वाढदिवस
वाढदिवस कि जन्मदिवस ........
आपल्याकडे भारतात वाढदिवस साजरा केल्या जातो ......आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा कमी वेळा म्हणतो .
पूर्वीपासून ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला ओवाळून त्या दिवसाची सुरुवात केली जाते ..... देवाचा , घरच्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या वर्षाची सुरुवात करायची पद्धत अजून सुरु असली तरी आता birthday , wedding anniversary या शब्दांनाही महत्व आलं आहे .......यावरून आठवलं , एक काकू होत्या , आमच्या घरी नेहमी यायच्या. एक दिवस येतांना केक घेऊन आल्या , कसला विचारलं तर म्हणाल्या , आज आमच्या लग्नाचा birthday आहे . आम्ही लहान होतो , खूप हसलो . आता अस वाटतं , किती निरागसता होती त्यात , लग्नाचा वाढदिवस म्हणायचं होत त्यांना . रम्य ते दिवस , त्यावेळी झालेल्या छोट्या गोष्टींची गम्मत कित्ती दिवस पुरते .
कुठलीही प्रथा जेव्हा सुरु होते त्यावेळी नक्कीच त्यामागे काही विचार असतो , जो त्या त्या वेळेप्रमाणे , काळाप्रमाणे , त्यावेळेच्या गरजेप्रमाणे , आवडीप्रमाणे किंवा काही सामाजिक बांधिलकी प्रमाणे बरोबरच असतो ........परिस्थितीनुरूप त्यात थोडेफार नंतर बदल होतात .....कधी होतही नाहीत......कधी ते कोणी चालू ठेवतं , कुणी सोडून देतं ...........अशाही प्रथा आहेत ज्याचं काही वेळा प्रयोजन काय असावं हा अंदाज येत नाही कारण त्यात परिस्थितीनुरूप बदल झालेले नसतात .
लहानपणी सगळ्या छोट्या मुलांना वाटतं आपल्या वाढदिवसाला केक आणावी . कुठे पाहिल्यामुळे म्हणा किंवा केक आवडते म्हणून किंवा सजवलेल्या केकच आकर्षण म्हणून म्हणा .....काही घरी मात्र हे केल्या जात नाही .....कारण हेच की ही आपली पद्धत नाही .....आपण दिवा विझवत नाही वगैरे वगैरे .....मुलं छोटी असल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो.......खरतर प्रत्येक ठिकाणी काही तोडगा निघू शकतो जेणेकरून मुलांचा हिरमोड पण होणार नाही आणि जुन्या लोकांना पण वाईट वाटणार नाही . जेवढे आयुष्यातले वर्ष संपले तेवढ्या मेणबत्त्या फुंकर मारून विझवून नविन वर्षाची सुरुवात करण्याची पाश्चात्य पद्धत आहे ...... हीच मेणबत्त्या लावण्याची पद्धत थोडी बदलली तर .......म्हणजे जेवढे वर्ष वयाचे संपले तेवढ्या मेणबत्त्या ठेवण्याऐवजी जे वर्ष सुरु होतंय तेवढया ठेवल्या तर ......फुंकर मारुंन विझवायच्या ऐवजी केक वर ठेवून पेटवल्या तर .... तर सगळेच खुश , हो न .
वाढदिवसच नाही तर अशा कितीतरी ज्या दुसऱ्या धर्मातल्या किंवा प्रांतातल्या , देशातल्या प्रथा आहेत त्या आपण आवडल्या म्हणून आपल्या करू शकतो ......त्यात थोडेफार बदल करून ....... शेवटी प्रथा ही असते काय ......तर एखादा सोहळा , प्रसंग साजरा करण्याची पद्धत जी सारखी सारखी खूप लोकांनी केली की ती प्रथा म्हणून ओळखल्या जाते .
वाढदिवस वर्षातून एकदा जन्मदिवशी साजरा करतात सगळे . बरोबर न . जन्मदिवस जरी वर्षातून एकदाच येत असला तरी वाढदिवस मात्र रोज असतो सगळ्यांचा . कसा ? बघा ह, बाळ एक दिवसाच असतं , दुसऱ्या दिवशी 2 दिवसाच होत , मग 3 , मग 4 , अस वाढतच जात ......365 दिवसांनी एक वर्षाच होतं . बरोबर न . वाढ आपल्या सर्वांची रोजच होत असते . मग एक वर्षाने वाढदिवस साजरा करण्यामागे कारण काय असू शकेल ?
लहान बाळात होणारी वाढ , बदल हा दिवसागणिक लक्षात येतो नंतर ही वाढ हळू हळू व्हायला सुरुवात लागते . वाढ ही फक्त शारीरीकच नाही तर बौद्धिकही व्हायला सुरुवात होते .
कधी जुने फोटो जर पाहिले तर लक्षात येतो आपल्यालाही तो होणारा बदल . चेहऱ्यात चेहऱ्यावरच्या भावात होणारा बदल , उंचीत , जाडीत , वागण्यात होणारा बदल . कपड्यांच्या , वागण्याच्या , केसांच्या style मध्ये होणारा बदल . वाढ फक्त शरीराचीच होत नाही , तर वाढ होते मित्रांच्या संख्येची , कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची , विविध उपक्रमांची , मुलांच्या नखऱ्याची सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारांची . छोटी मुलं सुरुवातीला सगळं सांगितलेलं ऐकतात नंतर सुरू होतात हट्ट ......शिंग फुटले यांना म्हणतो न आपण ...... त्यांचा मेंदू जसा जसा develop होत जातो तसे तसे ते तर विचार करतातच आणि मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडतात . कधी प्रश्न विचारून तर कधी वाद घालून , कधी हट्ट करून तर कधी त्यांचे एखाद्या विषयावरचे तर्क सांगून . जो तर्क कधी सुचला नसतो , तो मुलांच्या सानिध्यात शिकतात आईबाबा . वाढ फक्त लहान मुलांचीच नाही तर मोठ्यांचीही होतच असते .
वाढदिवसाची लहानपणी जेवढ्या उत्साहाने वाट पहिल्या जाते तेवढी मग ती काही वर्षांनी पहिल्या जात नाही . कुठल्याही वयात वाढदिवस साजरा करायला आवडतोच मात्र मधल्या काही वर्षात हे वाट पाहणं कमी होतं . आपण मोठे होतोय , आयुष्यातली वर्ष कमी होतायत , अजून किती काय काय करायचं आहे , शिकायचं आहे , किती जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत ही जाणीव ते वाट पाहणं कमी करत . थोड्याच दिवसात लक्षात येत , अरे हा आनंद कित्ती छान आहे , मित्रांबरोबर , आपल्या लोकांबरोबर तो दिवस घालवायला किती मजा येते . बाकी सगळं तर सुरूच राहणार आहे त्यातुन मनाला विसावा म्हणजे यातल्या गंमतीचा मिळणारा आनंद. तो मनाला मिळणारा आनंद , ते समाधान परत सुरू करतो वाढदिवस साजरे करणं .
लहानपणी कोण काय gift देईल याकडे लक्ष असत तर नंतर माझ्या लोकांच्या , मित्रांच्या वाढदिवसाला मी त्यांना कसा आनंद देऊ शकेन , तो त्यांचा दिवस मला किती सुंदर करता येईल या दृष्टीने विचार करणं सुरू होतं . कधी अचानक भेटीचा लाभ , तर कधी surprise पार्टी , कधी आवडता पदार्थ खायला करून घालणं, तर कधी कुठे तरी सहल , कधी नुसतं एकमेकांबरोबर असंख्य गप्पा , तर कधी अजून काही . पूर्वी लहानपणी आज मला काय मिळेल या विचारापासून जी सुरुवात होते ती मग आज मी काय देऊ , काय करू माझ्या लोकांसाठी पर्यंत जाते . हीच तर होणारी प्रत्येकाची वाढ आहे .
हाच तर खरा वाढदिवस . जो सगळ्यांचा रोज असतो . रोज भेटणाऱ्या लोकांकडून , मित्रांकडून , घरच्यांकडून , मुलांकडून तसच येणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगातून आपण शिकत जातो , शरीराची वाढ तर आपोआप होत असतेच मात्र आयुष्यातले निरनिराळे प्रसंग बुद्धीचा विकास घडवत जातात . बुद्धी जशी जशी विकसित होत जाते तसे तसे आपली विचारांवरची पकड घट्ट व्हायला लागते , विचारांना एक दिशा मिळते . विचार परिपक्व होतात , प्रगल्भ होतात . प्रगल्भ विचार मनाला , आत्म्याला उन्नत करायला मदत करतात .
शरीराची वाढ होते , बुद्धी विकसित होते ,
विचार प्रगल्भ होतात आणि आत्मा उन्नत होतो.
ज्या ज्या दिवशी मनाला आतून अगदी मनापासून आनंद होईल , शांतता मिळेल , समाधान वाटेल तो तो दिवस वाढदिवस , तोच उत्सव .
आपल्या सर्वांना असे वाढदिवस नेहमी अनुभवता येवो हीच मनीषा .

Wah
ReplyDelete😊🙏
Deletesurekh
Deleteधन्यवाद
DeleteChan
ReplyDeleteThanks
DeleteMastch !
ReplyDeleteDhanyawad 😊
Delete👌🏻👌🏻👍🏻👍🏻
ReplyDelete😊👍
ReplyDeleteमला काय मिळेल पासुन मि काय देउ पर्यंत प्रवास मस्त अप्रतीम मांडला आहेस
ReplyDeleteधन्यवाद 😊🙏
Deleteवाढदिवसाचे सुंदर वावरणं...
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteअतिशय सुंदर लेख.वाढदिवसाचा खरा अर्थ छान मांडलाय.
ReplyDelete🙏😊
Delete👍👍
ReplyDelete🙏😊
Deleteछान! जन्म दिवसाच्या शुभेच्छा म्हणा किंवा happy birthday, feeling तेच असत. प्रत्येक वाढ दिवसा बरोबर प्रगल्भता यावी हे मात्र खर. ☺
ReplyDelete👌👍😊
Deleteलेख छानच लिहलास.
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deletemarmik
ReplyDeleteधन्यवाद 😊
Delete