पहिला पाऊस
आज पाऊस आला खूप दिवसांनी .......उन्हामुळे गरम झालेल्या जमिनीचा पाऊस पडून ओली झाल्यावर येणारा गंध .....अहाहा ....त्याला तोडच नाही......कुठलाही सुगंध त्यापुढे फिका पडतो ......मृदगंध .....हा शब्द मनात येताच गार वाटत .....हो न .....तो वारा जाणवतो ...सुगंध दरवळतो मनात ...... या शब्दातच हे सर्व करण्याची किमया आहे ......
आठवा तो लहानपणी शाळेत असतांना चा दिवस ......शाळा एकतर नुकतीच सुरू झालेली असायची किंवा अजून एकदोन दिवस असायचे शाळा सुरू व्हायला ......ज्या दिवशी पहिला पाऊस यायचा त्यादिवशी हमखास सगळी मुलं त्या पावसात भिजत खेळायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणीही त्या पावसात भिजल्यावर रागवत नसत कपडे खराब झाले तरी ......बरोबर न .....त्यावेळी खरतर मातीला येणारा तो सुगंध आवडत असला तरी फारस काही कळत नव्हतं .....पावसात खेळणं हे प्रामुख्याने ध्येय असायचं ......शाळेतून येतांना जरी पाऊस पडला तरी नुकतीच शाळा सुरू झालेली असल्याने पुस्तक दप्तरात नसायची .....असलीच एखादी वही तर ती रफ असायची त्यामुळे ती ओली होण्याची भीती पण नसायची ......शाळा जवळ असली आणि पायी जर घरी येत असु तर......... मग तर धमाल असायची .......हमखास घरी जायला उशीर व्हायचा ......त्या पावसात दोन हात बाजूला ठेवून चेहरा वर करून पावसाचे तुषार चेहऱ्यावर घेतांना जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय आहे ........घरी गेल्यावर आई दारात हातात टॉवेल घेऊन असायचीच .....हो .....आधी बाहेर पायावर पाणी घेऊन पायाला लागलेला चिखल धुवायचा आणि मग तिने दिलेला टॉवेल घेऊन अंघोळीला जायचं .....एवढाच नियम ......आणि अंघोळ करून आल्यावर मिळणार गरम गरम दूध तर कधी गरम सूप आणि त्याबरोबर मिळणार काहीतरी गरमागरम खाण .....वा ......त्यावेळी त्या दुधाला अमृततुल्य चव असायची आणि ते खात पीत असतांना तो आईचा केस कोरडे करण्यासाठी केसातून फिरणारा पदर ......त्यावेळी केस कोरडे करत जा रे .....अस सांगतांना तिच्या आवाजातली ती काळजी .......अर्थात हे सगळं त्यावेळी काही कळत नसे ......पण आता जाणवतं .....आणि ती आठवण मृदगंधा सारखीच दरवळते ...........पहिल्या पावसाची मजाच न्यारी .....
आजही पाऊस पडला त्यावेळी या आठवणी तर आल्याच ....पण भिजल्यावर लक्षात आलं की अरे आजकाल भिजतांना पूर्वीसारखं बिंधास्त..... मनसोक्त ....भिजत नाही आपण मोठे झाल्यावर ......सर्दी झाली तर , हा ड्रेस खराब होईल , बाहेर आहोत आपण , कुणी पाहिलं तर काय म्हणतील , मुलं शाळेतून यायची वेळ झाली ....जेवायला आज काय करायचं , केस खराब होतील .....मीटिंग ला जायचंय .....एक ना अनेक अशा विविध कारणांनी भिजायचं पुढे ढकलतो आपण आणि मनसोक्त आनंद न घेता तो क्षण तसाच रिकामा राहतो त्यात आठवणी तयारच होत नाहीत .....खरंतर प्रत्येक क्षण आपण जगलो तर कितीतरी आठवणींचे सुंदर डोंगर आपल्या आयुष्यात तयार होतील.....त्यावर कधी निवांत वेळी जाऊन बसतांना परत तो आनंद आपण अनुभवू शकू ......पण आपणच या सगळ्या गोष्टी दूर सारतो ....वेळ नाही या नावाखाली ......बरोबर न .......
पाऊस पडून गेल्यावर ऊन पडल्यानंतर ....इंद्रधनुष्य दिसतं ....ते कुठपर्यंत आहे हे पाहायला लहानपणी दूरपर्यंत जाण आजही मनाला आनंद देत ......मग त्या रस्त्यावरून ते अजून मोठं दिसतं .....ते जमिनीला टेकल्यासारखं दिसतं आहे ......तर कुठे कुठल्या तरी घराच्या गच्चीवरून अजून मोठ्ठ दिसतंय अस मित्रांनी सांगितल्यावर ते बघण्याची धावपळ .......सगळं कसं मनाला आजही आनंद देत .......आजही इंद्रधनुष्य दिसलं ......छान मोठ्ठ .....
बागेतली सर्व झाडं छोटी मोठी पावसात न्हाहून निघालेली होती .......जसं लहान बाळ अंघोळ झाल्यावर दिसतं तस .....एकदम फ्रेश ......पावसाचं पाणी पिऊन टवटवीत झालेली ती झाड , पान वाऱ्यावर डोलत होती .......त्यावर पडणाऱ्या उन्हामुळे अस वाटत होतं जसा हिरवा प्रकाश पसरला आहे .......पानावरुन हळूहळू घसरत खाली पडणारे पाण्याचे थेंब ......काही पानांवर तर काही कळ्या आणि फुलांवर थांबलेले ते पाण्याचे थेंब पाहून .......लहानपणी ची आठवण झाली ........त्यां थेंबांना एकमेकांकडे नेण्यासाठी बोटाने करून दिलेली वाट आठवली .............ते थेंब मोठे होत जाऊन मग खालच्या पानावर तो मोठा थेंब पडणं पाहायला किती मजा यायची .....व्वा .........आणि नंतर तिथून मग अजून खाली जात जात हळूच मग त्यांचं एक पाण्याची धार होत खाली जाण ....ते बघण्यात होणारा आनंद .....फाटकाच्या लोखंडी ग्रिल वर मोत्यांच्या माळे सारखे दिसणारे लटकलेले ते पाण्याचे थेंब ......तो एक एक थेंब हळूच बोटावर घेऊन हाताच्या मध्ये ते कसे गोळा होतात हे पाहण्याची मजाच न्यारी ......अहा .....पहिल्या पावसाने स्वतः बरोबर किती आठवणी आणल्यात ......पाऊस थांबल्यावर ..... परत ते पाण्यात फिरायला जाण .....पाण्यात कागदाची नाव तयार करून त्यांची शर्यत लावणं .....त्या मागे फिरत फिरत जाण ......ती नाव ओली होऊन बुडली तर परत दुसरी तयार करून आणणं ......रस्त्यावर कुठेतरी सांडलेल्या पेट्रोल किंवा डिझेल च्या थेंबात दिसणारे सप्तरंग पाहणं ......त्याला काडीने हलवून परत ते दिसतात का ते पाहणं ......ते पसरवून मोठं करण्याचा प्रयत्न करणं ...........खुपसणी चा खेळ खेळणं .......तो खेळ फक्त पावसाळ्यातच खेळायला मिळायचा .....तो खेळतांना दूर दूर पर्यंत जाण्यात जी मजा येत असे ती अवर्णनीय ..... आठवणींचा खजिनाच सापडला अस वाटतय आज .......पहिला पाऊस आला की या सगळया आठवणी तर येतातच पण पुन्हा ते सगळं करण्याची प्रबळ इच्छा पण मनाला देतात ......सगळं जग हिरवं झाल्याचा भास होतो ......हिरवा प्रकाश पसरतो ....मनाला टवटवीत करतो ......कुठली नवीन झाड लावावी हे विचार पण मनात यायला सुरुवात होते ......उन्हाळ्यात करपलेली , मलूल झालेली झाडं परत मूळ धरू लागतात ......खरंच पहिला पाऊस फक्त पहिल्यांदा बरसलेलं पाणीच नसतं तर अगदी शेतकऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांच्या मनाला एक नवीन पालवी फुटण्यास प्रोत्साहित करणार अमृत असतं...... अस अमृत प्रत्येकाच्या आयुष्यात ते आनंदाचे क्षण परत परत आणून सर्वांचं आयुष्य प्रफुल्लित करो हीच मनीषा .
#कागदाचीनाव , #मृदगंध , #पहिला पाऊस

खुपच छान लिहिलंय वहिनी.. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या... Flats आणि school bus मुळे आता क्वचितच मुलांना हे सगळं अनुभवायला मिळतं... You won't believe... या वर्षी पहिला पाऊस आला तेव्हा मी office हून घरी येत होतो... मी scooter नी office ला गेलो होतो त्या दिवशी... Raincoat होता पण तरीही पावसात भिजलो... अजूनही chance मिळाला तर enjoy करतो मी ते.... ��
ReplyDeleteवाह prashu luckyआहेस कसलीही भीड न बाळगता आपल्याला आवडणारं करणं आजच्याघडीला फारच दुर्मिळ
Deleteपहिल्या पाऊस... आठवणींच्या सरीवर सरी घेऊन आलीस गं मनीऽऽऽ...
ReplyDeleteसुंदर ��
Waaah..ekdum tavtavit!
ReplyDeleteछानच लिहिले आहे. ह्या वर्षी इतका कमी पाऊस आहे की अत्ता जे शिंतोड़े आलेत त्याला पहिला पाऊस म्हणाव का असा प्रश्न पडतो.
ReplyDeleteलहानपणी चे सर्व खेळ डोळ्यासमोर आलेत. खरच किती रम्य दिवस होते ते ?
मस्त रे खरच लहान पण आठवले
ReplyDeleteSK
सगळ्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteखुप छान मनिषा👌👌👍
ReplyDeleteखूपच छान लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteWa manisha khup surekh lihiles..wachtanna mi swatahala punha tya athwaninchya jagat neun thevle...ramya te diwas ani ramya tya athwani.....surekh...
ReplyDeleteआठवणींच्या सरीवर सरी . अजूनही वाहत्या पाण्यात मी अन मुले होड्या करून खेळतो. अळु अन कमळाच्या पानावर ओघळणारे मोती बघून मन हरखते.बालपणी चा काळ सुखाचा. ओघवती शैलीतले वर्णन खुप रम्य।.,👌
ReplyDeleteअनिता
Manisha Vaidya Udhoji 20/07/2019
ReplyDeleteKhup chan lihile aahe Manisha ,vachata vachata parat ekada balpan anubhavale
सुरेख
ReplyDeleteतू अगदी माझ्या मनातलं लिहीलस.
ReplyDeleteआज मी काशीपूरहून दिल्लीला येत होतो, कारनी. येतांना मध्ये काही ठीकाणी धुराळा उडत होता, ढग भरून आले होते आणि पाऊस सुरू झाला. माझ्या मनात काळजी दाटून आली, आपल्याला एअरपोर्टला पोहचायला उशीर होणार की काय? मुंबईचे विमान मिळणार की नाही?
पण त्याच बरोबर माझ लक्ष बाजूनी जाणार्या रिक्षा कडे, पायी चालणार्या टवाळ पोरांकडे गेले.
त्यांच्या चेहर्यावरचा आनंद, ती बेफिकीरी, ते पावसाचे अोघळणारे पाणी बघून, मलापण खूप आनंद झाला, शाळा, काॅलेजचे दिवस आठवले. त्यांच्या आनंदात मी पण चिंब भिजलो, कार मध्ये बसुनच.
- सचिन डबीर
sahi very well written. Getting drenched while reading along. Keep on writing.
ReplyDeleteThank you all for encouraging words... ....
ReplyDeleteखुपच छान,अप्रतिम लेख.....आमच्या बालपणीचे ते दिवस आठवले....काय चिक्कार पाऊस असायचा .....क्षणात सर्व प्रसंग कसे एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर ऊभे राहिलेत!
ReplyDeleteखुप आवडले.....👌👌👍👍
Khupach apratim lihilay vahini.lahanpaniche diwas athwle.
ReplyDeleteखुप छान वाटलं वाचुन.... लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या😊
ReplyDeleteवाह!!खूप छान लिहिलं आहे वहिनी,मस्त पावसाचं वर्णन करणं म्हणजे निसर्गाच्या खूप जवळ जाणं आणि मला वाटत की निसर्गाच्या जवळ जाण आपण कोणत्याही वयात सोडू नये,मी तर अजूनही दरवर्षी पावसात एकदा ना दोनदा भिजतेच आणि ते ही आवर्जून तुलाही आठवत असेल आणि त्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाची रांग मी अजूनही जुळवून आणते हळुवार तिला सारकतांना पाहून बघवसाच वाटत, मध्येच बारीक मध्ये जुळते,कधी थांबते तर कधी फास्ट होते खूप मजा येते तिला observe करायला
ReplyDeleteरम्य ते दिवस ....
ReplyDeletePleased to see how you have given words to those immortal moments and feelings that one lives through... Keep going ... We enjoyed reading it
ReplyDeleteKharch saglya aathvani tazya zalya. Manisha aapnhi pai pai shalet Jat hoto....kiti maza yaychi tevha.
ReplyDeleteसर्वांचे आभार 🙏
ReplyDelete