विचार
आज विचार करत होते काय लिहावं ? विचार करू लागले आणि करता करता माझं मलाच आता आठवत नाहीये की माझ्या मनात आधी कुठला विचार आला होता ......कशावर लिहावं अस मी ठरवत होते कारण जेव्हा लक्षात आलं की मला ब्लॉग लिहायचा आहे तेव्हा तर मी माझाच कुठला तरी दुसराच विचार करत होते .
सगळ्यांचच होतं पहा अस .....एखाद्या गोष्टीचा विचार करू म्हंटल तर कधी कधी सुचत नाही ..... कधी कधी एकटे बसले असतो आपण त्यावेळी मुंग्यांची भली मोठी रांग दिसावी तसे विचार सुरु होतात .......एखाद्या पाण्याच्या प्रवाहासारखे वाहत राहतात .....कुठून सुरु होतील आणि कुठपर्यंत जातील काहीच सांगता येत नाही .........
विचार हे ठरवून येत नाहीत ..... आपोआप येतात ......ते थांबवणं आपल्या हातात असतं हे जेवढं खरं तेवढंच हे ही खर आहे की कधी कधी ते थांबावेसे वाटले तरी आपले प्रयत्न कमी पडतात आणि त्या विचार चक्रात आपण अजून गुंतत जातो ..... विशेषतः कुणाबद्दल , किंवा एखाद्या जुन्या प्रसंगाचा विचार करतांना ........कळत पण वळत नाही .......
हे विचार जेव्हा आपसूक येतात तेव्हा खूपदा असं होतं की विचार करूनही न सुचलेला उपाय किंवा एखादा न मिळालेला धागा सापडतो .......त्यावेळी वाटतं ....अरे हे कित्ती सोपं होतं ...... कसं नाही सुचलं मला आधी
मन शांत असतांना आपण नीट विचार करू शकतो असं जे म्हणतात ते हेच असावं ......म्हणूनच पूर्वीचे लोक ध्यान करण्यावर भर देत असावेत .
जो विचार पहिल्यांदा मनात येतो ......त्यानंतर एकात एक असे कितीतरी निराळ्या विषयावरचे विचार येत जातात मनात ........अगदी साधी समोर दिसलेली एक झाडाची सावली सुदधा विचार करायला भाग पाडते ......आणि ती साखळी कुठे पर्यंत जाईल याला काहीच धरबंध नसतो ........
विचार करणं चांगलं ..... विचार चांगले असणं त्याहून चांगलं ......वाईट विचारांचा आपल्या शरीरावर , प्रकृतीवर वाईट परिणाम होतो हे सिद्ध झालंय ,....... ते विचार मनात येतात हे तर खरं .......कितीही ठरवलं तरी सर्व साधारण लोकं असे विचार मनात येण्यापासून स्वतःला परावृत्त करण्यात तेवढे यशस्वी होत नाहीत .......प्रयत्न सगळेच करतात .........देह सर्वांचा सारखाच .....फरक फक्त विचारांचा....
साधं उदाहरण घ्यायचं ......तर आपली जवळची व्यक्ती जेव्हा घरी पोहोचायला उशीर होतो काही कारणाने ......कधी traffic मुळे , कधी मित्रांशी गप्पा मारत बसल्यामुळे, कधी कामामुळे , कधी अजून कुठल्या कारणामुळे .......त्यावेळी का उशीर झाला असेल या बद्दल जे विचार मनात येतात .....ते खूपदा साधे असतात का..........त्यावेळी मनाला सांगितल्या जातं .......असं झालं असेल ......तसं झालं असेल ..... मोठ्याने जरी दुसरं काही बोलल्या गेलं तरी आत खोल मनात मात्र काळजी मुळे खूप वेगळे विचार येतात हो नं .
ध्यान करतांना मन शांत ठेवा .....कुठलाही विचार करू नका असं सगळे म्हणतात ..... हे खरंच करता येतं का ......मन रिकामं ठेवणं इतकं सोपं आहे का .......विचार करायचा नाही .....हा ही एक विचारच आहे नं .
विचार करतोय हे सांगताना शब्द पहा किती मजेशीर वापरतो आपण सगळे .....म्हणतो न
विचार चक्र सुरू आहे ...... चक्र जे फिरत राहत .....कधी जोरात तर कधी हळू .......त्यात आपण फसत जातो ......दोरा चक्रात फिरल्या सारखे ........
विचार मंथन ..........कुठलाही मोठा निर्णय घ्यायच्या आधी मनात आलेल्या निरनिराळ्या विचारांना ढवळून काढून ........मंथन करून शेवटी वर आलेला सुज्ञ विचार .........हे पुष्कळदा करतात सगळे ......अगदी छोटे मोठे कुठलेही निर्णय घेतांना ..........
विचाराधीन ..........काहीतरी विचार करतांना त्यात गुंतून जाणं ......त्या विचाराच्या अधीन होणं .......असं तर कधी कधी छोट्या मुलांनाही पाहतो ....... आपल्यातच गुंग असतात ती मुलं....... कित्येक वेळा तर त्यांना सांगता देखील येत नाही की ते कशाचा विचार करतात आहेत ...... मजा येते त्यावेळी ..... त्यांचे तुटक अर्धे विचार ऐकतांना ........ खूपदा ते खूप काही सांगून जातात ........फक्त ते विचार ऐकण्यासाठी , समजण्यासाठी आपल्याला लक्षपूर्वक ऐकावं लागतं .
विचारवंत .......याचा अर्थ श्रीमंत सारखा वाटतो नं ........श्रेष्ठ विचारांनी परिपूर्ण .......जो विचार करू शकतो आणि दुसऱ्यापर्यंत ते पोहोचवू शकतो .....मांडू शकतो ....... दुसऱ्यांना पटवून सांगू शकतो ......असा विचारवंत ......मग ते कुठल्याही विषयावर बोलणारे ,सांगणारे असोत ........त्यांच्या विचार करण्यात एक सुसंगती जाणवते ........अर्थात यातही दोन प्रकार आहेत ....... एक जे स्वतःला विचारवंत म्हणवतात .......आणि एक जे जाणवतात .
विचारमग्न ....झालेय न तुम्ही वाचतांना आणि असही वाटतय न की मी विचारी आहे .....jokes apart पण खरंच विचार हे फार प्रगल्भ करतात व्यक्तीला .....विचारी व्यक्तिमत्त्व हे चांगलं असू शकतं तसच जास्त विचारी असणं हे कधी कधी मनात भीतीला , काळजीला दिलेलं आमंत्रण असतं .....अर्थात ते विचार काय आहेत यावर अवलंबून असत हो न .
विचारधारा हा अजून एक थोडा विचारवंत या शब्दाचाच भाऊ म्हणूया ........ खूपदा हे विचारवंत लोक एकाच विषयाचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचार मांडतात ........मग त्यांचे विचार पटणारे , पाळणारे , त्यांचं ऐकून तसा विचार करणारे असे समाजात वेगवेगळे ग्रुप तयार होतात .......कधी हे विषय सामाजिक बांधीलकीचे असतात तर कधी समाज प्रबोधनाचे तर कधी राष्ट्रसेवेचे तर कधी राष्ट्रहिताचे ........हे विचार कधी कधी समांतर जाता जाता ........ कुठे तरी विलीन होऊन परत समांतर जातात ...... धर्मासाठी , मोक्ष कसा मिळेल यासाठी , business strategy , देशहितासाठी शेतीच्या आधुनिकीकरणासाठी , पर्यावरण संदर्भी अजून कितीतरी विविध विषयांवर या चर्चा होतात .......त्यावेळी या निराळ्या असणाऱ्या विचारधारा समांतर तर जातातच पण कुठली विचारधारा जास्त चांगली यासाठी कधीकधी कलह सुद्धा होतात असो .....हे जरा विषयांतर झालं .
तर .........विचारांती ....... असं वाटतंय .....की ......विचार .......याचा अर्थ जर कुणाला विचारला तर तो विचार करेल .....का विचारलं असेल याने , कुणाला सांगायचंय , कशासाठी हवाय अर्थ आणि मग विचारेल .......का विचारतोय तू असं ........किंवा विचारेल ......का ? कशासाठी ? कुणाला सांगायचंय ? वगैरे वगैरे .
हा विचार शब्द त्या विचार शब्दापेक्षा वेगळा आहे ......हो नं......ज्यावर आत्ता पर्यंत मी विचार मांडले .......काय बरोबर न .
विचारांती सर्वांचे विचार आणि विचारधारा चांगल्या आणि फक्त चांगल्या दिशेने वाहोत हीच मनीषा

छान लेख
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप छान लेख ।।
Deleteविचार करणे हे मनाचे कामच आहे.विचार.....विचार....विचार.....वा खुपच सुंदर.असाच विचारांचा अखंड प्रवाह ओसंडत राहो.......
छान गं.....
ReplyDeleteविचार .....सातत्याने प्रवाहित होणारी गोष्ट ....आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये सर्वांत जास्त महत्त्व कशाला आहे तर....निर्विचार अवस्थेला !!!
रेणू
खरंय ....👍
DeleteAtishay sundar..vicharavar etka sundar lihita yeta..ha vichar manat aala.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteAtishay sundar..vicharavar etka sundar lihita yeta..ha vichar manat aala.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान........ किती सहजपणे मांडले आहेस विचार.... तू नेहमी लिहीत रहा मनी.
ReplyDeleteधन्यवाद👍
DeleteMastach khupach chan prakare vichar vyakta kelet
ReplyDeleteधन्यवाद
Deleteविचारां वर विचार करून विचार मांडू का असा विचार करत होतो , पण म्हटलं लगेच विचार चक्र सुरु व्हायच . असो खरच छान लिहिल आहे.
ReplyDelete👌👌 😊 धन्यवाद
Deleteविचारांवर विचार करायला लावणारा लेख.
ReplyDeleteविचार करत होतो काय लिहू... 😀.... 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete👌👍
ReplyDeleteVicharanvar pan lekh lihu shakto,he tujha lekh wachun samjla.mast!!
ReplyDeleteसर्वांचे आभार🙏
ReplyDeleteबढीया। शब्द कडून अर्था कडे।एक नंबर रेणू ताईंचे विचार एकदम बरोबर आहे अध्यात्मात म्हणून निर्विचारी अवस्थेला एक नंबर दिला आहे. संत श्री
ReplyDeleteआसाराम बापूजी पण म्हणतात चुप साधन एक नंबर होता है