे ती थोडं थोडं पाणी कापसाला लावून ओली करत राहायची , तेही रात्रभर . बरं एव्हढ्यानेही भागायच नाही . मेंदी तंत्रज्ञांनी शोध लावला की ते साखरेचं पाणी असावं त्यामुळे मेंदी लवकर वाळत नाही आणि रंग अजून छान चढतो . technology वाढली आणि त्याची जागा निलगिरी तेलाने घेतली , जे सारखं लावावं लागायचं नाही , बस एकदा किंवा दोनदा. झालं . त्यानंतर मेंदी वाळल्यावर पाण्यानी धुवायची पद्धत ही या नवीन technology मुळे बंद पडली . मेंदी तंत्रज्ञांनी सांगितलं की वाळलेली मेंदी फक्त काढून टाकायची आणि त्यानंतर 12 तास पाणी हाताला लावायचं नाही . बापरे काय काय सोपस्कार ती मेंदी रंगण्यासाठी.
इतकं करून एखादेवेळी मेंदी रंगायची नाही मग कुठल्या दुकानातून आणली यावर चर्चा रंगून ते दुकान बाद व्हायचं . ज्या मैत्रिणीची मेंदी रंगली असेल तिच्या बरोबर सल्ला मसलत व्हायची , कित्ती छान रंगली तुझी मेंदी , कशी भिजवली ? काय काय घातलं त्यात ? कुठून आणली तू ? वगैरे वगैरे . कुठल्या दुकानातून असो वा दूरच्या एखाद्या घराजवळून पान खुडून आणायची असो या कार्यात खोडकर भाऊच मदतीला यायचे . ती मदतही काही फुकफूकी मिळत नसे . असो ती मैत्रीण तिनी मेंदी कशी भिजवली , कशी लावली , त्यानंतर कायकाय केलं याच साग्रसंगीत वर्णन रंगवून रंगवून सांगायची . पुढच्या वेळी कुठून मेंदी आणायची आणि कशी लावायची याची रंगीत तालीम व्हायची . वा ही चर्चा ती मेंदी हळूहळू पुसट होईपर्यंत परत परत रंगायची .
मेंदी काडीने लावणं सुरू असताना मग शोध लागला घरी plastic च्या बॅग चा cone तयार करून त्याने मेंदी लावण्याचा . तसे कोन तेव्हा फार कमी लोकांना यायचे . हळूहळू कलाकार तयार झाले . आता तर हे कौशल्य काही लोकांनी तर इतकं छान आत्मसात केलंय की ती मेंदी पाहतच राहावीशी वाटते . बारीक नाजूक रेषा , निरनिराळ्या पद्धतीचे नक्षीकाम , कधी अरेबियन style तर कधी लग्नात , मौन्जीत असलेले विधी सुद्धा त्या मेंदीने हातावर काढले जातात .
मेंदीचे cone विकत मिळतात . आणून ठेवले की कधीही मेंदी लावता येते . ही इन्स्टंट मेंदी लावता पटकन येते , वाळतेही लवकर तसच फारसे काही प्रयत्न न करता रंगतेही . त्यामुळे आता घरी मेंदी भिजवून लावणं बंद झालय .आता घरी मेंदी भिजवल्या जाते ती केस रंगवण्यासाठी , हो न .
एक मात्र खरं की ज्या मेंदीकडे कौतुकाने आपण बघत असतो तिचे जेव्हा 2, 3 दिवसानंतर पोपडे उडल्यासारखे अर्धवट रंग उडतात त्यावेळी वाटत पटकन पुसट व्हावी, उडून जावी , हो न . ती जुन्या वेळेची मेंदी कशी हळूहळू पुसट होत जायची आणि एकसारखी दिसायची . कितीतरी दिवस कौतुकाने त्या मेंदीकडे बघण्यात जायचे .
" 2 दिवस कौतुकाचे " अस झालंय या मेंदीच . मेंदी भिजवण्यापासून जे कौतुक त्या मेंदीच सुरू व्हायचं ते या मेंदीच फारसं होत नाही , हो न . मेंदीची पान खुडून आणण्यापासून ते ती रंगेपर्यंत च्या खटपटीत , मेहनतीत गुंफलेले अनेकांचे हात असायचे त्यामुळेच कदाचित त्याची रंगत वाढत जायची आणि कौतुकही तेवढं जास्त असायचं , हो न. याबरोबरच हाही विचार मनात येतो की अस फक्त मेंदीचच झालंय का ?
#nostalgic

मेंदीचया पानावर मन अजून झुलले तुझ्या लॆखाने....सुंदर लेख...
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
ReplyDeleteBeautiful blog. Remembeed childhood days.
ReplyDeleteDhanywad 🙏😊
ReplyDeleteवा सगळ लहान पण समोर आणलस मस्त
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
ReplyDelete