खोकला
सर्दी आणि खोकला दोघ मित्रच . एकमेकांना सोडून फारसे राहत नाहीत . फरक एवढाच की सर्दीचा त्रास फक्त ज्याला झालीय त्याला होतो मात्र खोकला हा सर्वांना त्रास देतो . ज्याला झालाय त्यालाही आणि ऐकणाऱ्यांलाही ...........दोन्ही साठी रुमाल हातात तयार असावा लागतो ........ जागा मात्र वेगवेगळ्या .
असं म्हणतात की जेव्हा आपण एकटे असतांना कधी हार्ट अटॅक येतोय अस जाणवलं तर खोकलण हा एक त्यावरचा तात्पुरता उपाय आहे .
आता भीती तर वाटत नाहीये न तुम्हाला की खोकल्यावरचे घरगुती उपाय मी सांगेन म्हणून?
खोकला हा काय ब्लॉग लिहिण्याचा विषय आहे ? नसेलही कदाचित पण सध्या खोकला झालाय मला त्यामुळे तोच विषय म्हणून डोक्यात आला .
सांगा बर , खोकला ही एक कला आहे असं नाही वाटत का तुम्हाला ?
छोटा नातू , आजोबा कसे खो करतात हे करून जेव्हा दाखवतो तेव्हा आजोबा सुद्धा न येणारा खोकला , आला आहे असं दाखवून परत खोकलतात आणि हसतात . त्यांची आणि नातवाच्या खोकलण्याची कला ते एकमेकांसमोर सादर करत दोघंही आनंद घेत राहतात आणि असेल आजी , आई , बाबा कुणी अजून तिथे तर सगळेच या खो कलेचा आनंद घेतात .
कुठे बाहेर गेलो असताना , कुठल्या लग्नात , कार्यात किंवा अजून कुठे जर कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तेव्हाही ही खो कलाच कामात येते . येते न ?
कधी फोन वर बोलतांना थोडा वेळ हवा असेल विचार करून उत्तर द्यायला ,त्यावेळीही ही खो कला त्यात मदत करते . कधी ऐकू आलं नाही हे दाखवायला सुद्धा ही खो कलाच मदतीला घेता येते .....त्याच क्षणाला एकदम जोरात खो कला सादर होते. फोन वर बोलणं थांबवायचं असेल तेव्हाही हीच खो कलेची उबळ पटकन प्रात्यक्षिक देते .
लहान मुलांना शाळेत जायचं नसेल तर पोटदुखी सारखच सांगता येणार हे एक हंमखास पचनी पडणार कारण . सकाळी उठल्यावर खो कला सादर केली की लगेच आई कपाळाला हात लावून बघते , मग थोडी कला अजून सादर केली हात गळ्यावर ठेवून , घसा दुखतोय अस दाखवलं की मोहीम फत्ते झालीच म्हणून समजा . अर्थात ती पण आईच असते , त्यामुळे तिच्या मुलाला ती छान ओळखत असते . खो कला जर या आधी सादर झाली असेल तर लगेच मोहीम फत्ते होत नाही . काही दुसरा गनिमी कावा करावा लागतो . इतर कुणालाही खो कला फसवू शकते पण आईला नाही . काय ? बरोबर न .
हीच खो कला घरून ऑफिस मध्ये फोन करून , आज ऑफिसला यायला जमणार नाही हे सांगताना सादर करण ही तर आयुष्य जगण्याची एक आवश्यक कला होऊन जाते . हो , सुट्टी मिळणार कधी आणि कशी ? काम तर टेबल वर अमाप असतात , संपता संपत नाहीत , मग हीच कला अशावेळी आधार देते.
बरोबर न . काम आणि आयुष्य यांचा समतोल राखणं आजकाल फार कठीण होत जातंय , कदाचित सगळ्याच गोष्टींचा वेग फार वाढलाय , मग कुठेतरी सुट्टी नावाचा ब्रेक लावला की वेगावर नियंत्रण ठेवायला मदत होते . हो न .
खाकरण हे खोकल्याच पिल्लू .....काही लोकांना सारखं मध्ये मध्ये खांकरण्याची सवय असते . अस करण्यामागे कधी त्यांना होणारा त्रासही असू शकतो तर कधी लक्ष वेधून घेणं हेही असतं , कधी कधी जाणवतं ते प्रामुख्याने तिथे असणाऱ्या लोकांना स्वतःच्या असण्याची , अस्तित्वाची जाणीव करून दयायचा प्रयत्न करत असतात . घरीसुद्धा कधी कधी आजोबा , बाबा किंवा कुणी वडीलधारी मंडळी मी घरी आलो हे सांगायला हा खाकरण्याचा मार्ग अवलंबतात , मग लगेच आजी किंवा कुणी त्यांना पाणी द्यायला जातात . दिसत न हे चित्र घराघरात . म्हणून तर मला वाटतं की ही एक कला आहे जी खूप वेळा , खूप ठिकाणी , निरनिराळ्या कारणांसाठी सादर केली जाते .
भाषण देतांना , कधी वादविवाद स्पर्धा सुरू असताना , तर कधी एखादया मीटिंग मध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायच्या आधी थोडा विचार करायला वेळ घ्यायचा असेल त्यावेळीही ही खो कला मदत करते . पाणी पिता पिता थोडा विचार करायला वेळही मिळतो आणि काय बोलायचं हेही ठरवता येत, बरोबर न ? आपल्या पैकी पुष्कळांना या कलेने कधी न कधी नक्की मदत केली असेल.
आधी रणांगणावर मावळे लढायला जातात , त्यानंतर थोडे मोठे सरदार , मग अजून मातब्बर सरदार , त्यानंतर मग शेवटी राजा . अशी चढती , उतरती भाजणी कुठल्याही क्षेत्रात असते , मग ते कुठलंही ऑफिस का असेना . तसच ही खो कला सादर करतानाही असाच चढता क्रम वापरण्यात येतो , आधी खाकरण , मग साधा खो खो , मग थोडा मोठा आणि शेवटी खो कलेची उबळ .
असा हा की ही ...... खो कला .......केव्हाही , कुठेही , कधीही आपल्या दिमतीला हजर राहून आपलं उद्दिष्ट साध्य करायला नेहमी तत्पर राहो हीच मनीषा .

Kho "kala" pe bhi koi likh sakta hai!! 👌👌👍
ReplyDelete😊👍
DeleteKho kala hya vishayavar pan lihilta yeta,he aaj samjla.....
ReplyDelete😜😊
Deletemast lekh...
ReplyDeleteधन्यवाद 😊
DeleteVery nice it is......Beautifull....God bless you.
ReplyDelete🙏 😊
Deleteखो कला फारच सुंदर वर्णन केली आहेस वाह
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteखो"कला ठीक आहे... पण खोकला नकोसा वाटतो...😉🙂
ReplyDeleteखोकला आणि "खो"कला... मस्तं लिहिलंय... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
😀👍
ReplyDelete