Long drive
आपण उद्या मस्त long drive ला जाऊ .....
आम्ही काल long drive ला गेलो होतो .खूप छान वाटलं
एक मस्त long drive वर जाऊन ये मित्रांबरोबर fresh वाटेल बघ छान.
अशी आणि अनेक अश्या आशयाची वाक्य आपल्या सगळ्यांचीच ओळखीची आहेत , हो न .
Long drive ला कुणी कार ने जाईल तर कुणी स्कुटरवर तर कुणी बाईक तर कुणी सायकल घेऊन तर कुणी पायी ......हसू आलं .....पायी पण जाता येत की long drive ला . आपल डोकं drive करून नेत पायांना......आपण म्हणतोही पाय नेतील तिकडे गेलो ......काहीच ठरवलं नाही . कार ने किंवा कुठल्याही वाहनाने जातांना पण हेच होतं .....होतं न ...... हा long drive शब्द मात्र जोडला गेला आहे वाहनाला.....असो.
Long drive ला जाण्याचं प्रत्येकाचं कारण निराळं असत .....कधी नुसतच बाहेर फिरायला जाण्यासाठी तर कधी छान वातावरण आहे म्हणून तर कधी घरात बसून कंटाळा आला म्हणून तर कधी मज्जा म्हणून , कधी अशीच चक्कर मारायला तर कधी अजून काही ........वाहन पण वेगवेगळी असतात .....साध्य मात्र एकच असतं .....ते म्हणजे मन प्रफुल्लित करणं , आनंदी करणं , शांत करणं , मोकळं करणं ........आजच्या भाषेत refresh होणं . अहो computer सुद्धा जास्त वेळ काम केलं की कंटाळा करतोच न .....मग hang नावाचा time please घेतो ..... मग refresh बटण दाबलं केलं की परत कामाला लागतो .......ते जस माणसाने तयार केलेलं यंत्र तसे आपणही देवाने तयार केलेले अप्रतिम आणि आजवर कुणीही प्रतिकृती तयार न करू शकलेलं यंत्रच आहोत . माणूस आज खुप विज्ञान प्रगत झालाय मात्र आजही तंतोतंत माणूस नावाचं यंत्र नाही तयार करू शकला . असो आता यावर लिहिलं तर विषयांतर होईल.
काय लागतं खरच आपल्याला आनंदी व्हायला, प्रफुल्लित व्हायला ......फक्त विचार बदलले की आनंदी होऊ शकतो आपण ......तरीही हे साध्य होणं जरा अवघड जातं .....खरं न .....कितीही कोणी म्हंटल की अरे सकारात्मक विचार कर , सगळी मरगळ निघून जाईल बघ .....विचार चांगले कर ....बघ तू जे विचार करशील तसच होईल .अशी वाक्य सतत ऐकत आणि ऐकवत असतो आपण एकमेकांना .
एक खूप छान वाक्य मागे माझ्या वाचण्यात आलं .......
refreshment/rest is nothing but change of work ..........कसं आहे की सांगणं सोपं आहे ......करणं तेवढंच अवघड . हो न , अशावेळी हा long drive फार हवा हवासा वाटतो .......कधी एकटं जावसं वाटत तर कधी कोणा बरोबर ......बरोबर कुणाला न्यावं हे पण ती व्यक्ती बरोब्बर ठरवते. कुणाबरोबर संवाद साधला तर मन मोकळं करता येईल , मनाची मरगळ जाईल , मन प्रफुल्लित होईल , fresh वाटेल हे पण ज्याचं त्याला ठाऊक असतं. प्रत्येक वेळी एकच व्यक्ती नसते .....खूपदा असते सुद्धा .....ते त्या त्या व्यक्तीवर आणि अर्थात त्या त्या विषयावर अवलंबून असत . कुणाबरोबर आणि काय बोलायचं हे सुद्धा व्यक्तिप्रमाणे वेगवेगळ असतं .
पायी लांबवर गप्पा मारत फिरत जाण याने जसं मन आनंदी होत , तसच हातात सायकल घेऊन पायी लांबवर चालत जाण यात देखील आनंद मिळतो , मन शांत होतं. गप्पा मारून शांत तर होतच तसच मोकळं ही होत .
स्कुटर किंवा बाईक वर जातांना शांत रस्त्यावर दोन्ही बाजूंना दिसणारी झाड किंवा जातांना कानाला लागणारा तो गार वारा ...उडणारी ती ओढणी/पदर..... ओढणीची होणारी ती हवीहवीशी वाटणारी फडफड.......कानाशी होणारा , बोलणारा किंवा बोलणारी यांच्या आवाजाचा नाद ....त्यातून होणारा सुसंवाद ......एखाद्या प्रॉब्लेम वर मिळणारा उपाय .....सुचलेले काव्य किंवा एखादी ओळ सुद्धा मन सुखावून जाते ......मागे किंवा समोर बसलेल्या व्यक्ती चा आवाज ,सहवास ,सुगंध, स्पर्श , न दिसणारी तरीही समजणारी ती नजर..... न दिसणारे तरीही उमगलेले त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ........ कधी मिश्किल तर कधी समजून घेणारे तर कधी समजावणारे..........हे सगळे मन आकर्षित तर करतातच पण शांत आणि प्रफुल्लित सुद्धा करतात ......ही refreshment फार जरुरी असते ......त्यात जर कधी रिमझिम पाऊस सुरू झाला तर वा .......एकदम राहत फतेह अली खान च आठवतो .......खुशनुमासा .....ये मौसम है जहाँ ......फारच romantic वाटायला लागलय का .....वाटू दे .....त्यातही मजा असते ......
कार मधून जाताना सुद्धा हेच अनुभव येतात ......एक आपलच विश्व असत चार दारांमधलं .....यात बाहेरच्या वाऱ्याला सुदधा शिरकाव नसतो ...... आत असणारा गारवा .....लावलेली आवडती गाणी , मंद दरवळणारा सुगंध आणि सुसंवाद किंवा क्वचित कधी फुटलेला , तडकलेला .....तर कधीकधी न थांबवता आलेली खूप वेळेची घुसमट , कधी आर्त स्वर तर कधी न केलेले हट्ट तर कधी समजावणीचा सूर ....तर कधी लाड तर कधी चिडचिड.......कधी कधी तर या आतल्या फक्त स्वतः साठी असणाऱ्या विश्वात बाहेरच्या वाऱ्याला सामील करून घेण्याची फार इच्छा होते आणि मग AC बंद करून खिडक्यांच्या काचा खाली करून हात बाहेर काढून .......चेहऱ्यावर ......
हातावर तो वारा घ्यायला पण solid वाटतं ......हो न ......आणि पाऊस आला तर ........मग परत तेच ......यावेळी एखाद्या वेळी शोभा मुद्गल आठवते बरं ........घटा सावनकी .......आणि कार पण थोडी जरा speed वाढवते .......imagin करायला लागले का ......अजून वाचायचं आहे पुढे .
पायी फिरायला जातांना सुद्धा वेगळा माहोल असतो ....एकतर आपण पुष्कळदा रस्त्यावर एकटे नसतो .......का ? ....अहो का काय .....पायी फिरायला घराजवळ जातो ना generally आपण .....असो .....एकटं रमतगमत जाण हे सुदधा मनाला विसावा , विरंगुळा देत कुणी बरोबर असेल तर एकमेकांच्या speed adjust करत .....बोलत .....सांगत .....हाताला धरून तर कधी हात खांद्यावर ठेवून तर कधी गळ्यात हात घालून फिरायला जाण्यात पण आनंद मिळतो .......रस्त्याने जातांना एकमेकांना सांभाळून नेणं अशावेळी दोघेही करत असतात .....ते नकळत होत जातं .......जर रस्ता रिकामा असेल तर एखादया मध्ये आलेल्या दगडाला ठोकर मारून उडवण .....मग परत त्या दगडापर्यंत पोहोचून कोणी परत ठोकर मारायची यात होणारी त्यांची चुरस.....जी त्या दोघांमध्ये होत असताना त्यांना मिळणारा तो निर्मळ आनंद ......अस करत करत जेव्हा ........फारच दूर पोहोचलो आपण ......अजून घरी परत पायी जायचंय याच आकलन होऊन खूप हसू येणं ........इतकं दूर फिरून आल्यावरही त्या थकण्यात पण मिळणारा आनंद ......अवर्णनीय ........
काय झालंय न असं ......आठवा आठवा असे प्रसंग .......या प्रसंगाची आठवण सुद्धा तुम्हाला long drive वर घेऊन जाईल .
कधी कधी नुसतं एखाद्या आवडत्या जागी एकटं बसलं तरी मन शांत होत , कधी आवडती गाणी ऐकल्याने सुद्धा मन प्रफुल्लित होतं ......यावेळी सुद्धा आपण long drive वरच गेलो असतो ..... यात वाहन आपलं मन असतं जे विचारांवर स्वार होऊन लांब फिरून येतं.
खूप पदर असतात या long drive चे .....
दूर फिरायला जाणं एवढाच याचा मर्यादित अर्थ नसतो. Long drive म्हंटल की आता आठवेल तो मोकळा रस्ता आणि त्याबरोबर मोकळं होत जाणार मन .काय ? बरोबर न . असच सगळ्यांना नेहमी long drive वर जाण्याची संधी मिळो आणि संधीचा लाभही मिळो हीच मनीषा .
#खुशनुमासायेमौसमहैजहाँ , #घटासावनकी

छान लेख!!
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhupach sunder ...agadi baslya thikani longdrive la jaun refresh houn aalot
ReplyDeleteDhanyawad
DeleteKhup chhan watal vachun, kharach refresh zale me vahini.
ReplyDeleteDhanyawad
DeleteExcellent
ReplyDeleteएक हल्का फुलका छान लेख. 👍
ReplyDeleteलगेच long drive वर जायची ईच्छा झाली... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
ReplyDeleteKhupach chhan.vachtanach mi longdive la jaun aale.agdi manatla lihilay.
ReplyDeletethank you everyone
ReplyDeleteछान लेख.पुन्हा एकदा मनानेच longdriveवर जाऊन आठवणी ताज्या झाल्या आणि मन refresh झाले.
ReplyDeleteVery nice .......
ReplyDeleteNice to relax and best option to de-stress to
ReplyDeleteसर्वांचे आभार 🙏
ReplyDelete