Followers

Saturday, 17 August 2019

कापुसकोंड्याची गोष्ट







कापुसकोंड्याची गोष्ट

ए गोष्ट सांग न .........कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ? हो ....सांग ......हो सांग काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ...... सांग न लवकर .........सांग न लवकर काय म्हणतो ......कापूसकोंड्याची गोष्ट सांगू ? ......नको सांगू .......नको सांगू काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ? .....बर सांग ......बर सांग काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?...... पुरे आता .....बस ......पुरे आता .....बस काय म्हणतो कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?....


आठवली ? ही गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे .......पहिल्यांदा जेव्हा ही गोष्ट आपण ऐकतो  त्यावेळी त्या सांगणाऱ्याचा अस्सा राग येतो न ......पहिल्यांदा त्यातली गम्मत न जाणवता गोष्ट सांगणारा किंवा सांगणारी आपल्याला गोष्ट सांगत नाही आहेत तर बनवतात आहे हे  कळायलाच वेळ लागतो .....आणि कळल्यानंतर राग येतो.....होत न अस .

 त्यातली गम्मत मात्र एकदा कळली की मग मजा येते ........मग शोधू लागतो आपणही कोणालातरी..... ही गोष्ट सांगायला ........ मोठे भाऊ बहिणी असतील तर ते काही दाद लागू देत नाहीत ..... पण छोट्या भावाला ,  बहिणीला किंवा  सुट्टीत आपल्या घरी आलेल्या आपल्या आते , मामे , चुलत भावा बहिणींना ही गोष्टी सांगून चिडवण्यात मजा येते ........कोणी ही गोष्ट एको न एको ......आई बाबा मात्र खूप छान ऐकतात ही गोष्ट आणि काही कळलंच नाही असं दाखवत आपल्या त्या बालिश आनंदात सहभागी सुदधा होतात .


 मला तर या गोष्टी मध्ये फार मजा वाटते .....म्हणजे बघा.......हा खेळ.....हो हा एक प्रकारचा खेळच आहे .......जरी त्यात गोष्ट शब्द असला तरी तो दोघांनी खेळण्याचा खेळच आहे .......गोष्ट सांगू का विचारल्यानंतर  दुसरा खेळाडू त्या संवादातून पुष्कळदा स्वतःला हवं ते बोलू शकतो .....कधी असही होतं की जे एरवी सहजपणे सांगायची हिम्मत होत नाही ते या मजे मजेत सांगून मोकळ होता येत ......जर गोष्ट सांगणारा हा दादा किंवा ताई असेल तर .......मग अगदी तूझा मला राग आलाय , तू मला आवडत नाही , तू दुष्टपणा करतो , तुझे कान ओढीनं , तु दुपारी काय केलं ते मी बाबांना सांगीन ......अजून कितीतरी ......जे त्या दुसऱ्याने परत म्हंटल्यावर त्यातून निघणारा आणि स्वतःवरच उलटणारा अर्थ .....खूप मजा येते पण कधी कधी त्यात धपाटा मिळण्याचा  chance  असतो .... अशीच दुसऱ्याची फिरकी सुद्धा घेता येते ....हा खेळ संपत नाही ..... एकतर एकमेकांचं  रिपीट तरी करावं लागतं खेळात राहायला नाहीतर मग खेळ कसा बंद करावा हा विचार करता करता  दुसरी व्यक्ती मग मजा घ्यायला लागते ......गोष्ट ज्याने सुरू केली त्याला जरी नंतर ती सांगायचा कंटाळा आला तरी  मग ऐकणारा सांगणारा होऊन त्याची फिरकी घेऊ शकतो . त्यासाठी त्यातली गम्मत कळावी लागते .....आणि तो खेळ खूप मजेशीर होतो त्या दोघांसाठी आणि तिथे बाजूला त्यांची मजा ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा .......जोपर्यंत दोघेही आता खरच पुरे अस म्हणत नाहीत तोपर्यत थांबता येत नाही . एक विस्मरणीय संवाद तर होतोच पण छान अशी नेहमी ओठांवर हसू येईल अशी गोड आठवण कुपीत साठवल्या  जाते .

या गोष्टीमागे हा विचारही असू शकतो का ...की जेव्हा दुसरी व्यक्ती तुमची नक्कल  करते , तुमचीच वाक्य दुसऱ्या कुठल्या संदर्भात परत बोलून तुम्हाला चिडवण्याचा  प्रयत्न करते  .....तुम्ही जे करता तस करून क्वचित शाळेत , कॉलेज ,  office मध्ये किंवा अजून कुठे तुम्ही केलेल्या कामाचं credit घ्यायचा प्रयत्न करते ......त्यावेळी रागावून न जाता  आपल्या मनाची शांतता ठेवून त्या व्यक्तीला ते तस जाणवून न देता तो खेळ त्याच्या कलाने आधी खेळत जाऊन नंतर तो आपल्यासाठी कसा उपयोगी ठरेल हे बघणं  .......कित्ती कठीण वाटतंय न ......राग येतो खरतर अशावेळी फार ......असे प्रसंग आयुष्यात  येणार आहेत ......त्यावेळी कस त्या प्रसंगांना सामोरं जाता येईल ......कसा आपल्या मनाचा शांतपणा टिकवता येईल हे  या खेळातून शिकवण्याचा प्रयत्न तर नसेल ?


कापूसकोंड्याची गोष्ट कोणी आणि कधी रचली असेल ? या मागे काय हेतू असेल ?   या शब्दाची फोड करावी तर कापूस आणि कोंडा ........दोन्ही इतके हलके की वारा तर दूरच ......साधी फुंकर घातली तरी उडणारे  ........बरं कापूस आणि कोंडा तसं पाहिलं तर दोन्ही उपयोगी वस्तू .....कापसापासून तयार केलेल्या वस्त्राने  मनुष्याच्या शरीराचं ऊन वाऱ्यापासून संरक्षण होत तर कोंडा पोटाची भूक भागवतो .......म्हणतात न खायला कोंडा आणि निजेला धोंडा ......अगदी काही जरी नाही मिळालं जेवायला .....कोंडा खाऊन पण मनुष्य आपली भूक भागवू शकतो ........मग ही गोष्ट कापूस कोंड्याची का ?

मनुष्याच्या मूलभूत गरजा .....अन्न , वस्त्र , निवारा यापैकी दोन गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंनी कधीही पूर्ण न होणारी गोष्ट कोणी तयार केली असेल ? का ? निवारा हा एखादया झाडाखाली सुद्धा घेता येतो . वस्त्र मात्र मेहनतीने कापसापासून तयार करावं लागतं .......तसच कोंडा सुद्धा गव्हाचा काढावा लागतो त्यासाठी अगदी गहू पेरण्यापासून मेहनत करावी लागते  .........अन्न आणि वस्त्र या त्यावेळेच्या सगळ्यात मोठया गरजा होत्या . किंबहुना आजही त्याच मूलभूत गरजा आहेत. कशासाठी ?.....पोटासाठी ......असं म्हणतो न आपण नेहमी ...........यासाठी आयुष्यभर मेहनत करावी लागणार हे तेव्हाही माहिती होतं .......आजही हे खरं आहे ........मूलभूत गरजा भागवण्यासाठी मेहनत ही आवश्यक आहे आणि ती सुद्धा आयुष्यभर न संपणारी ..........म्हणून तर या न संपणाऱ्या गोष्टीच नाव कापूसकोंड्याची गोष्ट असं नसेल ? काय वाटतं तुम्हाला ?

कापुसकोंड्याची गोष्ट सांगू ?



#कापुसकोंड्याचीगोष्ट

17 comments:

  1. कित्ती साध्या सरळ सोप्या भाषेत उलगडल सगळ

    ReplyDelete
  2. मस्त मांडलंयस मनी....

    ReplyDelete
  3. सुंदर लेख !

    ReplyDelete
  4. सुंदर लेख,अगदी साधी,सरळआणि सोपी रचना.....मनापासून आवडली.

    ReplyDelete
  5. Vah masttach,
    I hope tu punha "vah masttach" mhananar nai

    ReplyDelete
  6. सर्वांचे आभार

    ReplyDelete
  7. Khupach chhan.lahanpaniche diwas athwle.

    ReplyDelete
  8. छानच....... बालपणीची न संपणारी गोष्ट .जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  9. छान. आता मला ही प्रश्न पडलाय की कुणी लिहिली असावी ही गोष्ट ? पण वाटायला की तो नक्की शेतकरी असावा. कापूस आणि गहु वारंवार उगवून ही त्याच दैन्य जात नाही म्हणून infinite loop मधे चालणारी ही गोष्ट असावी.

    ReplyDelete
  10. सर्वांचे आभार

    ReplyDelete
  11. मस्त गोष्ट, विचार पण करु शकत की या विषयावर पण कुणी काही लिहू शकतो

    ReplyDelete
  12. 😊 मी विचारच करतेय हा अभिप्राय कुणी लिहिला असेल ?

    ReplyDelete