इंद्रधनुष्य
आज दुपारी पाऊस थांबल्यानंतर बाहेर बसले होते, ऊन पडलं होतं , सहज वर लक्ष गेलं आणि सुंदर इंद्रधनुष्य नजरेस पडलं . वा , इंद्रधनुष्य खरच मोहक असतं . सुदंर रंगांची आकाशातली निसर्गाने केलेली उधळण .
तानापीहीनीपाजा .....ही रंगाची नाव लहानपणी पहिल्यांदा कळल्यावर पाठ करायला मजा येते . एकदा का ती मुखोद्गत झाली की मग अगणित वेळा याची उजळणी केली जाते .....त्या रंगांच्या खडू , क्रेयॉन्स ने इंद्रधनुष्य कित्तीतरी वेळा काढलं जातं .....धनुष्य म्हंटल की अर्धचंद्र , महिरप छान यावी लागते . मात्र इंद्रधनुष्य काढायला सोप्प आहे . रंगीत रेघोट्या काढल्या की झालं आणि त्याचा आकार सुद्धा थोडा बदलला तरी चालतो .
पाऊस इंद्र पाडतो अस मानतात आपल्याकडे आणि त्यानंतर इंद्रधनुष्य दिसतं म्हणून कदाचित हे नाव ठेवलं असेल तरी मग त्याचा आकार हा नेहमीच्या धनुष्यापेक्षा वेगळा असतो . कधी अर्धचंद्र दिसतो तर कधी नुसती एक रेष , तर कधी 2 ,3 ठिकाणी ही दिसत इंद्रधनुष्य . त्याची महिरप नसली , अर्धचंद्र नसला तरीही धनुष्य का म्हणतात ?
लहानपणी एखाद्या झाडाची काडी किंवा अगदी खराट्याच्या काडीचाही धनुष्य बाण खेळतात मुलं . अशा केलेल्या धनुष्यातुन बाण कधी सरळ जातो तर कधी तिरपा . कधी दोरी सैल असल्याने घसरतो बाण आणि कधी कधी तर तिथेच खाली पडतो . इंद्रधनुष्यातून रंग असे तिथे सगळीकडे आकाशात पसरावे म्हणून नसेल त्यालाही महिरप , अर्धचंद्र असा साचेबंद आकार ? ..... धनुष्याची कमची जास्त ताण आल्यामुळे जशी कधी कधी मधेच तुटते तसच इंद्रधनुष्यही कधी कधी अर्धचं दिसत .....कधी पूर्ण दिसतं ....कधी एक रेष दिसते तर कधी 3, 4 रंगच दिसतात , कधी काही रंग गडद तर काही धूसर दिसतात .......कसही दिसो ......ते रंग दिसले की छान वाटत .....आकार कुठलाही असला तरी त्याला आपण सगळे धनुष्यच म्हणणार ......सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात म्हणून 7 रंग दिसतात अस कुणीतरी सांगत आणि ते त्यावेळी खरंही वाटत..........जस मग prism , reflection , refraction हे शिकल्या जात तस तस मग या सुंदर विश्वातून आपण थोडे बाहेर यायला लागतो .......पण तरीही पूर्ण बाहेर येत नाहीच . केव्हाही , अगदी आजही सुदंर इंद्रधनुष्य पाहतांना दिसतं ते सौन्दर्यच. या सगळ्या rays, prism सारख्या गोष्टी त्यावेळी आठवतही नाहीत .
इंद्रधनुष्य दिसल्यानंतर कधी परत पाऊस पडून ते अर्धवट मिटत कधी पूर्ण दिसेनास होतं तर कधी ढग दाटून आल्यामुळे वातावरण कुंद होतं , कधी ऊन परत पडत कधी नाही , केव्हा केव्हा हवा सुटते , ढग वाहून जातात , आकाश निरभ्र होत . आपण मात्र वाट पाहत राहतो परत इंद्रधनुष्य दिसेल का याची .
कुठलं एखाद काम , इच्छा , स्वप्न जेव्हा पूर्ण होत , मनापासून ज्यावेळी आनंद होतो त्यावेळी त्या आनंदाला रंगीत झालर असते अस म्हंटल्या जात .....त्यावेळी सुद्धा या सप्तरंगांसारख्या सात गोष्टी एकामागोमाग होतात .....रंगाप्रमाणे गेलो आपण तर पहिला तांबडा ..... काही मनाजोग होतं किंवा कशाहीमुळे मनापासून आनंद होतो , मग त्यामुळे मनात उत्साह संचारतो ......हा दुसरा रंग , नारिंगी .....सगळ्यांना सांगावं अशी मनात उर्मी निर्माण होते .......पिवळा , सगळ्यांनी कौतुक केल्यावर खूप छान प्रसन्न वाटत ....दिल बाग बाग होतं , हा हिरवा ,.....आकाशाला गवसणी घालावी अस वाटू लागत , तो निळा , .....त्यामुळे आत्मविश्वास वाढतो , हा पारवा ,.....यामुळे परत काम करण्याची स्फुर्ती मिळते , तो जांभळा .
असे हे तानापीहिनीपाजा , मनाला आकर्षित करणारे आणि आनंद देणारे . नवीन काम , नवीन स्वन पूर्ण करण्यासाठी मनाला पुनःपुन्हा शक्ती देणारे . त्याचं ते न संपणार , मनाला आनंद देणार तानापीहीअनीजा हे इंद्रधनुषी चक्र सुरूच राहत .
इंद्रधनुष्यातले रंग हे फक्त पाऊस आल्यावर दिसतात अस नाही . सप्तरंग दिसण्यासाठी आवश्यक असतो तो प्रकाश आणि एक ठराविक angle . ......पाण्याच्या थेंबात जसे सप्तरंग दिसतात तसेच ते दाराच्या eye hole मधून समोर भिंतीवर पडलेल्या सुर्यकिरणात पण दिसतात . प्रकाशाचा refraction झाल की सप्तरंग दिसणार . साध पाण्यात बोट जरी घातलं तरी ते मोठं दिसतं , आहे त्यापेक्षा वस्तू अजून जवळ दिसते , कधी कधी ती जास्त सुंदरही दिसते . या सगळया मागे विज्ञान जरी असलं तरी पाहतांना जाणवतं ते त्यातलं सौन्दर्य . असे रंग , सौन्दर्य ठिकठिकाणी दिसतात किंबहुना शोधले की सापडतात म्हणू हवं तर . त्यासाठी लागतो तो मनातला प्रकाश आणि पाहण्याचा तो perfect angle .....बस मग काय सगळं जग हे इंद्रधनुषी सप्तरंगांचंच दिसतं .
आपल्याही सर्वांना कणाकणात इंद्रधनुष्य शोधता येवो हीच मनीषा .
#rainbow, #इंद्रधनुष्य
Mast...
ReplyDeleteDhanywad 😊
Delete👌👌👌
ReplyDelete😊👍
Deleteसुरेख. आज रत्ना आणि मी टोकियोत फिरतांना पाऊस पडला आणि इंद्रधनुष्य दिसलं. आता रूमवर परतलो आणि हे इंद्रधनुष्य उलगडलं.
ReplyDeleteसुंदर योगायोग 😊🙏
DeleteWah
ReplyDelete😊🙏
Delete👍👍
ReplyDelete👍😊
Deleteसप्तरंगाचं सौंदर्य छान रेखाटलस.
ReplyDeleteधन्यवाद 🙏😊
Deleteइंद्रधनुष्य .....सप्तरंगाची ऊधळण .....अप्रतिम लेख सुंदरलेखन👌👌
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
DeleteApratim lekh
ReplyDeleteDhanywad 😊🙏
Deleteमनातला प्रकाश आणि पाहण्याचा तो perfect angle
ReplyDeleteअगदी खरय
फारच सुरेख वर्णन केलस
धन्यवाद
ReplyDeleteFarach surekh varnan kelai
ReplyDeleteDhanyawad 😊🙏
Delete