कंटाळा
आज सकाळपासून जरा कंटाळाच आला होता , आधी सकाळी उठायचा मग काम करायचा..... सकाळच्या वाऱ्यात चहा घेत नुसतं बसून राहावंसं वाटत होतं . घड्याळं पाहिलं मात्र मग कंटाळा बाजूला सारून उठले आणि लागले कामाला . सवयीने सगळं सुरळीत पार पडत होतं पण मनात मात्र आज रोज सारखा उत्साह नव्हता , ना काम करण्यात , ना नवऱ्याशी वाद घालण्यात . हो ती पण एक दिवसाची मस्त सुरुवात असते . थोडा एकमेकांशी विनाकारण वाद घातला की दिवस कसा मस्त जातो , सगळी मरगळ निघून जाते . प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक आपली व्यक्ती असते जिच्या बरोबर दूध कुणामुळे उतू गेलं पासून ते तिसरं महायुद्ध का होईल या सगळ्या विषयांवर वादविवाद करता येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलतांना फारसा विचार करून बोललं नाही तरी चालत . युतीच सरकार मतभेद करत करत चालतच राहत , काय खरं न . हे माहिती असल्याने आपल्याला त्यातही आनंद मिळतो . आपणही खूश ....... काम पटापट आवरून office ला जायला तय्यार . आज मात्र तसही काही झालं नाही कारण आज त्यातही रस वाटत नव्हता .
खरंच कंटाळा का येतो आपल्या सर्वांना कधी कधी ? होतं असं आपलं सगळ्यांचंच , हो न .
कुठलीही गोष्ट टाळायची असली की कंटाळा येतो का ? ...... म्हणूनच यात टाळा हा शब्द असेल का?
कंटाळा म्हणजे प्रत्येक वेळी काही टाळण्यासाठी येतो असही तर नाही . कधी कधी एकच एक काम वारंवार केल्यामुळे ते करावंस वाटत नाही . आयुष्य रटाळ झालय अस वाटायला लागतं . असंही तर होतं , होतं न ?
तोच तो विचार करून मन थकत , तेच ते काम करून शरीर थकत , तेच ते आयुष्याचं चित्र पाहून डोळे थकतात , तेच ते बोलणं ऐकून कान थकतात . थकण मनाचं असो , शरीराचं , डोळ्यांचं असो किंवा कानांच , कुठलंही असो , थकण हे कंटाळ्याला दिलेलं आमंत्रण असतं .आमंत्रण आपोआप जातं मेंदूला .
थकल्यावर आराम आवश्यक आहे मग तो आराम कसलाही असू शकतो . झोप झाल्याने डोळ्यांचा आराम तर होईल पण तेच ते दृश्य रोज पाहणं कस थांबवणार ? त्यासाठी कुठला आराम देणार डोळ्यांना ? घरात किंवा office मध्ये तेच तेच काम , त्याच तशाच meetings , त्याच त्याच लोकांबरोबर जमवून घेणं , कधी कधी तीच कुरबुर , रागावणं किंवा अजून काही सुरू असतं अशावेळी त्यापासून दूर कस होणार ? कानांना , डोळ्यांना आराम कसा देणारं ? थकलेल्या शरीराला आराम देणं सोपं आहे पण मनाला ? त्याला आराम कसा देणार ?
एक वाक्य वाचलं होतं मागे , rest is nothing but change of work .
सकाळी उठल्यापासून जर कुठलीही व्यक्ती निरनिराळ्या कामांमध्ये गर्क असेल मग ते अगदी चहा करणं असो की पेपर वाचन , बाजूला राहणाऱ्या व्यक्ती बरोबर 2 वाक्य बोलणं असो की कुणा आमंत्रण द्यायला आलेल्या व्यक्ती बरोबर होणारा संवाद , office मध्ये होणाऱ्या project meeting असो किंवा दुपारी लंच time ला केलेल्या गप्पा . रात्रीपर्यंत निरनिराळी काम करण्यात , अगदी काही वेळ घरी निवांत एकटं बसण्यात सुद्धा व्यक्ती जर busy असेल तर कंटाळा हा शब्द आठवतही नाही .
खूपदा आपणच आपलं रोजचं routine ठरवून स्वतःला बंदिस्त करतो . हे रोज करायचंच , याच वेळेला करायचं , यानंतर हे करायचं , त्यानंतर ते करायचं . यामुळेच कदाचित त्या चक्रात आपण गोल गोल फिरत राहतो . आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप जास्त गोल फिरत राहिलं आणि तेही वेगाने तर कुठल्याही व्यक्तीला थोड्या वेळाने चक्कर ही येणारच . बरोबर .
निरभ्र नीळ आकाश सुंदर दिसतं , पण त्यात जेव्हा कापसासारखे ढग निरनिराळ्या आकारात पसरलेले दिसतात ते अजून जास्त विलोभनीय वाटतात . त्यात निरनिराळे आकार शोधतांना मजा येते . एकाच ढगात एका व्यक्तीला हरीण दिसत तर दुसऱ्याला वाघ . सूर्योदय किंवा सूर्यास्ताची वेळ असेल तर आकाशात झालेली रंगांची उधळण पाहातांना मन प्रसन्न होतं . मी रंगांची उधळण म्हंटल , लक्षात आलं का तुमच्या ? रंग उधळले जाऊन एकमेकात मिसळतात , कसेही . त्यांचं ते अस अनिर्बंध मिसळून परत वेगळं दिसणं हेच तर भावतं मनाला .हो न.
झाडांकडे बघा , त्यांची रंगसंगती , फुलांचे रंग . सगळं कसं contrast असतं . साचेबंद नसत काहीच , म्हणतो पहा आपण फुलांनी फुललेली , डवरलेली झाडं . फुल , फळसुद्धा झाडांना निरनिराळ्या ठिकाणी लगडलेली असतात , काही वरून दिसतात , काही डोकावून बाहेर बघत असतात तर काहींना आपल्याला आत डोकावून बघावं लागतं . बरोबर .
समुद्राचं , नदीच कुठलंही पाणी बघा त्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे त्यांचं चमकदार दिसणं मनाला भावतं . आजूबाजूच्या झाडांची पाण्यात पडलेली प्रतिबिंब मनाला आकर्षित करतात . बाजूचे निरनिराळ्या आकारांचे दगड , रेती , छोटे प्राणी सगळं कसं अफलातून असतं . खरतर यांचं एकत्रपणे दिसणार वेगळेपण हेच यांचं सौन्दर्य फुलवत , खुलवत . निसर्गातील हे वेगळेपण आपणही शिकायला हवं . प्रत्येक दिवस जेवढा जमेल तेवढा वेगळा जगायला हवं . रोज काहीतरी निराळं करायला हवं . जे काल केलं नाही ते आज करायचं . जशी एकच भाजी निरनिराळ्या प्रकारे केली तर तिची चव बदलते त्यासाठी त्यात आपण निरनिराळे मसाले घालतो किंवा कधी अगदी साधी भाजी करतो . मिळमिळीत भाजीला चव यायला आपण एक मस्त खमंग तडका देतो तसच दिवसालाही एक तडका द्यायचा. तो कसा , केव्हा आणि कशाचा द्यायचा हे ज्याचं त्यानी ठरवायचं . रोजचा दिवस जगतांना दिवसभरात एक काहीतरी अस करायचं जे त्यावेळी आपल्याला करावस वाटेल .
कंटाळा यावा असं मनातून कुणालाच वाटत नाही पण तरीही होत असंही कधी की ठरवूनही त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही . हे जस कधी होतं तसच कधी होत नाही हे मात्र आपल्या लक्षात येत नाही . ज्यादिवशी जमेल त्यादिवशी मुद्दाम routine बदलून बघा . सकाळी घरी चहा घ्यायच्या ऐवजी जवळच्या टपरीवरचा चहा घ्या . घरासमोरून शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांची सहज विचारपूस करा . ते 10 मिनिटे तुमचा दिवसच छान करून जातो . कधी खूप दिवसात न भेटलेल्या मित्राला किंवा कुणा नातेवाईकांना फोन करा , मज्जा वाटते . कधी ऑफिसला सुट्टी , चाट मारा . स्वतःसाठी , काही काम आहे म्हणून नाही . असच आणि अजून कितीतरी, तुमचेच तुम्हाला सुचतील उपाय .
चला करून तर पाहू आपण सगळे हा प्रयत्न . अगदी वाटलं तर समोर खेळणाऱ्या छोट्या मुलांमध्ये जाऊन लगोरी फोडून येऊ . मग बघा या कंटाळ्याला आपण शोधूनही सापडणार नाही . आपण त्याला आणि तो आपल्याला शोधण्यात यशस्वी न होवो हीच मनीषा .
#contrast

बढीया...
ReplyDeleteVery nicely expressed
ReplyDeletethank you so much 🙏😊
Deleteवाचुन सगळा कंटाळा गेला
ReplyDeleteअसच लिहीत राहा
धन्यवाद 🙏😊
ReplyDeleteKharach eakhada divas khup kantalvana jato pan sadhya sadhya goshtine divas kasa aanandat jail ha prayatna matra saglyani nakkich kela pahije . khupach sunder lihilat vahini
ReplyDeleteDhanyawad 🙏😊
Delete